Advertisements
Advertisements
प्रश्न
तुमच्या परिसरातील ज्या घरी पाळीव प्राणी आहेत अशा पाच घरांना भेटी द्या. त्या घरातील लोक पाळीव प्राण्यांची काळजी कशी घेतात याची खालील मुद्द्यांच्या आधारे माहिती मिळवा व वर्गात सांगा.
उत्तर
माझा आवडता प्राणी
मला मनीमाऊ खूप आवडतात. मी सातवीत असताना "पिकू" आमच्या घरात एखाद्या पाहुण्यासमान आली. झालं असं, की बाहेर खूप पाऊस पडत होता आणि भर पावसात एक छोटंसं मांजराचं पिल्लू आमच्या दाराशेजारच्या अडचणीच्या जागेत कुडकुडत बसलं होतं. माझं सहज लक्ष गेलं आणि मी आई-बाबांच्या ही गोष्ट लक्षात आणून दिली. मग आम्ही त्याला घरात घेतलं. त्याची काळजी घेतली. त्या दोन दिवसांत मला त्याचा खूप लळा लागला होता, म्हणून मी आई-बाबांकडे हट्ट धरून त्याला कायम घरीच ठेवून घेतले. तेव्हापासून 'पिकू' ही आमच्यासाठी 'वाघाची मावशी' अशी न राहता घरातली हक्काची सदस्य बनली आहे.
तिचा पांढराशुभ्र रंग, मऊ-मऊ अंग, गुलाबीसर ओठ, मिचमिच्या मिशा, जरा खुट्ट झालं, की हलणारे इवले-इवले कान मला खूप आवडतात. ती कधीही घरातली दुधाची भांडी पाडत नाही. घरातल्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास देत नाही. तिला भूक लागली, की तिच्या बशीजवळ जाते, जर आमचं लक्ष नसेल, म्याँव म्याँव करत पायात येते. मग दुधाची व्यवस्था केल्यावर शांतपणे पुढचे व मागचे पाय दुमडून शेपटी मोकळी सोडून तळ्याकाठी पाणी प्यायला आलेल्या वाघाप्रमाणे जिभल्या चाटत ती दूध पिते. तिला दूध पिताना पाहणं म्हणजे आनंदाचा क्षण असतो. कागदावर चित्र काढावंसं वाटतं, छायाचित्रात तिला कैद करावंसं वाटतं.
सुरुवातीला कापसाची गादी अंथरलेली टोपली हेच तिचं घर होतं; पण नंतर आमचं अख्खं घर हेच तिचं हक्काचं घर झालं. आता दिवसभर एखाद्या घरातल्या व्यक्तीप्रमाणे ती बिनधास्त घरभर वावरते. रात्री माझ्या पलंगावर येऊन निजते. आपल्या घरात येणारे उंदीरमामा तिला घाबरूनच जीव मुठीत घेऊन पळतात. आमच्या व आजूबाजूंच्या घरातल्या उंदीरमामांचा फडशा पाडणे हे तिचं आवडतं काम!
ती आल्यापासून घरातलं वातावरण बदललं. तिच्या येण्याने घरात नव्या सदस्याचं आगमन झालं. घरात उत्साह आला, चैतन्य आलं. तिच्या छोट्या छोट्या कृतींनी तिने आमचं मन जिंकलं. ती सर्वांसोबत खेळते, मस्ती करते. खूप माया लावली आहे तिनं. तिचा प्रसन्न चेहरा पाहिला, की थकवा, कंटाळा, ताणतणाव दूर होऊन जातो. घरात कोणी आजारी पडलं, की ही पिकूताई त्याच्याशेजारी जाऊन बसेल, म्याँव म्याँव करून विचारपूस करेल, पंज्यानं थोपटत बसेल. अशी जीव लावणारी पिकू मला खूप आवडते.
ती स्वत: आजारी पडली, की आम्हांला कसंतरी वाटतं. तिचं कण्हणं, केविलवाणं म्याँव म्याँव ऐकलं, की रडायलाच येतं, म्हणून ती आजारी पडू नये यासाठी आम्ही वेळच्या वेळी तिचे लसीकरण करतो.
प्राणी हे प्रेमाचे, मायेचे भुकेले असतात. ते मुके असले तरी प्रेमाची भाषा त्यांना कळते. त्यांना आपलंसं केलं, की ते आपल्याला आपलंसं करतात. घराला 'घरपण' देतात, 'पिकू' यांमुळेच माझी अत्यंत लाडकी मनीमाऊ आहे.
संबंधित प्रश्न
‘तुम्ही पक्षी आहात’, अशी कल्पना करून तुम्हांला स्वच्छंदीपणे कोणकोणत्या गोष्टी करायला आवडतील, ते लिहा.
नदी व झाड या दोघांमधील संवादाची कल्पना करून संवादलेखन करा.
'स' चा शब्दपंखा पूर्ण करा.
१. वर्णमालेतील बत्तीसावे अक्षर.
२. जंगलातील एक भित्रा प्राणी.
३. नेहमी.
४. एक शीतपेय.
५. रस्ता.
६. उत्सव.
७. ढीग या शब्दासाठी कवितेत आलेला शब्द. रा...
शाळेच्या परिसरात स्वच्छताविषयक पाट्या लावायच्या आहेत, तर तुम्ही कोणत्या पाट्या तयार कराल?
शब्दांमुळे, भाषेमुळे दैनंदिन व्यवहारात कोणते फायदे होतात, या विषयावर मित्रांशी चर्चा करा.
खालील मुद्यांच्या आधारे अर्थपूर्ण परिच्छेद तयार करा व त्याला योग्य शीर्षक द्या.
सकाळची वेळ ...... बाबांबरोबर फिरायला ...... झाडांवर बसलेले पाखरांचे थवे ...... किलबिल ...... शुद्ध हवा ...... आल्हाददायक वातावरण ...... बाबांशी गप्पा मारत घराकडे परतणे ...... दिवसभर ताजेतवाने वाटणे.
सुट्टीच्या दिवशी मित्रांसोबत तुम्ही कोणकोणते खेळ खेळता?
खालील प्रसंगी तुम्ही काय कराल?
तुमच्या मित्राने/मैत्रिणीने आज डबा आणला नाही.
खालील प्रसंगी तुम्ही काय कराल?
शाळेत पिण्याच्या पाण्याचा नळ कोणीतरी विनाकारण सुरू ठेवला.
खालील प्रसंगी तुम्ही काय कराल?
सहलीत तुमचा मित्र किल्ल्याच्या भिंतीवर नावे लिहीत आहे.