English
Maharashtra State BoardSSC (English Medium) 7th Standard

मराठी भाषेत विनोदी लेखन करणाऱ्या लेखकांची व त्यांच्या साहित्याची शिक्षक, पालक यांच्या मदतीने यादी करा. विनोदी गोष्टी वाचा व वर्गात सांगा. - Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

Question

मराठी भाषेत विनोदी लेखन करणाऱ्या लेखकांची व त्यांच्या साहित्याची शिक्षक, पालक यांच्या मदतीने यादी करा. विनोदी गोष्टी वाचा व वर्गात सांगा.

Short Answer

Solution

काही सुप्रसिद्ध मराठी विनोदी लेखक व त्यांचे साहित्य पुढीलप्रमाणे -

  1. चि. वि. जोशी: चिमणरावांचे चऱ्हाट, एरंडाचे गुऱ्हाळ, थोडे कडू, थोडे गोड, निवडक गुंड्याभाऊ, मोरू आणि मैना, रहाटगाडगं इत्यादी.
  2. पु. ल. देशपांडे: अघळ पघळ, खोगीरभरती, बटाट्याची चाळ, व्यक्ती आणि वल्ली, म्हैस, वाऱ्यावरची वरात, हसवणूक इत्यादी.
  3. द. मा. मिरासदार: अंगतपंगत, गप्पांगण, गंमतगोष्टी, गुदगुल्या, भुताचा जन्म, भोकरवाडीच्या गोष्टी, माझ्या बापाची पेंड, हुबेहूब इत्यादी.
  4. आचार्य अत्रे: अशी बायको हवी (नाटक), मोरूची मावशी (नाटक), लग्नाची बेडी (नाटक), झेंडूची फुले (काव्य), कावळ्यांची शाळा, बत्ताशी आणि इतर कथा, कशी आहे गम्मत, हास्यकट्टा इत्यादी.
shaalaa.com
लेखन
  Is there an error in this question or solution?
Chapter 7.1: आजारी पडण्याचा प्रयोग - उपक्रम [Page 24]

APPEARS IN

Balbharati Marathi - Sulabhbharati 7 Standard Maharashtra State Board
Chapter 7.1 आजारी पडण्याचा प्रयोग
उपक्रम | Q १ | Page 24
Balbharati Integrated 7 Standard Part 2 [Hindi Medium] Maharashtra State Board
Chapter 2.4 आजारी पडण्याचा प्रयोग
उपक्रम | Q १ | Page 43

RELATED QUESTIONS

खालील बातमी वाचून त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा.

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, उत्रौली या शाळेत कला शिबिराचा समारोप संपन्न.

दिनांक: २० डिसेंबर

लोकप्रतिभा

चित्रकला शिबिराचा समारोप

उत्रौली (ता. भोर) : उत्रौली येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत दहा दिवसांचे चित्रकला शिबिर नुकतेच संपन्न झाले. १९ डिसेंबर रोजी दुपारी ४.०० ते ६.०० या वेळात शिबिराचा समारोप समारंभ साजरा झाला. या शिबिराची सांगता प्रसिद्ध चित्रकार श्री. अविनाश शिवतरे यांच्या सप्रात्यक्षिक मनोगताने करण्यात आली.

आपल्या जीवनातील कलेचे महत्त्व सांगताना प्रत्येकाने कोणती-ना-कोणती कला शिकणे आवश्यक आहे, हा विचार त्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केला. समारंभाचे अध्यक्षस्थान उच्च प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री. सदाशिव शिंदे यांनी भूषवले. कलाशिक्षिका श्रीमती सुनीता सोमण यांनी प्रमुख पाहुणे व उपस्थितांचे आभार मानले.

या निमित्ताने सर्व पंचवीस शिबिरार्थींच्या चित्रांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. त्याला रसिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला.

(१) कोण ते लिहा.

(अ) समारंभाचे प्रमुख पाहुणे-

(आ) समारंभाचे अध्यक्ष-

(इ) चित्रकला प्रदर्शनास प्रतिसाद देणारे-

(२) उत्तर लिहा.

(अ) शिबिरार्थींची संख्या-

(आ) शिबिरार्थींनी शिबिरात शिकलेली कला-

(इ) शिबिराचे ठिकाण-

(ई) शिबिर सुरू झाले ती तारीख-

(३) वरील बातमीमध्ये ज्या ज्या गोष्टींविषयी माहिती दिलेली आहे ते घटक लिहा.


खालील मुद्द्यांच्या आधारे ‘माझा आवडता खेळ’ या विषयावर आठ ते दहा ओळी निबंध लिहा.


