English
Maharashtra State BoardSSC (English Medium) 8th Standard

तुमच्या शब्दात उत्तरे लिहा. झुळुकेची परोपकारी वृत्ती. - Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

Question

तुमच्या शब्दात उत्तरे लिहा.

झुळुकेची परोपकारी वृत्ती.

Short Answer

Solution

कवितेतील मुलाला झुळूक बनायचे आहे. झुळूक बनून मन ओढ घेईल तिथे त्याला स्वच्छंदपणे विहरायचे आहे. बाजारात, नदीकाठी, बागेत, अगदी पडक्या वाड्यापाठीही त्याला फेरफटका मारायचा आहे; पण अशा विविध गमतीजमती करता करता त्याला झुळूक बनून इतरांना उपयोगी ठरतील अशीही कामे करायची आहेत.

त्या झुळूकेला बागेत जाऊन कळीला हळूवार स्पर्श करायचा आहे. तिच्या या कृतीने कळी फुलणार आहे व तिचे फूल बनल्यावर त्यातील सुगंध सोबत नेऊन झुळकीला तो सर्वत्र उधळून द्यायचा आहे, वातावरण सुगंधी करायचे आहे. इतरांतील चांगुलपणाचा दरवळ सर्वत्र पसरवून एखादे चांगले काम करण्याची, इतरांना मदत करण्याची झुळकेची वृत्ती यातून दिसून येते.

याशिवाय, झुळकेला झऱ्याचा झुळझुळ असा मंजुळ नाद, गाण्याची एखादी अर्धवट गुणगुणलेली तान सर्वत्र पसरवायची आहे. शेतावरून व नदीवरून तरंग उठवत जायचे आहे. आपल्या हळूवार स्पर्शाने त्यांच्यातही चैतन्य निर्माण करायचे आहे. हीच झुळूक बांबूच्या वनातून बासरीसमान स्वर निर्माण करत, शेतातील कणसांना स्पर्श करत, बकुळफुले डोहात शिंपत व जांभळांचा नदीकाठावर सडा पाडत जाणार आहे. म्हणजे, ही झुळूक जिथे जाईल तिथे आनंद निर्माण करणार आहे.

दिवसभर अथक परिश्रम करून, थकूनभागून येणाऱ्या व्यक्तीचा शीण, थकवा घालवण्यासाठी ती त्याच्या चेहऱ्याला स्पर्श करून त्याला प्रसन्न, ताजेतवाने करणार आहे. एखाद्याच्या आयुष्यात चैतन्य, आनंद, उत्साह, आशा, नवी उमेद भरण्याचे कार्य करणारी अशी ही झुळूक नक्कीच परोपकारी वृत्तीची आहे असे मला वाटते.

shaalaa.com
पद्य (8th Standard)
  Is there an error in this question or solution?
Chapter 9: झुळूक - खेळूया शब्दांशी [Page 34]

APPEARS IN

Balbharati Marathi - Sulabhbharati 8 Standard Maharashtra State Board
Chapter 9 झुळूक
खेळूया शब्दांशी | Q (इ)(अ) | Page 34
Balbharati Integrated 8 Standard Part 3 [English Medium] Maharashtra State Board
Chapter 2.2 झुळूक (कविता)
खेळूया शब्दांशी | Q (इ) (अ) | Page 29

RELATED QUESTIONS

चौकटीतील शब्दाचा आधार घेऊन उत्तर लिहा.

सुंदर जग → कोणाचे ______

चौकटीतील शब्दाचा आधार घेऊन उत्तर लिहा.

पसरणारा सुवास → कशाचा ______

कवितेच्या आधारे योग्य पर्याय निवडा.

कवीच्या मते ‘मानवतेचे युग’ म्हणजे -


कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दाच्या जोड्या शोधून लिहा.

नभात- 


खालील अर्थाचे कवितेतील शब्द शोधा.

आकाश -


खालील कवितेच्या ओळीतील भाव तुमच्या शब्दांत लिहा.

इमान आम्हा एकच ठावे 
घाम गाळुनी काम करावे


आकृती पूर्ण करा.


योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा.

वेळूच्या वनात अलगूज वाजते, कारण ______.


खालील शब्दसमूहाचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.

चुकलीमुकली लकेर -


एक ते दोन शब्दात उत्तरे लिहा.

झुळकेने भेट दिलेली नैसर्गिक ठिकाणे-


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×