English

टिपा लिहा. अवकाश संशोधन - History and Political Science [इतिहास व राज्यशास्त्र]

Advertisements
Advertisements

Question

टिपा लिहा.

अवकाश संशोधन

Short Note

Solution

  1. केरळ राज्यातील थुंबा येथील ‘थुंबा इक्विटोरियल लाँच सेंटर’ वरून इंडियन नॅशनल कमिटी फॉर स्पेस रिसर्च या संस्थेने भारताच्या पहिल्या संशोधक अग्निबाणाचे १९६१ मध्येयशस्वी प्रक्षेपण केले.
  2. १९६७ मध्ये थुंबा येथे स्वदेशी बनावटीच्या ‘रोहिणी-७५’ अग्निबाणाचे यशस्वी प्रक्षेपण केले गेले.
  3. याच्या पुढचा टप्पा म्हणजे १९७५ मध्ये सोव्हिएत रशियाच्या सहकार्याने पहिल्या भारतीय ‘आर्यभट्ट’ उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले.
  4. या यशामुळे अंतरिक्षात सोडण्याजोग्या उपग्रहाची संरचना व निर्मिती देशात होऊ शकते हे सिद्ध झाले.
  5. भूकेंद्राकडून उपग्रहाकडे संदेश पाठवणे, उपग्रहाकडून आलेल्या संदेशाचे भूकेंद्रावर ग्रहण करणे हे तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी व उपग्रहाच्या कार्यशैलीचे मूल्यमापन करण्यासाठी उच्च तंत्रज्ञान अवगत होऊ शकते असा आत्मविश्वास भारतीय शास्त्रज्ञांना आला.
shaalaa.com
अवकाश संशोधन
  Is there an error in this question or solution?
Chapter 1.07: विज्ञान व तंत्रज्ञान - स्वाध्याय [Page 42]

APPEARS IN

Balbharati History and Political Science (Social Science) [Marathi] 9 Standard Maharashtra State Board
Chapter 1.07 विज्ञान व तंत्रज्ञान
स्वाध्याय | Q २. (ब) (१) | Page 42
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×