English

टिपा लिहा. जैवतंत्रज्ञान : व्यावहारिक उपयोग - Science and Technology 2 [विज्ञान आणि तंत्रज्ञान २]

Advertisements
Advertisements

Question

टिपा लिहा.

जैवतंत्रज्ञान : व्यावहारिक उपयोग

Long Answer

Solution

  1. जैवतंत्रज्ञानाचे व्यावहारिक उपयोग निरनिराळ्या क्षेत्रांत करण्यात येतात. उदा., पीक जैवतंत्रज्ञान, पशुसंवर्धन, मानवी आरोग्य इत्यादी.
  2. पीक जैवतंत्रज्ञान कृषी उत्पादकता आणि विविधता वाढवली जाते. संकरित बियाणे आणि जनुकीयदृष्ट्या उन्नत पिके, तणनाशकरोधी वनस्पती अशा संदर्भात विशेष संशोधन करण्यात आले आहे. या पद्धतीने पिकांच्या जास्त उत्पादन देणाऱ्या, रोग प्रतिकारक, क्षारता प्रतिकारक, तणनाशक प्रतिकारक, दुष्काळी तसेच थंडीच्या परिस्थितीतही तग धरू शकणाऱ्या पिकांच्या जाती निर्माण केल्या जात आहेत. बीटी कापूस, बोटी वांगे, गोल्डन राईस अशा जाती आता बऱ्याच लोकप्रिय झाल्या आहेत. तणनाशक रोधी वनस्पतीतून बाहेर पडण्याच्या रसायनांमुळे आपसूकच तणांचे नियंत्रण शक्य झाले आहे. जैविक खतांच्या वापराने रासायनिक खतांचा उपयोग कमी करता येतो. ऱ्हायझोबिअम, ॲझोटोबॅक्टर, नोस्टॉक, ॲनाबीना या जीवाणूंचा तसेच अझोला या वनस्पतीचा वापर करून वनस्पतींच्या उत्पादनात लक्षणीय फरक पडला आहे.
  3. पशुसंवर्धन करताना जैवसंवर्धनाच्या पद्धती वापरल्या जातात. कृत्रिम रेतन आणि गर्भप्रत्यारोपण या पद्धतीने विविध प्राणिज उत्पादनांचे प्रमाण व गुणवत्ता या दोन्हींतही वाढ करण्यात आली आहे.
  4. मानवी आरोग्य सुधारण्यासाठी रोगनिदान तसेच रोगोपचार या बाबीचा विचार केला गेला आहे. मधुमेह, हृदयरोग अशा आजारांचे निदान जैवतंत्रज्ञानाच्या मदतीने, लक्षणे दिसण्यापूर्वीच करता येते. एड्स, डेंग्यू यांसारख्या रोगांचे निदान आणि त्वरित उपचार शक्य झाले आहेत.
  5. रोगांच्या उपचारासाठी वापरली जाणारी संप्रेरक सारखी औषधे, प्रतिजैविके आणि विविध लसी, प्रतिजन इत्यादी आता जैवतंत्रज्ञानाने तयार करण्यात येतात. तसेच रोगोपचार पद्धतीत जनुक उपचार हे देखील शक्य झाले आहेत.
  6. औद्योगिक उत्पादने आणि पर्यावरणाकरिता जैवतंत्रज्ञानाचा निरनिराळ्या पद्धतींनी वापर केला जात आहे.
  7. DNA फिंगरप्रिंटिंग, क्लोनिंग यांसारख्या तंत्रांनी व्यवहारात आमूलाग्र बदल घडवून आणले आहेत.
shaalaa.com
जैवतंत्रज्ञानाचे व्यावहारिक उपयोग
  Is there an error in this question or solution?
Chapter 8: पेशीविज्ञान व जैवतंत्रज्ञान - स्वाध्याय [Page 100]

APPEARS IN

Balbharati Science and Technology 2 [Marathi] 10 Standard SSC Maharashtra State Board
Chapter 8 पेशीविज्ञान व जैवतंत्रज्ञान
स्वाध्याय | Q 4. अ. | Page 100

RELATED QUESTIONS

जनुकीय पारेषित बटाटे खाल्ल्यामुळे ___________ जीवाणूंमुळे होणाऱ्या रोगाविरुद्ध प्रतिकारशक्ती निर्माण होते.


जनुकीयदृष्ट्या उन्नत पिके __________


पूर्वी इन्सुलिन घोड्याच्या शरीरातून मिळवले जात असे.


मलेरिया हा विकार यकृतातील पेशींमध्ये जनुकीय दोष निर्माण झाल्यास होतो.


स्‍युडोमोनास हे जीवाणू प्रदूषित पाणी आणि जमीन यांतील हायड्रोकार्बन आणि तेलासारखी प्रदूषके वेगळी करू शकतात.


बॅसिलस थूरीनजाएनसीस या जीवाणूमधील जनुक काढून ते कापसाच्या जनुकात टाकतात.


जैवतंत्रज्ञानाच्या साहाय्याने बनवलेल्या लसी फार काळ टिकत नाहीत.


व्याख्या लिहा.

क्लोनिंग


सहसंबंध ओळखा:

इन्सुलिन : मधुमेह : : इंटरफेरॉन ______.


व्याख्या लिहा.

जनुकीयदृष्ट्या उन्नत पिके


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×