Advertisements
Advertisements
प्रश्न
नदी व झाड या दोघांमधील संवादाची कल्पना करून संवादलेखन करा.
उत्तर
नदी: | काय रे झाड दादा. कसा आहेस तू? तब्येतपाणी ठीक ना? |
झाड: | हो गं नदीताई. तुझ्या कृपेने सारं ठीक आहे. तुझ्या पाण्यात माझी मुळे टाकून मी लागेल तेव्हा निवांत पाणी पीत बसतो. हिरवा हिरवागार राहतो मी , तो तुझ्या मुळेच! |
नदी: | अरे! तू माझ्या काठी आहेस, म्हणून तुला पाणी मिळतंय बरं! पण दुष्काळी भागातील तुझ्या मित्रांना कुठे रे पाणी मिळेल! |
झाड: | हो ना! नदीताई, तू जीवनवाहिनी आहेस आमची! तुझ्यामुळेच तर आपला परिसर असा समृद्ध आहे. |
नदी: | अरे, त्यात माझं कसलं आलंय कौतुक! माझा स्वभाव आहे तो, सतत वाहण्याचा ! त्यामुळे मी झुळझुळ वाहत राहते. जिथे जाते, तिथे पाणी घेऊन जाते. |
झाड: | तुझ्या असण्याने सर्वांना पाणी मिळतं बघ. तू बारा महिने वाहत असतेस. त्यामुळे लोक, प्राणी-पक्षी सगळे आनंदाने तुझ्याजवळ येतात. तुझे पाणी पिऊन तृप्त होतात. पाण्याचा वापर करतात. |
नदी: | हं. तूही किती परोपकारी आहेस, झाडदादा. आपल्या प्रत्येक अवयवाचा वापर तू लोकांसाठी, पक्षी-प्राण्यांसाठी करतोस. कोणी तुझ्याशी वाईट वागो किंवा चांगले, तू सतत त्यांना मदतच करतोस. |
झाड: | अगं ताई, तुझ्याकडूनच तर शिकलो सर्वांना मदत करण्याचा गुण! 'ताई' आहेस तू माझी. छोट्या भावाला चांगले संस्कार देणारी. (दोघेही हसतात.) |
संबंधित प्रश्न
तुम्ही तुमच्या धाकट्या भावासाठी/बहिणीसाठी कोणकोणत्या भेटवस्तू घेता? कोणकोणत्या प्रसंगी घेता?
रानमेवा कशाला म्हणतात? रानमेव्यात कोणती फळे येतात, याविषयी कुटुंबातील व्यक्तींशी चर्चा करा.
तुमच्या परिसरातील ज्या घरी पाळीव प्राणी आहेत अशा पाच घरांना भेटी द्या. त्या घरातील लोक पाळीव प्राण्यांची काळजी कशी घेतात याची खालील मुद्द्यांच्या आधारे माहिती मिळवा व वर्गात सांगा.
तुम्ही भेट दिलेल्या एखाद्या पर्यटनस्थळाचे वर्णन करणारे पत्र मित्राला/मैत्रिणीला लिहा.
तुम्ही एखादा उपक्रम केला असेल, तर त्याबाबतची माहिती मित्राला पत्राने कळवा.
खालील उतारा वाचा. त्या उताऱ्यात पूर्णविराम (.) स्वल्पविराम (,) प्रश्नचिन्ह (?) उद्गारचिन्ह (!) आणि एकेरी अवतरणचिन्ह (‘-’) घाला व उतारा पुन्हा लिहा.
एका छोट्याशा गावात एक सधन शेतकरी राहत होता शेतात काम करणाऱ्या दोन बैलजोड्या त्याच्याकडे होत्या तसेच दोन म्हशीही होत्या आणि एक चांगली धष्टपुष्ट आणि पुष्कळ दूध देणारी कपिला नावाची गायही होती त्यामुळे त्याच्या घरी भरपूर दूधदुभते असे ते दूध तो साऱ्या गावात विकत असे. एकदा अशीच सारी गुरे नीट बांधून तो शेतकरी घरात जाऊन झोपला पण सकाळी उठून पाहतो तो त्याची गाय तिथे नव्हती. अगदी कासावीस झाला तो पांढरा आणि तपकिरी रंग असलेली ती गाय त्याची खूप लाडकी होती. लाेक मुद्दाम गाईचे दूध तूप दही नेत असत आता लाेकांना काय सांगणार काय करावे शेवटी तो शेजारच्या गावी दुसरी गाय विकत आणण्यासाठी गेला बाजार गुरांनी भरून गेला होता निरनिराळ्या रंगांच्या धिप्पाड मध्यम आणि बऱ्यापैकी दूध देणाऱ्या अशा अनेक गाई त्याने पाहिल्या गाई बघत तो असाच पुढे जात असताना एका गाईजवळ येऊन तो थांबला अन काय आश्चर्य कपिलेने त्याच्याकडे पाहिले त्याचे ही डोळे चमकले अरे ही तर आपली गाय कपिला नक्कीच या माणसाने त्या दिवशी माझी गाय चोरून नेली असावी आपल्या गाईच्या पाठीवर त्याने प्रेमाने थाप मारली कपिलेने त्याला ओळखले तिने आनंदाने कान व शिंगे हालवली. |
खालील चौकटीत दिलेली अपूर्ण गोष्ट पूर्ण करा.
एकदा काय झालं, आपल्या शरीराचे दोन हात, उजवा आणि डावा एक दिवस चक्क भांडायला लागले. उजवा हात म्हणाला, ‘‘आजपासून मी आराम करणार!’’ मग डावा म्हणाला, ‘‘का, काय झालं? तू का आराम करणार?’’ ‘‘मी मोठा आहे, तुझ्यापेक्षा माझा मान जास्त आहे.’’ उजवा हसून म्हणाला, ‘‘वा!वा! म्हणे मी मोठा आहे. अरे, जा मी तुला मोठा मानतच नाही. अरे माझ्याशिवाय पान हालत नाही माहीत आहे का तुला?’’ उजवा हात म्हणाला. दोन्ही हातांचे बराचवेळ भांडण चालले होते. इतकावेळ शांत बसलेले डोके मग रागाने म्हणाले, ‘‘अरे थांबा हे काय चाललंय? तुमच्या दोघांत चांगले काम कोण करतो हेच मी पाहणार आहे.’’ ‘‘हो! हो! पाहाच!’’ उजवा हात म्हणाला. ‘‘ मी पण तयार आहे.’’ डावा म्हणाला. दोन्ही हात तयार झाले. ‘‘चला तर मग, तो पाहा त्या तिथे एक दगड चिखलात रुतून बसलाय. बघू त्याला कोण बाहेर काढतंय.’’ डोक्याने असे म्हणताच उजवा म्हणाला, ‘‘मी काढणार! माझा पहिला नंबर.’’ तेव्हा डावा म्हणाला, ‘‘जा जा! तुझी किती ताकद आहे.’’ डावा असे म्हणताच मोठ्या ऐटीत उजवा निघाला ____________________________________ _________________________________________________________ _________________________________________________________ _________________________________________________________ _________________________________________________________ _________________________________________________________ _________________________________________________________ |
'शब्द' या विषयावर आधारित सुविचार मिळवा. त्यांचा संग्रह करा. त्याची सुंदर चिकटवही बनवा.
महाराष्ट्रातील प्रेरणादायी कार्य करणाऱ्या महिलांविषयीची माहिती आंतरजालावरून मिळवा.
सुट्टीच्या दिवशी मित्रांसोबत तुम्ही कोणकोणते खेळ खेळता?