Advertisements
Advertisements
Question
तुमच्या मित्राच्या/मैत्रिणीच्या चतुरपणाचे कौतुक झाल्याचा प्रसंग घरी व वर्गात सांगा.
Solution
मीनाची चतुराई
माझी वर्गमैत्रीण मीनाला फार हुशार मुलगी म्हणून सगळे ओळखतात. एकदा तिचे आईवडील नातेवाईकांकडे गेले होते, तेव्हा ती घरी एकटीच होती. सायंकाळी झाली तेव्हा कोणीतरी दार ठोठावले. मीनाने दार उघडताच दोन भुरटे चोर घरात घुसले. त्यांनी मीनाला चाकू दाखवून दागिने कुठे ठेवले आहेत ते विचारले. मीनाने त्यांना कपाटाच्या खोलीत नेले. चोरांनी कपाटात दागिने शोधायला सुरुवात करताच मीनाने धावत बाहेर येऊन त्या खोलीचा दरवाजा लावून घेतला. शेजारच्या काका-काकूंना पटकन सत्य परिस्थिती सांगितली. त्यांनी लगेच पोलिसांना फोन लावला. त्यांना वाटले, की चोरांनी एव्हाना दागिने चोरले असतील; पण मीनाने त्यांना मुद्दाम चुकीच्या खोलीत नेले होते. त्या कपाटात दागिनेच नव्हते. त्यामुळे, चोर खूप वेळ दागिने शोधण्यात गुंग झाले. तोवर आजूबाजूचे इतर लोक तेथे जमले होते. चोरांनी तिथून पळून जाण्याचाही खूप प्रयत्न केला. परंतु, दरवाजा बाहेरून बंद असल्याने त्यांना ते शक्य झाले नाही. थोड्याच वेळात पोलीसही तेथे हजर झाले व त्यांनी चोरांना ताब्यात घेतले. या प्रसंगावधानीपणामुळे पोलिसांनी, शेजारच्यांनी, आईवडिलांनी मीनाच्या चतुराईचे खूप कौतुक केले.
RELATED QUESTIONS
का ते लिहा.
मुलाने बाळाला मांडीवर घेतले.
खालील शब्दासारखे दोन-दोन शब्द लिहा.
लुकलुक -
कोणकोणत्या गोष्टींमध्ये संशोधन व्हावे असे तुम्हांला वाटते? विचार करा व लिहा.
चर्नी रोड उद्यानात केळूस्कर गुरुजी कशासाठी येत?
डॉ. आंबेडकरांनी कोणता नावलौकिक मिळवला?
खालील खेळ खेळण्यासाठी आवश्यक असणाऱ्या वस्तू/गोष्टी लिहा.
कबड्डी -
एक-दोन वाक्यांत उत्तरे लिहा.
नदीचे पाणी गढूळ का झाले?
एक-दोन वाक्यांत उत्तरे लिहा.
उत्कृष्ट दर्जाची मूर्ती कोणती?
दोन-तीन वाक्यांत उत्तरे लिहा.
गाईचे डोळे का पाणावले?
कोण ते सांगा.
जंगलात राहणारे -