Advertisements
Advertisements
Question
स्वमत.
व्यावसायिक नाटकाचे स्वरूप व वैशिष्ट्ये तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
Solution
व्यावसायिक मराठी रंगभूमीला शतकापेक्षा अधिक काळाची समृद्ध परंपरा आहे. लोकरंजन व लोकप्रबोधन हे व्यावसायिक नाटकाचे प्रमुख हेतू आहेत. भूतकाळातील तत्त्वनिष्ठ प्रसिद्ध व्यक्तीचे जीवनदर्शन, समाजातील ज्वलंत समस्या, समकालीन समाजस्थितीतील अग्रेसर विषय यांवर व्यावसायिक नाटकांची निर्मिती होते.
व्यावसायिक नाटकाची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत. सामाजिक समस्या मांडण्याचे ते समर्थ माध्यम आहे. व्यावसायिक नाटक हे बोधपर व मनोरंजनपर असते. गंभीर विषयाचे नाटक सुसह्य होण्यासाठी विनोद, उपहास, श्लेष, शाब्दिक कोट्या यांची पखरण करून प्रेक्षकांच्या मनावरील ताण कमी करण्याची योजना त्यात असते. व्यावसायिक नाटकांचा कौटुंबिक, सामाजिक व ऐतिहासिक विषयांना उजाळा देण्यावर भर असतो. प्रेक्षकांच्या अभिरुचीनुसार नाटकाची मांडणी केलेली असते, त्यामुळे प्रेक्षक व नाटक यांच्यामध्ये दृढ नाते निर्माण होते. व्यावसायिक नाटक हे बोध, रंजन, प्रेक्षकानुनय या व्यावसायिक उद्दिष्टाने प्रेरित झालेले असते.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
‘इथे माणूस ‘दिसत’ होता, पण ‘जाणवत’ नव्हता. ओठ हालत होते, पण साद पोहोचत नव्हती’, या विधानांचा तुम्हांला कळलेला अर्थलिहा.
कारणे लिहा.
निशाने चेहऱ्यावर प्रौढपणा आणण्याचा प्रयत्न केला, कारण ______
वैशिष्ट्ये लिहा.
दूरदर्शनवरील ‘वहिनींचा सल्ला’ हा कार्यक्रम.
वैशिष्ट्येलिहा.
शिवाजी मंदिर’ येथील ‘वहिनींचा सल्ला’ हा कार्यक्रम.
फरक स्पष्ट करून तक्ता पूर्ण करा.
उषावहिनींचा सल्ल | निशावहिनींचा सल्ल |
सल्ला मागण्यासाठी मांडलेल्या समस्यांविषयी तुमचे मत लिहा.
वहिनींचा 'सुसाट ' सल्ला ही कथा तुम्हांला का आवडते, ते लिहा.
'स्त्रीने स्वतःच्या आत्मसन्मानाला जपले पाहिजे,' याविषयीचे तुमचे विचार लिहा.
आकृत्या पूर्ण करा.
लिओ टॉलस्टॉयची कोवळ्या वयातील विलक्षण शक्ती
आकृत्या पूर्ण करा.
टॉलस्टॉयने वाचलेले लेखक
आकृत्या पूर्ण करा.
'युद्ध आणि शांती' या कादंबरीसाठी तपशील गोळा करण्याची साधने
सूचनेप्रमाणे सोडवा
खालील शब्दांसाठी पाठात आलेल्या उपमा लिहा.
- मन:पटलावरील प्रतिमा
- 'युद्ध आणि शांती' ही कादंबरी
'कादंबरी' हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा.
खलील शब्दसमूहाचा तुम्हाला दमजलेला अर्थ स्पष्ट करा.
मनाची कोरी पाटी :
खलील शब्दसमूहाचा तुम्हाला दमजलेला अर्थ स्पष्ट करा.
तपशिलांचा महासागर :
नाटक ही दृक्-श्राव्य कला आहे कारण ______
चुकीचे विधान शोधा.
चुकीचे विधान शोधा.
चुकीचे विधान शोधा.
फरक स्पष्ट करा.
प्रायोगिक नाटक | व्यावसायिक नाटक |
खालील कृती करा.
खालील घटना/कृती यांचा परिणाम लिहा.
घटना/कृत | परिणाम |
एखाद्या प्रसंगात कल्पनेपलीकडील बदल आकस्मिकरीत्या होतो. |
अभिव्यक्ती.
विद्यार्थ्याला मिळालेल्या शालान्त परीक्षेतील उज्ज्वल यशाबाबत विद्यार्थी-शिक्षक-पालक यांच्यातील संवाद लिहा.
टॉलस्टॉयच्या तरल संवेदनेची सूचक आठवण तुमच्या शब्दांत वर्णन करा
स्वतःचे लेखन परिपूर्ण होण्यासाठी टॉलस्टॉय यांनी केलेले परिश्रम तुमच्या शब्दांत लिहा.
'ज्या जमिनीत कथाबीज पेरायचे तिची खूप कसून नांगरणी चालली होती,' या विधानाचा अर्थ स्पष्ट करा.