Advertisements
Advertisements
Question
तुमच्या शब्दांत उत्तरे लिहा.
‘तन सुदृढ’ आणि ‘मन विशाल’ या शब्दसमूहांचा तुम्हांला कळलेला अर्थ लिहा.
Solution
प्रभात या कवितेत कवी किशोर बळी यांनी नव्या विज्ञान-तंत्रज्ञानाच्या युगात आपण सर्वत्र उपलब्ध असणाऱ्या ज्ञानाचा सदुपयोग करून आपल्यातील कलागुणांचा विकास घडवावा व भेदाभेद मिटवून देशाला प्रगतिपथावर न्यावे असा संदेश दिला आहे. त्यासाठी आपले अस्तित्व मजबूत, सामर्थ्यशाली करायला हवे. आपण कलागुणांनी संपन्न असू, ज्ञानवान असू तरच आपले व्यक्तिमत्त्व संपन्न होईल. आपल्या अस्तित्वाचा पाया भक्कम करणाऱ्या, आपल्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास करणाऱ्या या जगात आपले तन म्हणजे शरीर निरोगी राहते. आपली विचार करण्याची, काम करण्याची पद्धत सर्वांचा विचार करून, सर्वांना सामावून घेणारी बनत जाते. मन विशाल, व्यापक बनते, म्हणून कवीने वरील शब्दसमूह वापरले आहेत, असे मला वाटते.
RELATED QUESTIONS
खालील प्रश्नाचे एका वाक्यात उत्तर लिहा.
प्रगतीची नवपरिभाषा कोणती?
चौकटीतील शब्दाचा आधार घेऊन उत्तर लिहा.
अमूल्य शिकवण → | कोणाची | ______ |
चौकटीतील शब्दाचा आधार घेऊन उत्तर लिहा.
पायाभरणी → | कशाची | ______ |
तुमच्या शब्दांत उत्तरे लिहा.
‘मिटवून सारे भेद चला रे मानवतेच्या युगात’ या ओळीचा तुम्हांला कळलेला सरळ अर्थ लिहा.
खालील अर्थाचे कवितेतील शब्द शोधा.
इच्छा -
खालील कवितेच्या ओळीतील भाव तुमच्या शब्दांत लिहा.
आभाळाची अम्ही लेकरे, काळी माती आई
जात वेगळी नाही आम्हा धर्म वेगळा नाही।।
योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा.
झुळकेला स्वैर झुकावे वाटते, कारण ______.
एक ते दोन शब्दात उत्तरे लिहा.
झुळकेचा विश्रांतीचा प्रहर-
एक ते दोन शब्दात उत्तरे लिहा.
झुळकेने भेट दिलेली नैसर्गिक ठिकाणे-
स्वमत.
'दुसऱ्यासाठी घाव सोसणे' या ओळीतील तुम्हांला कळलेला अर्थ.