Advertisements
Advertisements
प्रश्न
टिपा लिहा.
जैवतंत्रज्ञान : व्यावहारिक उपयोग
दीर्घउत्तर
उत्तर
- जैवतंत्रज्ञानाचे व्यावहारिक उपयोग निरनिराळ्या क्षेत्रांत करण्यात येतात. उदा., पीक जैवतंत्रज्ञान, पशुसंवर्धन, मानवी आरोग्य इत्यादी.
- पीक जैवतंत्रज्ञान कृषी उत्पादकता आणि विविधता वाढवली जाते. संकरित बियाणे आणि जनुकीयदृष्ट्या उन्नत पिके, तणनाशकरोधी वनस्पती अशा संदर्भात विशेष संशोधन करण्यात आले आहे. या पद्धतीने पिकांच्या जास्त उत्पादन देणाऱ्या, रोग प्रतिकारक, क्षारता प्रतिकारक, तणनाशक प्रतिकारक, दुष्काळी तसेच थंडीच्या परिस्थितीतही तग धरू शकणाऱ्या पिकांच्या जाती निर्माण केल्या जात आहेत. बीटी कापूस, बोटी वांगे, गोल्डन राईस अशा जाती आता बऱ्याच लोकप्रिय झाल्या आहेत. तणनाशक रोधी वनस्पतीतून बाहेर पडण्याच्या रसायनांमुळे आपसूकच तणांचे नियंत्रण शक्य झाले आहे. जैविक खतांच्या वापराने रासायनिक खतांचा उपयोग कमी करता येतो. ऱ्हायझोबिअम, ॲझोटोबॅक्टर, नोस्टॉक, ॲनाबीना या जीवाणूंचा तसेच अझोला या वनस्पतीचा वापर करून वनस्पतींच्या उत्पादनात लक्षणीय फरक पडला आहे.
- पशुसंवर्धन करताना जैवसंवर्धनाच्या पद्धती वापरल्या जातात. कृत्रिम रेतन आणि गर्भप्रत्यारोपण या पद्धतीने विविध प्राणिज उत्पादनांचे प्रमाण व गुणवत्ता या दोन्हींतही वाढ करण्यात आली आहे.
- मानवी आरोग्य सुधारण्यासाठी रोगनिदान तसेच रोगोपचार या बाबीचा विचार केला गेला आहे. मधुमेह, हृदयरोग अशा आजारांचे निदान जैवतंत्रज्ञानाच्या मदतीने, लक्षणे दिसण्यापूर्वीच करता येते. एड्स, डेंग्यू यांसारख्या रोगांचे निदान आणि त्वरित उपचार शक्य झाले आहेत.
- रोगांच्या उपचारासाठी वापरली जाणारी संप्रेरक सारखी औषधे, प्रतिजैविके आणि विविध लसी, प्रतिजन इत्यादी आता जैवतंत्रज्ञानाने तयार करण्यात येतात. तसेच रोगोपचार पद्धतीत जनुक उपचार हे देखील शक्य झाले आहेत.
- औद्योगिक उत्पादने आणि पर्यावरणाकरिता जैवतंत्रज्ञानाचा निरनिराळ्या पद्धतींनी वापर केला जात आहे.
- DNA फिंगरप्रिंटिंग, क्लोनिंग यांसारख्या तंत्रांनी व्यवहारात आमूलाग्र बदल घडवून आणले आहेत.
shaalaa.com
जैवतंत्रज्ञानाचे व्यावहारिक उपयोग
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
APPEARS IN
संबंधित प्रश्न
कृत्रिम रोपण व गर्भरोपण या दोन पद्धतींचा वापर प्रामुख्याने _______ साठी केला जातो.
जोड्या जुळवा.
अ. इंटरफेरॉन | 1. मधुमेह |
आ. फॅक्टर | 2. ठेंगूपणा |
इ. सोमॅटोस्टॅटीन | 3. विषाणू संक्रमण |
ई. इंटरल्युकीन | 4. कॅन्सर |
5. हिमोफिलीया |
कृत्रिम रोपण व गर्भरोपण या दोन पद्धतींचा वापर प्रामुख्याने ___________ केला जातो.
पूर्वी इन्सुलिन घोड्याच्या शरीरातून मिळवले जात असे.
जैवतंत्रज्ञानाच्या साहाय्याने बनवलेल्या लसी फार काळ टिकत नाहीत.
व्याख्या लिहा.
क्लोनिंग
शास्त्रीय कारणे लिहा.
जनुकीयदृष्ट्या उन्नत पिके शेतकऱ्यांना फायदेशीर आहेत.
जनुकीयदृष्ट्या उन्नत पिके कशास म्हणतात? त्यांची कोणतीही दोन उदाहरणे दया.
सहसंबंध ओळखा:
इन्सुलिन : मधुमेह : : इंटरफेरॉन ______.
डी.एन.ए. फिंगरप्रिंटिंग म्हणजे काय?