Advertisements
Advertisements
प्रश्न
तुमच्या शाळेत सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम पाहण्यासाठी पालकांना आवाहन करणारा सूचनाफलक तयार करा.
उत्तर
● सूचनाफलक ● दि. २० फेब्रुवारी विद्यादायिनी शाळा, रामपूर आपणांस कळवण्यास आनंद होत आहे, की दरवर्षीप्रमाणे या वर्षीही दि. २५ फेब्रुवारी रोजी आपल्या शाळेत सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व पालकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून मुलांना प्रोत्साहन द्यावे ही विनंती. मुख्याध्यापक, विद्यादायिनी शाळा, रामपूर |
संबंधित प्रश्न
तुम्ही तुमच्या धाकट्या भावासाठी/बहिणीसाठी कोणकोणत्या भेटवस्तू घेता? कोणकोणत्या प्रसंगी घेता?
तुमच्या परिसरातील एखाद्या अनुभवी शेतकऱ्याची तुम्हांला मुलाखत घ्यायची आहे. त्यासाठी प्रश्नावली तयार करा.
खालील सूचना वाचा. अशा आणखी सूचना तयार करा.
- नदीच्या पाण्यात केरकचरा, निर्माल्य टाकू नये.
- ओला कचरा, सुका कचरा ठेवा वेगवेगळा, तरच प्रदूषणाला बसेल आळा.
‘पाणी हेच जीवन’ यांवर आधारित दहा ओळी लिहा.
खालील चौकटीत दिलेली अपूर्ण गोष्ट पूर्ण करा.
एकदा काय झालं, आपल्या शरीराचे दोन हात, उजवा आणि डावा एक दिवस चक्क भांडायला लागले. उजवा हात म्हणाला, ‘‘आजपासून मी आराम करणार!’’ मग डावा म्हणाला, ‘‘का, काय झालं? तू का आराम करणार?’’ ‘‘मी मोठा आहे, तुझ्यापेक्षा माझा मान जास्त आहे.’’ उजवा हसून म्हणाला, ‘‘वा!वा! म्हणे मी मोठा आहे. अरे, जा मी तुला मोठा मानतच नाही. अरे माझ्याशिवाय पान हालत नाही माहीत आहे का तुला?’’ उजवा हात म्हणाला. दोन्ही हातांचे बराचवेळ भांडण चालले होते. इतकावेळ शांत बसलेले डोके मग रागाने म्हणाले, ‘‘अरे थांबा हे काय चाललंय? तुमच्या दोघांत चांगले काम कोण करतो हेच मी पाहणार आहे.’’ ‘‘हो! हो! पाहाच!’’ उजवा हात म्हणाला. ‘‘ मी पण तयार आहे.’’ डावा म्हणाला. दोन्ही हात तयार झाले. ‘‘चला तर मग, तो पाहा त्या तिथे एक दगड चिखलात रुतून बसलाय. बघू त्याला कोण बाहेर काढतंय.’’ डोक्याने असे म्हणताच उजवा म्हणाला, ‘‘मी काढणार! माझा पहिला नंबर.’’ तेव्हा डावा म्हणाला, ‘‘जा जा! तुझी किती ताकद आहे.’’ डावा असे म्हणताच मोठ्या ऐटीत उजवा निघाला ____________________________________ _________________________________________________________ _________________________________________________________ _________________________________________________________ _________________________________________________________ _________________________________________________________ _________________________________________________________ |
'शब्द' या विषयावर आधारित सुविचार मिळवा. त्यांचा संग्रह करा. त्याची सुंदर चिकटवही बनवा.
अभ्यासाबरोबरच तुम्हांला इतर कोणत्या गाेष्टी करायला आवडतात? का ते लिहा.
सुट्टीच्या दिवशी मित्रांसोबत तुम्ही कोणकोणते खेळ खेळता?
खालील प्रसंगी तुम्ही काय कराल?
शाळेत पिण्याच्या पाण्याचा नळ कोणीतरी विनाकारण सुरू ठेवला.
खालील प्रसंगी तुम्ही काय कराल?
सहलीत तुमचा मित्र किल्ल्याच्या भिंतीवर नावे लिहीत आहे.