Advertisements
Advertisements
Question
टिपा लिहा.
बिश्नोई चिपको आंदोलन
Solution
राजस्थानच्या जोधपूर जिल्ह्यात खेजडी किंवा खेजडलीहे गाव आहे. या गावाचे नाव तेथे असणाऱ्या खेजडी वनस्पतीवरून घेण्यात आलेले आहे. येथे प्रथम विश्नोई समाजाचे आंदोलन झाले होते. खेजडली या गावात सर्वप्रथम चिपको आंदोलन सारखे आंदोलन इ.स. 1738 साली झाले होते. तेथील ग्रामस्थ अमृतादेवी हिच्या पुढाकाराने गावातील 363 बिश्नोई मंडळींनी वृक्षतोड थांबवण्यासाठी प्राणार्पण केले होते. या गावात खेजडी या वनस्पतीची बरीच झाडे होती. या झाडांना बिश्नोई समाज पवित्र मानतो. अमृतादेवी म्हणाली, "एक झाड वाचवण्यासाठी एक-एक मुंडके उडाले तरी हरकत नाही, तेही योग्यच असेल!" अमृतादेवीला व तिच्या असू, रत्ना व भागुबाई या तिन्ही मुलींना राजाच्या माणसांनी झाडे तोडण्याच्या कुन्हाडीनेच मारून टाकले. ही बलिदानाची बातमी एकून 83 गावांतले लोक जमा झाले. 363 लोकांनी झाडांना मिठ्या मारून बलिदान केले. अबोल वृक्षांसाठी लोकांनी हौतात्म्य पत्करले. राजाला आपल्या कृत्याचा पश्चात्ताप झाला. बिश्नोई समाजाच्या सन्मानार्थ जोधपूरच्या महाराजा अभय सिंग यांनी माफी मागितली आणि वृक्ष व अन्य जीवन संरक्षित ठेवण्याचे कबूल केले. विसाव्या शतकातील उत्तर प्रदेशातील चिपको आंदोलन देखील याच आंदोलनाची प्रेरणा घेऊन झाले.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
प्रदूषणावर मात करणे हे प्रभावी पर्यावरणीय व्यवस्थापनाचे प्रभावी माध्यम आहे हे कसे पटवून द्याल ते लिहा.
जादव मोलाई पयांगच्या गोष्टीतून आपणांस काय बोध मिळतो?
शास्त्रीय कारणे लिहा.
पर्यावरण समतोलामध्ये मानवाची भूमिका महत्त्वाची आहे.
योग्य जोडी जुळवा:
'अ' गट | 'ब' गट | ||
(1) | वनसंवर्धन कायदा | (a) | 1986 |
(b) | 1980 | ||
(c) | 1970 |