Advertisements
Advertisements
प्रश्न
मराठी भाषेत विनोदी लेखन करणाऱ्या लेखकांची व त्यांच्या साहित्याची शिक्षक, पालक यांच्या मदतीने यादी करा. विनोदी गोष्टी वाचा व वर्गात सांगा.
उत्तर
काही सुप्रसिद्ध मराठी विनोदी लेखक व त्यांचे साहित्य पुढीलप्रमाणे -
- चि. वि. जोशी: चिमणरावांचे चऱ्हाट, एरंडाचे गुऱ्हाळ, थोडे कडू, थोडे गोड, निवडक गुंड्याभाऊ, मोरू आणि मैना, रहाटगाडगं इत्यादी.
- पु. ल. देशपांडे: अघळ पघळ, खोगीरभरती, बटाट्याची चाळ, व्यक्ती आणि वल्ली, म्हैस, वाऱ्यावरची वरात, हसवणूक इत्यादी.
- द. मा. मिरासदार: अंगतपंगत, गप्पांगण, गंमतगोष्टी, गुदगुल्या, भुताचा जन्म, भोकरवाडीच्या गोष्टी, माझ्या बापाची पेंड, हुबेहूब इत्यादी.
- आचार्य अत्रे: अशी बायको हवी (नाटक), मोरूची मावशी (नाटक), लग्नाची बेडी (नाटक), झेंडूची फुले (काव्य), कावळ्यांची शाळा, बत्ताशी आणि इतर कथा, कशी आहे गम्मत, हास्यकट्टा इत्यादी.
संबंधित प्रश्न
खालील बातमी वाचून त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा.
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, उत्रौली या शाळेत कला शिबिराचा समारोप संपन्न.
दिनांक: २० डिसेंबर लोकप्रतिभा चित्रकला शिबिराचा समारोप उत्रौली (ता. भोर) : उत्रौली येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत दहा दिवसांचे चित्रकला शिबिर नुकतेच संपन्न झाले. १९ डिसेंबर रोजी दुपारी ४.०० ते ६.०० या वेळात शिबिराचा समारोप समारंभ साजरा झाला. या शिबिराची सांगता प्रसिद्ध चित्रकार श्री. अविनाश शिवतरे यांच्या सप्रात्यक्षिक मनोगताने करण्यात आली. आपल्या जीवनातील कलेचे महत्त्व सांगताना प्रत्येकाने कोणती-ना-कोणती कला शिकणे आवश्यक आहे, हा विचार त्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केला. समारंभाचे अध्यक्षस्थान उच्च प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री. सदाशिव शिंदे यांनी भूषवले. कलाशिक्षिका श्रीमती सुनीता सोमण यांनी प्रमुख पाहुणे व उपस्थितांचे आभार मानले. या निमित्ताने सर्व पंचवीस शिबिरार्थींच्या चित्रांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. त्याला रसिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. |
(१) कोण ते लिहा.
(अ) समारंभाचे प्रमुख पाहुणे-
(आ) समारंभाचे अध्यक्ष-
(इ) चित्रकला प्रदर्शनास प्रतिसाद देणारे-
(२) उत्तर लिहा.
(अ) शिबिरार्थींची संख्या-
(आ) शिबिरार्थींनी शिबिरात शिकलेली कला-
(इ) शिबिराचे ठिकाण-
(ई) शिबिर सुरू झाले ती तारीख-
(३) वरील बातमीमध्ये ज्या ज्या गोष्टींविषयी माहिती दिलेली आहे ते घटक लिहा.
तुमच्या शाळेमध्ये उन्हाळी सुट्टीत ‘हस्ताक्षर सुंदर करूया!’ हे १० दिवसांचे शिबिर आयोजित केले आहे. त्यात तुम्हांला सहभागी करून घेण्याची विनंती करणारे पत्र वर्ग शिक्षकांना लिहा.
नदी व झाड या दोघांमधील संवादाची कल्पना करून संवादलेखन करा.
मित्रमैत्रिणींमध्ये चर्चा करून ‘जैव विविधतेची गरज’, या विषयावर आठ ते दहा ओळींचा निबंध लिहा.
तुमच्या शाळेत सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम पाहण्यासाठी पालकांना आवाहन करणारा सूचनाफलक तयार करा.
'स' चा शब्दपंखा पूर्ण करा.
१. वर्णमालेतील बत्तीसावे अक्षर.
२. जंगलातील एक भित्रा प्राणी.
३. नेहमी.
४. एक शीतपेय.
५. रस्ता.
६. उत्सव.
७. ढीग या शब्दासाठी कवितेत आलेला शब्द. रा...
तुमच्या परिसरातील ज्या घरी पाळीव प्राणी आहेत अशा पाच घरांना भेटी द्या. त्या घरातील लोक पाळीव प्राण्यांची काळजी कशी घेतात याची खालील मुद्द्यांच्या आधारे माहिती मिळवा व वर्गात सांगा.
खालील चित्रांचे निरीक्षण करा. चित्रातील हे दृश्य पाहून सूचनांचे फलक तयार करा.
खालील चित्रांचा सहसंबंध लावून गोष्ट तयार करा.
![]() |
![]() |
![]() |
![]() |
खालील सूचना वाचा. अशा आणखी सूचना तयार करा.
- नदीच्या पाण्यात केरकचरा, निर्माल्य टाकू नये.
- ओला कचरा, सुका कचरा ठेवा वेगवेगळा, तरच प्रदूषणाला बसेल आळा.
‘पाणी हेच जीवन’ यांवर आधारित दहा ओळी लिहा.
तुम्ही एखादा उपक्रम केला असेल, तर त्याबाबतची माहिती मित्राला पत्राने कळवा.
शब्दांमुळे, भाषेमुळे दैनंदिन व्यवहारात कोणते फायदे होतात, या विषयावर मित्रांशी चर्चा करा.
'शब्द' या विषयावर आधारित सुविचार मिळवा. त्यांचा संग्रह करा. त्याची सुंदर चिकटवही बनवा.
खालील मुद्यांच्या आधारे अर्थपूर्ण परिच्छेद तयार करा व त्याला योग्य शीर्षक द्या.
सकाळची वेळ ...... बाबांबरोबर फिरायला ...... झाडांवर बसलेले पाखरांचे थवे ...... किलबिल ...... शुद्ध हवा ...... आल्हाददायक वातावरण ...... बाबांशी गप्पा मारत घराकडे परतणे ...... दिवसभर ताजेतवाने वाटणे.
तुमचा आवडता मित्र/मैत्रीण यांमधील तुम्हांला कोणते गुण सर्वांत जास्त आवडतात?
खालील प्रसंगी तुम्ही काय कराल?
शाळेत पिण्याच्या पाण्याचा नळ कोणीतरी विनाकारण सुरू ठेवला.
खालील प्रसंगी तुम्ही काय कराल?
वर्गातील एका विद्यार्थ्याने वर्गात कचरा केला आहे व ते तुम्ही पाहिले.