Advertisements
Advertisements
Question
‘माणुसकीचे अभंग नाते अम्हीच अमुचे भाग्यविधाते’ या काव्यपंक्तीतून कवीने सूचित केलेला विचार तुमच्या शब्दांत मांडा.
Solution
'आभाळाची अम्ही लेकरे' या कवितेतील प्रस्तुत काव्यपंक्तींद्वारे कवी वसंत बापट यांना कष्टकऱ्यांमधील माणुसकीचे नाते अधोरेखित करायचे आहे.
आपापसांतील माणुसकीचे नाते अखंड टिकून असल्यामुळे कष्टकरी वर्गात कोणत्याच प्रकारचा भेदभाव नाही. 'श्रम' करणे हेच त्यांचे इमान आहे. कष्टावरच त्यांची निष्ठा आहे. कष्ट हीच त्यांची ओळख, कष्ट हाच धर्म आहे. कष्ट करून आपले पोट भरणे हाच त्यांचा मार्ग आहे. कष्टातून मिळणारा आनंद हेच त्यांच्यासाठी स्वर्गसुख आहे. त्यामुळे, कष्टाशिवाय त्यांना वेगळा असा दुसरा धर्म, पंथ, जात, मार्ग नाही. या कष्टांच्या बळावरच ते स्वत:चे भाग्य लिहू शकतात, असा दुर्दम्य आत्मविश्वास कवी प्रस्तुत ओळींतून व्यक्त करत आहे.
RELATED QUESTIONS
खालील प्रश्नाचे एका वाक्यात उत्तर लिहा.
कवीने वर्णिलेली प्रतिभेची प्रभात कुठे होणार आहे?
चौकटीतील शब्दाचा आधार घेऊन उत्तर लिहा.
सुंदर जग → | कोणाचे | ______ |
कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दाच्या जोड्या शोधून लिहा.
अस्तित्वाची-
कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दाच्या जोड्या शोधून लिहा.
युगात -
'आभाळाची अम्ही लेकरे' या कवितेतील ऐक्याचा संदेश देणाऱ्या काव्यपंक्ती लिहा.
खालील कवितेच्या ओळीतील भाव तुमच्या शब्दांत लिहा.
इमान आम्हा एकच ठावे
घाम गाळुनी काम करावे
एक ते दोन शब्दात उत्तरे लिहा.
झुळकेने भेट दिलेली नैसर्गिक ठिकाणे-
तुमच्या शब्दात उत्तरे लिहा.
झुळुकेची परोपकारी वृत्ती.
आकृती पूर्ण करा.
कवितेच्या आधारे खालील तक्ता पूर्ण करा.
कवीला जगणे शिकवणारे घटक | या घटकांपासून कवी काय शिकले |
(अ) चंद्र, चांदणे | (अ) |
(आ) पणती | (आ) |
(इ) नदी | (इ) |
(ई) पक्षी | (ई) |
(उ) सागर | (उ) |
(ऊ) वृक्ष | (ऊ) |