Advertisements
Advertisements
Question
टिपा लिहा.
पर्यावरण संवर्धन
Short Note
Solution
- पृथ्वीवर अनेक नैसर्गिक आणि मानवनिर्मित घटकांचा परिणाम होऊन बऱ्याच पर्यावरणीय समस्या निर्माण झाल्या आहेत.या समस्यांचा विपरीत परिणाम सर्व सजीवांवर होत असतो. हे जीव टिकवण्यासाठी आणि मानवाच्या जीवनाची गुणवत्ता चांगली करण्यासाठी पर्यावरण संवर्धनाची गरज निर्माण झालेली आहे.
- यासाठी पर्यावरण संवर्धनासंबंधीचे कायदे सरकारने केले आहेत. काही आंतरराष्ट्रीय करार देखील पर्यावरण संवर्धनासाठी केलेले आहेत. संयुक्त राष्ट्र संघटना देखील त्यात कृतिशील आहे. पर्यावरण संवर्धनासाठी आणि समस्या सोडवण्यासाठी युनायटेड नेशन्स एन्व्हॉयर्नमेंट प्रोग्रॅम (UNEP) ची स्थापना करण्यात आली आहे.
- पर्यावरण संवर्धनामध्ये लोक-सहभाग खूप आवश्यक आहे. यासाठी जनजागरण करणे महत्त्वाचे आहे. शालेय शिक्षणापासूनच ही पर्यावरणस्नेही मूल्ये रुजवण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. पर्यावरण संवर्धन ही आपली सामाजिक जबाबदारी आहे. नैसर्गिक साधनसंपत्तीचा योग्य आणि रास्त विनियोग करणे हा सुद्धा पर्यावरण संवर्धनाचा प्रयत्न आहे.
shaalaa.com
पर्यावरण संवर्धन (Environmental conservation)
Is there an error in this question or solution?
RELATED QUESTIONS
पर्यावरण संवर्धनासंदर्भात तुम्ही कोणकोणते उपक्रम राबवाल? कसे?
खालील चिन्हसंकेत काय सांगतात? त्याआधारे तुमची भूमिका लिहा.
खालील चिन्हसंकेत काय सांगतात? त्याआधारे तुमची भूमिका लिहा.
खालील चिन्हसंकेत काय सांगतात? त्याआधारे तुमची भूमिका लिहा.
भूकंप : नैसर्गिक घटक : : औद्योगिकीकरण : ___________
शास्त्रीय कारणे लिहा.
प्रदूषण ही खूप व्यापक संकल्पना आहे.
किरणोत्सारी प्रदूषणाचे मानवी शरीरावर होणारे कोणतेही चार दुष्परिणाम लिहा.