Advertisements
Advertisements
Question
टिपा लिहा.
विद्युत निर्मिती आणि पर्यावरण
Answer in Brief
Solution
खनिज किंवा जीवाश्म इंधने तसेच आण्विक इंधने वापरून केलेली विद्युतनिर्मिती ही पर्यावरणास नेहमीच घातक ठरू शकते. या ऊर्जास्तोत्रांचा वापर केल्यास, पर्यावरणावर दुष्परिणाम होऊ शकतात.
- जीवाश्म इंधनांच्या ज्वलनातून हवा प्रदूषण होते. इंधनांच्या अपूर्ण ज्वलनातून आरोग्यास हानिकारक असा कार्बन मोनॉक्साइड तयार होतो. इतर विषारी वायू आणि घनरूप कण श्वसनसंस्थेच्या निरनिराळ्या रोगांना आमंत्रण देतात. तसेच सर्व प्रक्रियांतून तयार होणाऱ्या कार्बन डायऑक्साइडमुळे जागतिक तापमानवाढ व हवामान बदल होत आहे; तर नायट्रोजन डायऑक्साइडमुळे आम्ल-वर्षा निर्माण होते. हे सारे परिणाम पर्यावरणाची हानी करतात.
- जीवाश्म इंधने मर्यादित स्वरूपात आहेत आणि त्यांचे साठे तयार होण्यासाठी लाखो वर्षे लागली आहेत, त्यांचा अधिकाधिक शोध घेताना पर्यावरणावर परिणाम आणि सागरी प्रदूषण होते.
- अणू ऊर्जा निर्मितीत आण्विक कचऱ्याच्या विल्हेवाटीची समस्या निर्माण होते. तसेच, अपघात खूप मोठ्या प्रमाणावर संहार करू शकतात. जलसाठ्यापासून विद्युतनिर्मिती, पवन ऊर्जेपासून विद्युतनिर्मिती, सौर ऊर्जेपासून विद्युतनिर्मिती, जैविक इंधनापासून विद्युतनिर्मिती अशा काही मागांनी विद्युतनिर्मिती होऊ शकते. अशा प्रक्रिया पर्यावरणास हानी पोहोचवत नाहीत.
shaalaa.com
विद्युत निर्मिती प्रक्रिया व पर्यावरण
Is there an error in this question or solution?