Advertisements
Advertisements
प्रश्न
‘तुम्ही पक्षी आहात’, अशी कल्पना करून तुम्हांला स्वच्छंदीपणे कोणकोणत्या गोष्टी करायला आवडतील, ते लिहा.
उत्तर
त्या दिवशी बाई ग्रेस कवींची 'पाऊसगाणे' ही कविता शिकवत होत्या. कवितेच्या शेवटच्या ओळी होत्या, 'जाता येता टाकीत होता तो चिमण्यांना दाणे'. चिमणीची एक सुंदर गोष्ट बाईंनी सांगितली. ती ऐकत असतानाच मला असे वाटले, की जणू मीच पक्षी झाले आहे..... आणि मग हे वेडं मनपाखरू आपल्या कल्पनांच्या आभाळात विहार करू लागलं आणि पाहता पाहता मी भुर्रकन खिडकीतून उडालेच.
मग मी ऐटीत माझा दिनक्रम निश्चित केला. सकाळी उठल्याबरोबर बाहेर उनाडायचे, म्हणजे कपडे बदलणं, चपला घालणं या गोष्टी करायची गरजच नाही. खिडकीतून थेट आकाशात झेप घेऊन फेरफटका मारायला खूप मजा येईल. मग एक फेरफटका मारून म्हणजे, की शाळेची तयारी करून उडतच शाळेत जायचं. म्हणजे शाळेला उशीर होणार नाही. थेट फांदीवरील वर्गाच्या खिडकीवरच आमचं विमान उतरेल. वर जाता जाता शाळेतल्या आंब्याच्या झाडावरच्या हिरव्यागार कैऱ्या चक्क चोचीने चाखता येतील. आम्हां पक्ष्यांच्या या शाळेत कोकिळाबाई, चिऊताई व मैनाबाई मला गाणे शिकवतील. कावळेदादा कावकाव करून माझा अभ्यास घेतील. मोर मला नाचायला शिकवेल. सुगरण घरटं बांधायला शिकवेल. मी सारं काही मन लावून शिकेन. शारीरिक शिक्षणाच्या तासाला तर माझ्या आकाशातल्या करामतींनी मी सगळ्या पक्ष्यांनाही अवाक् करून टाकीन आणि शिक्षा झाली तर ..... अहो शिक्षाही मला पाच फेऱ्या मारण्याची असेल म्हणजे माझ्या 'पंखांचा मळ'! मी दर रविवारी एक सहल करेन कारण सहलीच्या ठिकाणी जायला वाहन नको किंवा तिकीट नको.
पण खरंच, देवाने प्रत्येकाला काही ना काही असं विशेष दिलेलं आहे. माणसाला बुद्धी दिली, पक्ष्यांना पंख दिले, हत्तीला ताकद दिली, तर सरड्याला रंग दिले, सूर्याला प्रकाश दिला आणि प्रत्येकाकडे ते सारं कसं अगदी शोभून दिसते. आकाशात झेप घेणारा पक्षी किती सुंदर आणि प्रेरणादायी वाटतो. ती सर आपल्याला नाही येणार. म्हणूनच, 'ठेविले अनंते तैसेचि रहावे चित्ती असो द्यावे समाधान' देवाने आपल्याला छान घर दिले आहे. प्रेमळ आई-बाबा दिले आहेत. छान शाळा आणि भरपूर सवंगडी दिले आहेत. तेव्हा आपले पाय मातीतच घट्ट रोवलेले उत्तम, असा विचार करून मी माझे मनपाखरू परत जमिनीवर आणले.
संबंधित प्रश्न
खालील जाहिरातीचे वाचन व निरीक्षण करून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा.
(अ) उत्तरे लिहा.
- जाहिरातीचा विषय -
- जाहिरात देणारे (जाहिरातदार) -
- वरील जाहिरातीत सर्वांत जास्त आकर्षित करून घेणारा घटक -
- जाहिरात कोणासाठी आहे?
