Advertisements
Advertisements
Question
तुमच्या शब्दात उत्तरे लिहा.
प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण.
Solution
कवी दामोदर कारे यांनी लिहिलेली झुळूक ही कविता मला फार फार आवडली. झुळूक झाल्यावर अनुभवायला मिळणाऱ्या गमतीजमतींचे फार सुरेख वर्णन यात आले आहे. एक छोटीशी झुळूकही आपल्या परीने इतरांच्या जीवनात आनंद निर्माण करू शकते, सर्वत्र चैतन्य, उत्साहाचे वातावरण निर्माण करू शकते, हा या कवितेतील विचार मला खूप आवडला. ही कविता वाचताना, म्हणताना प्रत्येक शब्दाशब्दात एक ताल, नाद निर्माण होतो. त्यामुळे, कविता लगेच पाठ होते व तालासुरात म्हणायलाही गंमत येते. कवीने वर्णन केलेल्या प्रत्येक गोष्टीचे चित्र डोळ्यांसमोर साकार होते. कवीने केलेल्या सर्व कल्पना फारच मनोरंजक आहेत. हे वर्णन वाचून झुळुक जणू काही एक व्यक्ती म्हणून आपल्यासमोर येऊन स्वत:चे मनोगत व्यक्त करत आहे, असे वाटते. यामुळे, मला ही कविता फार आवडते.
RELATED QUESTIONS
चौकटीतील शब्दाचा आधार घेऊन उत्तर लिहा.
सुंदर जग → | कोणाचे | ______ |
तुमच्या शब्दांत उत्तरे लिहा.
‘मिटवून सारे भेद चला रे मानवतेच्या युगात’ या ओळीचा तुम्हांला कळलेला सरळ अर्थ लिहा.
कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दाच्या जोड्या शोधून लिहा.
अस्तित्वाची-
कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दाच्या जोड्या शोधून लिहा.
युगात -
'आभाळाची अम्ही लेकरे' या कवितेतील ऐक्याचा संदेश देणाऱ्या काव्यपंक्ती लिहा.
'आभाळाची अम्ही लेकरे' कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दांच्या जोड्या शोधून लिहा.
आकृती पूर्ण करा.
परिणाम लिहा.
बकुळीच्या फुलांना स्पर्श केला-
आकृती पूर्ण करा.
कवितेच्या आधारे खालील तक्ता पूर्ण करा.
कवीला जगणे शिकवणारे घटक | या घटकांपासून कवी काय शिकले |
(अ) चंद्र, चांदणे | (अ) |
(आ) पणती | (आ) |
(इ) नदी | (इ) |
(ई) पक्षी | (ई) |
(उ) सागर | (उ) |
(ऊ) वृक्ष | (ऊ) |