Advertisements
Advertisements
Question
स्वमत.
'दुसऱ्यासाठी घाव सोसणे' या ओळीतील तुम्हांला कळलेला अर्थ.
Solution
'झाड' या निसर्गातील एका महत्त्वाच्या घटकाकडून परोपकारी वृत्ती, स्थितप्रज्ञता या गुणांसोबतच 'दुसऱ्यासाठी घाव सोसण्याची सहनशील वृत्ती' हा गुणही शिकण्यासारखा आहे. झाड सदैव इतरांच्या उपयोगी पडते. ते त्याची जोपासना करणाऱ्याला आणि त्याच्यावर कुऱ्हाड चालवणाऱ्याला दोघांनाही समान वागवते, दोघांनाही मदत करते. झाड स्वत:वर कुऱ्हाड चालवणाऱ्या व्यक्तीचा राग तर करत नाहीच उलट स्वत:चे लाकूड इतरांच्या उपयोगी पडावे याकरता ते स्वत: कुऱ्हाडीचे घावही सहन करते. झाडाचा हा दुसऱ्यासाठी झिजण्याचा, कष्ट सोसण्याचा, स्वत: जखमी होऊन, त्रास सहन करूनही दुसऱ्याला मदतरूप ठरण्याचा गुण वरील ओळींतून स्पष्ट होतो.
RELATED QUESTIONS
खालील प्रश्नाचे एका वाक्यात उत्तर लिहा.
प्रगतीची नवपरिभाषा कोणती?
चौकटीतील शब्दाचा आधार घेऊन उत्तर लिहा.
सुंदर जग → | कोणाचे | ______ |
तुमच्या शब्दांत उत्तरे लिहा.
‘मिटवून सारे भेद चला रे मानवतेच्या युगात’ या ओळीचा तुम्हांला कळलेला सरळ अर्थ लिहा.
कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दाच्या जोड्या शोधून लिहा.
युगात -
खालील अर्थाचे कवितेतील शब्द शोधा.
किनारा -
योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा.
वेळूच्या वनात अलगूज वाजते, कारण ______.
परिणाम लिहा.
झुळकेने कलिकेला स्पर्श केला -
एक ते दोन शब्दात उत्तरे लिहा.
झुळकेने भेट दिलेली नैसर्गिक ठिकाणे-
तुमच्या शब्दात उत्तरे लिहा.
प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण.
निसर्गातील कोणत्याही पाच गोष्टींपासून तुम्हांला काय काय शिकता येईल, याविषयी मित्रांशी चर्चा करा व वर्गात सांगा.