Advertisements
Advertisements
प्रश्न
तुमच्या शब्दात उत्तरे लिहा.
प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण.
उत्तर
कवी दामोदर कारे यांनी लिहिलेली झुळूक ही कविता मला फार फार आवडली. झुळूक झाल्यावर अनुभवायला मिळणाऱ्या गमतीजमतींचे फार सुरेख वर्णन यात आले आहे. एक छोटीशी झुळूकही आपल्या परीने इतरांच्या जीवनात आनंद निर्माण करू शकते, सर्वत्र चैतन्य, उत्साहाचे वातावरण निर्माण करू शकते, हा या कवितेतील विचार मला खूप आवडला. ही कविता वाचताना, म्हणताना प्रत्येक शब्दाशब्दात एक ताल, नाद निर्माण होतो. त्यामुळे, कविता लगेच पाठ होते व तालासुरात म्हणायलाही गंमत येते. कवीने वर्णन केलेल्या प्रत्येक गोष्टीचे चित्र डोळ्यांसमोर साकार होते. कवीने केलेल्या सर्व कल्पना फारच मनोरंजक आहेत. हे वर्णन वाचून झुळुक जणू काही एक व्यक्ती म्हणून आपल्यासमोर येऊन स्वत:चे मनोगत व्यक्त करत आहे, असे वाटते. यामुळे, मला ही कविता फार आवडते.
संबंधित प्रश्न
चौकटीतील शब्दाचा आधार घेऊन उत्तर लिहा.
सुंदर जग → | कोणाचे | ______ |
कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दाच्या जोड्या शोधून लिहा.
युगात -
खालील शब्दांसाठी कवितेतील शब्द शोधा.
(अ) आकाश-
(आ) सुगंध-
(इ) सुंदर-
(ई) शरीर-
खालील अर्थाचे कवितेतील शब्द शोधा.
अखंड -
परिणाम लिहा.
बकुळीच्या फुलांना स्पर्श केला-
खालील शब्दसमूहाचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.
चुकलीमुकली लकेर -
एक ते दोन शब्दात उत्तरे लिहा.
झुळकेचा विश्रांतीचा प्रहर-
एक ते दोन शब्दात उत्तरे लिहा.
कवितेतील वर्णनावरून कवीने वर्णन केलेला ऋतू -
स्वमत.
‘बिनभिंतीची शाळा, लाखो इथले गुरु’, हा विचार तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
निसर्गातील कोणत्याही पाच गोष्टींपासून तुम्हांला काय काय शिकता येईल, याविषयी मित्रांशी चर्चा करा व वर्गात सांगा.