Advertisements
Advertisements
प्रश्न
टिपा लिहा.
अवकाश संशोधन
टीपा लिहा
उत्तर
- केरळ राज्यातील थुंबा येथील ‘थुंबा इक्विटोरियल लाँच सेंटर’ वरून इंडियन नॅशनल कमिटी फॉर स्पेस रिसर्च या संस्थेने भारताच्या पहिल्या संशोधक अग्निबाणाचे १९६१ मध्येयशस्वी प्रक्षेपण केले.
- १९६७ मध्ये थुंबा येथे स्वदेशी बनावटीच्या ‘रोहिणी-७५’ अग्निबाणाचे यशस्वी प्रक्षेपण केले गेले.
- याच्या पुढचा टप्पा म्हणजे १९७५ मध्ये सोव्हिएत रशियाच्या सहकार्याने पहिल्या भारतीय ‘आर्यभट्ट’ उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले.
- या यशामुळे अंतरिक्षात सोडण्याजोग्या उपग्रहाची संरचना व निर्मिती देशात होऊ शकते हे सिद्ध झाले.
- भूकेंद्राकडून उपग्रहाकडे संदेश पाठवणे, उपग्रहाकडून आलेल्या संदेशाचे भूकेंद्रावर ग्रहण करणे हे तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी व उपग्रहाच्या कार्यशैलीचे मूल्यमापन करण्यासाठी उच्च तंत्रज्ञान अवगत होऊ शकते असा आत्मविश्वास भारतीय शास्त्रज्ञांना आला.
shaalaa.com
अवकाश संशोधन
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 1.07: विज्ञान व तंत्रज्ञान - स्वाध्याय [पृष्ठ ४२]