Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील कवितेच्या ओळीतील भाव तुमच्या शब्दांत लिहा.
इमान आम्हा एकच ठावे
घाम गाळुनी काम करावे
उत्तर
'आभाळाची अम्ही लेकरे' या कवी वसंत बापट यांच्या कवितेत कवीने कष्टकऱ्यांचे जीवन मांडले आहे.
कष्टकरी ही निसर्गाची लेकरे आहेत. कष्ट करणे हाच त्यांचा धर्म आहे. परिश्रम केल्यावरच फळ मिळते; परंतु हे कष्ट, परिश्रम चिकाटीने व श्रद्धेने सतत करावे लागतात. कष्टकरी या कष्टांवर विश्वास ठेवतात. श्रद्धेने घाम गाळून काम करतात. त्यांचे इमान, त्यांची निष्ठा कष्टांनाच वाहिलेली असते. कष्ट करणे हेच त्यांचे ध्येय असते. घाम येईपर्यंत अखंड, अविरत कष्ट करत राहणे, हे कष्टाचे व्रत कष्टकरी श्रद्धेने पाळतात, हे प्रस्तुत ओळींतून कवीला सांगायचे आहे.
संबंधित प्रश्न
चौकटीतील शब्दाचा आधार घेऊन उत्तर लिहा.
सुंदर जग → | कोणाचे | ______ |
कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दाच्या जोड्या शोधून लिहा.
नभात-
कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दाच्या जोड्या शोधून लिहा.
अस्तित्वाची-
'आभाळाची अम्ही लेकरे' या कवितेतील ‘आत्मविश्वास’ व्यक्त करणाऱ्या काव्यपंक्ती लिहा.
खालील कवितेच्या ओळीतील भाव तुमच्या शब्दांत लिहा.
आभाळाची अम्ही लेकरे, काळी माती आई
जात वेगळी नाही आम्हा धर्म वेगळा नाही।।
आकृती पूर्ण करा.
योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा.
वेळूच्या वनात अलगूज वाजते, कारण ______.
एक ते दोन शब्दात उत्तरे लिहा.
झुळकेचा विश्रांतीचा प्रहर-
एक ते दोन शब्दात उत्तरे लिहा.
कवितेतील वर्णनावरून कवीने वर्णन केलेला ऋतू -
तुमच्या शब्दात उत्तरे लिहा.
प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण.