Advertisements
Advertisements
Question
खालील कवितेच्या ओळीतील भाव तुमच्या शब्दांत लिहा.
इमान आम्हा एकच ठावे
घाम गाळुनी काम करावे
Solution
'आभाळाची अम्ही लेकरे' या कवी वसंत बापट यांच्या कवितेत कवीने कष्टकऱ्यांचे जीवन मांडले आहे.
कष्टकरी ही निसर्गाची लेकरे आहेत. कष्ट करणे हाच त्यांचा धर्म आहे. परिश्रम केल्यावरच फळ मिळते; परंतु हे कष्ट, परिश्रम चिकाटीने व श्रद्धेने सतत करावे लागतात. कष्टकरी या कष्टांवर विश्वास ठेवतात. श्रद्धेने घाम गाळून काम करतात. त्यांचे इमान, त्यांची निष्ठा कष्टांनाच वाहिलेली असते. कष्ट करणे हेच त्यांचे ध्येय असते. घाम येईपर्यंत अखंड, अविरत कष्ट करत राहणे, हे कष्टाचे व्रत कष्टकरी श्रद्धेने पाळतात, हे प्रस्तुत ओळींतून कवीला सांगायचे आहे.
RELATED QUESTIONS
कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दाच्या जोड्या शोधून लिहा.
मनोहर -
खालील अर्थाचे कवितेतील शब्द शोधा.
इच्छा -
खालील अर्थाचे कवितेतील शब्द शोधा.
अखंड -
'आभाळाची अम्ही लेकरे' या कवितेतील ‘आत्मविश्वास’ व्यक्त करणाऱ्या काव्यपंक्ती लिहा.
‘माणुसकीचे अभंग नाते अम्हीच अमुचे भाग्यविधाते’ या काव्यपंक्तीतून कवीने सूचित केलेला विचार तुमच्या शब्दांत मांडा.
आकृती पूर्ण करा.
योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा.
झुळकेला स्वैर झुकावे वाटते, कारण ______.
परिणाम लिहा.
बकुळीच्या फुलांना स्पर्श केला-
तुमच्या शब्दात उत्तरे लिहा.
प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण.
स्वमत.
‘बिनभिंतीची शाळा, लाखो इथले गुरु’, हा विचार तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.