Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील चौकटीत दिलेली अपूर्ण गोष्ट पूर्ण करा.
एकदा काय झालं, आपल्या शरीराचे दोन हात, उजवा आणि डावा एक दिवस चक्क भांडायला लागले. उजवा हात म्हणाला, ‘‘आजपासून मी आराम करणार!’’ मग डावा म्हणाला, ‘‘का, काय झालं? तू का आराम करणार?’’ ‘‘मी मोठा आहे, तुझ्यापेक्षा माझा मान जास्त आहे.’’ उजवा हसून म्हणाला, ‘‘वा!वा! म्हणे मी मोठा आहे. अरे, जा मी तुला मोठा मानतच नाही. अरे माझ्याशिवाय पान हालत नाही माहीत आहे का तुला?’’ उजवा हात म्हणाला. दोन्ही हातांचे बराचवेळ भांडण चालले होते. इतकावेळ शांत बसलेले डोके मग रागाने म्हणाले, ‘‘अरे थांबा हे काय चाललंय? तुमच्या दोघांत चांगले काम कोण करतो हेच मी पाहणार आहे.’’ ‘‘हो! हो! पाहाच!’’ उजवा हात म्हणाला. ‘‘ मी पण तयार आहे.’’ डावा म्हणाला. दोन्ही हात तयार झाले. ‘‘चला तर मग, तो पाहा त्या तिथे एक दगड चिखलात रुतून बसलाय. बघू त्याला कोण बाहेर काढतंय.’’ डोक्याने असे म्हणताच उजवा म्हणाला, ‘‘मी काढणार! माझा पहिला नंबर.’’ तेव्हा डावा म्हणाला, ‘‘जा जा! तुझी किती ताकद आहे.’’ डावा असे म्हणताच मोठ्या ऐटीत उजवा निघाला ____________________________________ _________________________________________________________ _________________________________________________________ _________________________________________________________ _________________________________________________________ _________________________________________________________ _________________________________________________________ |
उत्तर
उजव्या हाताने मोठ्या युक्तीने दगड उचलण्याचा प्रयत्न केला; मात्र दगड फक्त उजव्या बाजूनेच उचलला गेला. डाव्या बाजूने उचलला जाईना. थकून तो माघारी आला. मग पाळी होती डाव्या हाताची. उजव्याची झालेली फजिती पाहून डावा फारच खुशीत होता. तो ऐटीत दगडापाशी गेला. पूर्ण ताकद लावून त्याने दगड डाव्या बाजूने उचलला; पण दगडाची उजवी बाजू काही हलेना. शेवटी डावा हातसुद्धा निराश होऊन परतला. ते पाहून डोके म्हणाले, ’पाहिलंत, तुम्ही दोघे एकट्याने कोणतेही काम करू शकत नाही. जा बघू, आता दोघे मिळून दगड बाहेर काढा!“ मग दोन्ही हात पुढे सरसावले आणि त्यांनी लगेचच चिखलातून दगड बाहेर काढला. डोके म्हणाला, ’अरे वा! तुम्ही एकत्रितपणे काम केलं, तर किती छान काम करता ! तुम्हां दोघांत कुणीच मोठा-छोटा नाही. दोघेही महत्त्वाचे आहात. एकाशिवाय दुसरा काम करू शकत नाही. तेव्हा पुन्हा भांडू नका आणि चांगले मित्र बना.“ एव्हाना दोन्ही हातांना आपली चूक उमगली होती. त्यांनी न भांडता एकत्र काम करायचं ठरवलं.
संबंधित प्रश्न
रानमेवा कशाला म्हणतात? रानमेव्यात कोणती फळे येतात, याविषयी कुटुंबातील व्यक्तींशी चर्चा करा.
तुमच्या परिसरातील ज्या घरी पाळीव प्राणी आहेत अशा पाच घरांना भेटी द्या. त्या घरातील लोक पाळीव प्राण्यांची काळजी कशी घेतात याची खालील मुद्द्यांच्या आधारे माहिती मिळवा व वर्गात सांगा.
फुलांना रंग कशामुळे प्राप्त होतो? फुलांमध्ये दोन प्रकाची रंगद्रव्ये असतात. हरितद्रव्ये, कॅरोटिन यांमुळे नारिंगी, पिवळा, हिरवा हे रंग फुलांच्या पाकळ्यांना मिळतात. लाल, गुलाबी, निळा वगैरे रंग फुलांमधील अँथोसायनीन या रंगद्रव्यामुळे मिळतील. हि रंगद्रवे पाण्यात विरघळू शकतात. ज्या वेळी फुलांना जीवनरसाचा पुरवठा होतो, त्या वेळी त्यात हि रंगद्रव्ये विरघळतात. कोणत्या फुलांत कोणती रंगद्रवे असतात, हे त्यांतील गुणसूत्रे ठरवतात आणि गुणसूत्रे आनुवंशिक असल्यामुळे त्या त्या फुलांचा रंग ठरावीकच असतो, तो बदलत नाही. |
तुम्ही एखादा उपक्रम केला असेल, तर त्याबाबतची माहिती मित्राला पत्राने कळवा.
मराठी भाषेत विनोदी लेखन करणाऱ्या लेखकांची व त्यांच्या साहित्याची शिक्षक, पालक यांच्या मदतीने यादी करा. विनोदी गोष्टी वाचा व वर्गात सांगा.
'शब्द' या विषयावर आधारित सुविचार मिळवा. त्यांचा संग्रह करा. त्याची सुंदर चिकटवही बनवा.
तुमची लाडकी ताई घरात नसली, तर तुम्हांला काय वाटते, ते थोडक्यात सांगा.
‘माझा आवडता मित्र/मैत्रीण’ या विषयावर थोडक्यात माहिती लिहा.
सुट्टीच्या दिवशी मित्रांसोबत तुम्ही कोणकोणते खेळ खेळता?
खालील प्रसंगी तुम्ही काय कराल?
शाळेत पिण्याच्या पाण्याचा नळ कोणीतरी विनाकारण सुरू ठेवला.