(आ) वरील जाहिरात अधिक आकर्षक होण्यासाठी त्यात कोणकोणत्या घटकांचा समावेश असावा, असे तुम्हांला वाटते?
(इ) तुमच्या मते जाहिरातीमधील महत्त्वाची वैशिष्ट्ये.
तुमच्या शाळेत सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम पाहण्यासाठी पालकांना आवाहन करणारा सूचनाफलक तयार करा.
खालील सूचना वाचा. अशा आणखी सूचना तयार करा.
- नदीच्या पाण्यात केरकचरा, निर्माल्य टाकू नये.
- ओला कचरा, सुका कचरा ठेवा वेगवेगळा, तरच प्रदूषणाला बसेल आळा.
दवाखान्याच्या ठिकाणी लावलेल्या पाट्या वाचा. त्या पाट्यांमध्ये आपल्याला सूचना दिलेल्या असतात. या सूचनांव्यतिरिक्त आणखी काही सूचनांच्या पाट्या तुम्ही तयार करा.
खालील उतारा वाचा. त्या उताऱ्यात पूर्णविराम (.) स्वल्पविराम (,) प्रश्नचिन्ह (?) उद्गारचिन्ह (!) आणि एकेरी अवतरणचिन्ह (‘-’) घाला व उतारा पुन्हा लिहा.
एका छोट्याशा गावात एक सधन शेतकरी राहत होता शेतात काम करणाऱ्या दोन बैलजोड्या त्याच्याकडे होत्या तसेच दोन म्हशीही होत्या आणि एक चांगली धष्टपुष्ट आणि पुष्कळ दूध देणारी कपिला नावाची गायही होती त्यामुळे त्याच्या घरी भरपूर दूधदुभते असे ते दूध तो साऱ्या गावात विकत असे. एकदा अशीच सारी गुरे नीट बांधून तो शेतकरी घरात जाऊन झोपला पण सकाळी उठून पाहतो तो त्याची गाय तिथे नव्हती. अगदी कासावीस झाला तो पांढरा आणि तपकिरी रंग असलेली ती गाय त्याची खूप लाडकी होती. लाेक मुद्दाम गाईचे दूध तूप दही नेत असत आता लाेकांना काय सांगणार काय करावे शेवटी तो शेजारच्या गावी दुसरी गाय विकत आणण्यासाठी गेला बाजार गुरांनी भरून गेला होता निरनिराळ्या रंगांच्या धिप्पाड मध्यम आणि बऱ्यापैकी दूध देणाऱ्या अशा अनेक गाई त्याने पाहिल्या गाई बघत तो असाच पुढे जात असताना एका गाईजवळ येऊन तो थांबला अन काय आश्चर्य कपिलेने त्याच्याकडे पाहिले त्याचे ही डोळे चमकले अरे ही तर आपली गाय कपिला नक्कीच या माणसाने त्या दिवशी माझी गाय चोरून नेली असावी आपल्या गाईच्या पाठीवर त्याने प्रेमाने थाप मारली कपिलेने त्याला ओळखले तिने आनंदाने कान व शिंगे हालवली. |
खालील मुद्यांच्या आधारे अर्थपूर्ण परिच्छेद तयार करा व त्याला योग्य शीर्षक द्या.
सकाळची वेळ ...... बाबांबरोबर फिरायला ...... झाडांवर बसलेले पाखरांचे थवे ...... किलबिल ...... शुद्ध हवा ...... आल्हाददायक वातावरण ...... बाबांशी गप्पा मारत घराकडे परतणे ...... दिवसभर ताजेतवाने वाटणे.
तुमची लाडकी ताई घरात नसली, तर तुम्हांला काय वाटते, ते थोडक्यात सांगा.
‘माझा आवडता मित्र/मैत्रीण’ या विषयावर थोडक्यात माहिती लिहा.
सुट्टीच्या दिवशी मित्रांसोबत तुम्ही कोणकोणते खेळ खेळता?
खालील प्रसंगी तुम्ही काय कराल?
तुमच्या मित्राने/मैत्रिणीने आज डबा आणला नाही.