Advertisements
Advertisements
Question
थोडक्यात टिपा लिहा.
पर्यटनाची परंपरा
Solution
दूरवर असलेल्या स्थळांना विशिष्ट हेतूने भेट देण्याकरता केलेला प्रवास म्हणजे पर्यटन होय.
१. भारतातील पर्यटन: भारताला पर्यटनाची प्राचीन परंपरा लाभली आहे. ती कालखंडानुसार सांगता येईल.
अ. प्राचीन कालखंड: प्राचीनकाळी तीर्थक्षेत्रांना भेटी देणे, स्थानिक जत्रा-यात्रांना जाणे, विद्याभ्यास किंवा व्यापार या हेतूंनी पूर्वी पर्यटन केले जाई. बौद्ध वाङ्मयामध्ये लोकांच्या उद्बोधनाकरता स्वत: गौतम बुद्धांनी भारतातील अनेक प्राचीन शहरांना भेटी दिल्याचे उल्लेख सापडतात. बौद्ध भिक्खू, जैन मुनी व साधू सतत भ्रमण करत असत. याशिवाय, इ.स. ६३० मध्ये चिनी प्रवासी युआन श्वांग भारतात आला होता.
ब. मध्ययुगीन कालखंड: मध्ययुगात संत नामदेव, संत एकनाथ, गुरू नानकदेव, रामदास स्वामी अशा संतांनी भारतभ्रमण केले आहे.
क. आधुनिक कालखंड: १८५७ च्या स्वातंत्र्यसंग्रामाच्या काळात विष्णुभट गोडसे यांनी लिहिलेल्या 'माझा प्रवास' या प्रवासवर्णनातूनही तीर्थयात्रेसाठी देशात सर्वत्र पायी प्रवास करण्याची परंपरा दिसून येते.
२. परदेशातील पर्यटन: केवळ भारतातच नाही, तर परदेशांतही पर्यटनाची परंपरा दिसून येते. बेंजामिन ट्युडेला, मार्को पोलो, इब्न बतूता, गेरहार्ट मर्केटर यांनी जगभर प्रवास करून पर्यटन क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले.
३. पर्यटनाच्या या प्रदीर्घ परंपरेतूनच आधुनिक पर्यटनयुग सुरू झाले, असे म्हणता येईल.