Advertisements
Advertisements
प्रश्न
टिपा लिहा.
वर्तमानपत्रांचे स्वातंत्र्यसंग्रामातील कार्य
उत्तर
१. भारतात इंग्रजांचे आगमन झाल्यावर वर्तमानपत्रे सुरू झाली व ती माहितीच्या आणि ज्ञानाच्या प्रसाराची साधने झाली.
२. स्वातंत्र्यपूर्वकाळातील काही नेत्यांनी सुरू केलेल्या वर्तमानपत्रांनी स्वातंत्र्यसंग्रामात महत्त्वाची भूमिका बजावली. समाजप्रबोधनाचे कार्य करणार्या वर्तमानपत्रांनी स्वातंत्र्यसंग्रामात माहितीचा प्रसार करून जनतेला जागृत करण्याचे अत्यंत महत्त्वाचे कार्य केले.
अ. 'दर्पण' या अंकाने तत्कालीन राजकीय, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक परिस्थिती लोकांसमोर मांडली.
ब. 'ज्ञानोदय' या वर्तमानपत्राने '१८५७ च्या संघर्षा'च्या बातम्या छापल्या.
क. बहुजन समाजाची समकालीन परिस्थिती 'दीनबंधू' या वृत्तपत्रातून मांडली गेली.
ड. 'केसरी' आणि 'मराठा' या वर्तमानपत्रांनी तत्कालीन सामाजिक व राजकीय प्रश्नांना वाचा फोडली.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
टीपा लिहा.
प्रसारमाध्यमांची आवश्यकता
पुढील विधान सकारण स्पष्ट करा.
वर्तमानपत्रांना इतिहास विषयाची गरज भासते.
पुढील विधान सकारण स्पष्ट करा.
वर्तमानपत्र हे माहितीच्या आणि ज्ञानाच्या प्रचाराचे साधन झाले आहे.
पुढील विधान सकारण स्पष्ट करा.
वर्तमानपत्र हे समाजप्रबोधनाचे कार्य करणारे महत्त्वाचे माध्यम होते.
प्रसार माध्यमांची आवश्यकता स्पष्ट करा.