English

टिपा लिहा. वर्तमानपत्रांचे स्वातंत्र्यसंग्रामातील कार्य - History and Political Science [इतिहास व राज्यशास्त्र]

Advertisements
Advertisements

Question

टिपा लिहा.

वर्तमानपत्रांचे स्वातंत्र्यसंग्रामातील कार्य

Short Note

Solution

१. भारतात इंग्रजांचे आगमन झाल्यावर वर्तमानपत्रे सुरू झाली व ती माहितीच्या आणि ज्ञानाच्या प्रसाराची साधने झाली.

२. स्वातंत्र्यपूर्वकाळातील काही नेत्यांनी सुरू केलेल्या वर्तमानपत्रांनी स्वातंत्र्यसंग्रामात महत्त्वाची भूमिका बजावली. समाजप्रबोधनाचे कार्य करणार्या वर्तमानपत्रांनी स्वातंत्र्यसंग्रामात माहितीचा प्रसार करून जनतेला जागृत करण्याचे अत्यंत महत्त्वाचे कार्य केले.

अ. 'दर्पण' या अंकाने तत्कालीन राजकीय, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक परिस्थिती लोकांसमोर मांडली.

ब. 'ज्ञानोदय' या वर्तमानपत्राने '१८५७ च्या संघर्षा'च्या बातम्या छापल्या.

क. बहुजन समाजाची समकालीन परिस्थिती 'दीनबंधू' या वृत्तपत्रातून मांडली गेली.

ड. 'केसरी' आणि 'मराठा' या वर्तमानपत्रांनी तत्कालीन सामाजिक व राजकीय प्रश्नांना वाचा फोडली.

shaalaa.com
प्रसारमाध्यमांची आवश्यकता
  Is there an error in this question or solution?
Chapter 1.5: प्रसारमाध्यमे आणि इतिहास - संक्षिप्त उत्तरे १

APPEARS IN

SCERT Maharashtra History and Civics [Marathi] 10 Standard SSC
Chapter 1.5 प्रसारमाध्यमे आणि इतिहास
संक्षिप्त उत्तरे १ | Q २ (ब) १.
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×