Advertisements
Advertisements
Question
तळवेल येथील शेतकरी श्री. दिनेश यांच्या आयताकृती शेतीची लांबी ही रुंदीच्या दुपटीपेक्षा 10 मीटरने अधिक आहे. त्यांनी त्या शेतात पावसाचे पाणी पुनर्भरणासाठी शेताच्या रुंदीच्या `1/3` पट बाजू असणाऱ्या चौरसाकृती शेततळ्याची निर्मिती केली. तेव्हा मूळ शेताचे क्षेत्रफळ हे शेततळ्याच्या क्षेत्रफळाच्या 20 पट होते, तर त्या शेताची लांबी आणि रुंदी, तसेच शेततळ्याच्या बाजूची लांबी काढा.
Solution
समजा, आयताकृती शेताची रुंदी x मीटर आहे.
आयताकृती शेताची लांबी रुंदीच्या दुपटीपेक्षा 10 मीटर अधिक आहे.
∴ आयताकृती शेताची लांबी = (2x + 10) मीटर
आयताकृती शेताचे क्षेत्रफळ = लांबी × रुंदी
`= (2x + 10) × x`
= (2x2 + 10x) चौमीटर
शेततळ्याची बाजू शेताच्या रुंदीच्या `1/3` पट आहे.
∴ चौरसाकृती शेततळ्याची बाजू = `x/3` मीटर
∴ चौरसाकृती शेततळ्याचे क्षेत्रफळ = (बाजू)2
`= (x/3)^2` मीटर
`= x^2/9` मीटर
दिलेल्या अटीनुसार, शेताचे क्षेत्रफळ हे शेततळ्याच्या क्षेत्रफळाच्या 20 पट आहे.
आयताकृती शेताचे क्षेत्रफळ = 20 × शेततळ्याचे क्षेत्रफळ
∴ 2x2 + 10x = 20 `xx (x^2/9)`
∴ `x^2 + 5x = (10x^2)/9` ...[दोन्ही बाजूंना 2 ने भागून]
∴ 9x2 + 45x = 10x2 .....[दोन्ही बाजूंना 9 ने गुणून]
∴ x2 – 45x = 0
∴ x(x – 45) = 0
जर दोन संख्यांचा गुणाकार शून्य असेल, तर त्या दोन संख्यांपैकी किमान एक संख्या शून्य असते, या गुणधर्माच्या उपयोजनाने,
∴ x = 0 किंवा x – 45 = 0
∴ x = 0 किंवा x = 45
परंतु, आयताकृती शेताची रुंदी शून्य असू शकत नाही.
∴ x = 45
∴ आयताकृती शेताची लांबी = 2x + 10
= 2(45) + 10 = 100 मीटर
शेततळ्याची बाजू = `x/3 = 45/3 = 15` मीटर
∴ आयताकृती शेताची लांबी आणि रुंदी, तसेच शेततळ्याची बाजू अनुक्रमे 100 मीटर, 45 मीटर व 15 मीटर आहे.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
विवेक, हा किशोरपेक्षा 5 वर्षांनी मोठा असून त्यांच्या वयांच्या गुणाकार व्यस्तांची बेरीज `1/6` आहे, तर त्यांची आजची वये काढा.
श्री. मधुसूदन यांच्या संत्राबागेत आडव्या रांगेतील झाडांची संख्या, उभ्या रांगेतील झाडांच्या संख्येपेक्षा 5 ने अधिक आहे. जर संत्राबागेत एकूण 150 झाडे असतील, तर आडव्या तसेच उभ्या रांगेतील झाडांची संख्या किती? खालील प्रवाहआकृतीच्या आधारे उदाहरण सोडवा.
सुयशला गणिताच्या पहिल्या चाचणीत मिळालेल्या गुणांपेक्षा दुसऱ्या चाचणीत 10 गुण अधिक मिळाले. दुसऱ्या चाचणीतील गुणांची 5 पट ही पहिल्या चाचणीतील गुणांच्या वर्गाइतकी आहे, तर त्याचे पहिल्या चाचणीतील गुण किती?
एका नदीत, बोटीने प्रवाहाच्या विरुद्ध 36 किमी जाऊन परत त्याच जागी येण्यास प्रतीकला 8 तास लागतात. बोटीचा संथ पाण्यातील वेग ताशी 12 किमी असल्यास नदीच्या प्रवाहाचा वेग काढा.
पिंटूला एक काम करण्यासाठी निशूपेक्षा ६ दिवस अधिक लागतात. दोघांनी मिळून काम केल्यास ते काम पूर्ण करण्यासाठी त्यांना ४ दिवस लागतात, तर ते काम एकट्यानेच पूर्ण करण्यास प्रत्येकास किती दिवस लागतील?
460 या संख्येला एका नैसर्गिक संख्येने भागल्यास भागाकार भाजकाच्या 5 पटीपेक्षा 6 ने अधिक येत असून बाकी 1 येते, तर भागाकार व भाजक किती?
मुकुंदजवळ सागरपेक्षा 50 रुपये अधिक आहेत. त्यांच्याजवळील रकमांचा गुणाकार 15,000 असेल, तर प्रत्येकाजवळील रक्कम किती?
एका बागेत 200 झाडे असून प्रत्येक रांगेतील झाडांची संख्या ओळीच्या संख्येपेक्षा 10 ने जास्त आहे, तर प्रत्येक रांगेतील झाडांची संख्या काढा.
460 या संख्येला एका नैसर्गिक संख्येने भागल्यास भागाकार भाजकाच्या 9 पटीपेक्षा 2 ने अधिक येत असून बाकी 5 येते, तर भागाकार व भाजक किती?
पाच क्रमागत नैसर्गिक संख्यांच्या वर्गाची बेरीज 1455 आहे, तर त्या संख्या शोधा.