रानमेवा कशाला म्हणतात? रानमेव्यात कोणती फळे येतात, याविषयी कुटुंबातील व्यक्तींशी चर्चा करा.


खालील उतारा वाचा. त्याचा तुम्हांला समजलेला अर्थ सारांश रूपाने पुन्हा लिहा.

आपल्यासारख्या सामान्यांना शब्दावाचूनचे संवाद भावणारही नाहीत, की परवडणारही नाहीत. आपल्याला कठीण, साधे, सरळ, वक्र कसे का होईना; पण बोलणे आणि ठणठणीत बोलणेच हवे असते आणि या बोलण्याचे किती अनंत प्रकार असतात. ‘व्यक्ती तितक्या प्रकृती’ अशी म्हण आहे. त्या चालीवर ‘माणसे तितकी बोलणी’ अशी म्हण बनवायला हरकत नाही. ‘मोकळा संवाद’ असे आपण म्हणतो; पण समाजात वावरताना या तथाकथित मोकळ्या संवादावर कशी आणि किती बंधने पडत असतात ते पाहिले म्हणजे गंमत वाटते. मित्रमंडळींशी गप्पा मारताना आपण खूप मुक्त, मोकळे असतो अशी आपली समजूत असते; पण ती खरी असते का? आपणाला एकमेकांचे अनेक गुणदोष, एकमेकांच्या जीवनातले बरेवाईट तपशील ठाऊक असतात; त्यामुळे तिथे कधी मोकळ्या गप्पा होत असल्या, तरी अनेकदा नात्यातल्या जवळिकीमुळेच कधी कधी एक चमत्कारिक अवघडलेपणही अनुभवाला येते. एकमेकांची मते, आग्रह, दुराग्रह ठाऊक असल्यामुळे मतभेदाचे अवघड विषय बहुधा आपण शिताफीने टाळतो. वृत्तीतल्या हळव्या जागा, स्वाभिमानाची ठिकाणे माहीत असल्यामुळे बोलताना त्यांना कुठे धक्का लागणार नाही, समोरच्या व्यक्तीचे मन दुखावले जाणार नाही, याची सतत काळजी घ्यावी लागते.

खालील जाहिरातीचे वाचन व निरीक्षण करून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा.

(अ) उत्तरे लिहा.

  1. जाहिरातीचा विषय -
  2. जाहिरात देणारे (जाहिरातदार) -
  3. वरील जाहिरातीत सर्वांत जास्त आकर्षित करून घेणारा घटक -
  4. जाहिरात कोणासाठी आहे?

(आ) वरील जाहिरात अधिक आकर्षक होण्यासाठी त्यात कोणकोणत्या घटकांचा समावेश असावा, असे तुम्हांला वाटते?

(इ) तुमच्या मते जाहिरातीमधील महत्त्वाची वैशिष्ट्ये.


‘तुम्ही पक्षी आहात’, अशी कल्पना करून तुम्हांला स्वच्छंदीपणे कोणकोणत्या गोष्टी करायला आवडतील, ते लिहा.


मित्रमैत्रिणींमध्ये चर्चा करून ‘जैव विविधतेची गरज’, या विषयावर आठ ते दहा ओळींचा निबंध लिहा.


तुमच्या शाळेत सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम पाहण्यासाठी पालकांना आवाहन करणारा सूचनाफलक तयार करा.


तुमच्या परिसरातील ज्या घरी पाळीव प्राणी आहेत अशा पाच घरांना भेटी द्या. त्या घरातील लोक पाळीव प्राण्यांची काळजी कशी घेतात याची खालील मुद्‌द्यांच्या आधारे माहिती मिळवा व वर्गात सांगा.


माहिती देण्यासाठी किंवा घेण्यासाठी अनेक साधने वापरली जातात. खाली माहिती देवाणघेवाण करण्याची/संवादाची काही साधने दिली आहेत. त्यांतील काही साधने एकतर्फी व दुतर्फी माहितीची/संवादाची देवाणघेवाण करतात. त्यांची माहिती मिळवा व दिलेल्या तक्त्यात वर्गीकरण करा.

फॅक्स, पत्र, इ-मेल, मोबाइल, आंतरजाल, रेडिओ, वर्तमानपत्र, मोबाइल संदेश, चर्चा, मुलाखत, जाहिरात, भाषण, संभाषण.

एकतर्फी माहितीची/संवादाची साधने दुतर्फी माहितीची/संवादाची साधने
   

              फुलांना रंग कशामुळे प्राप्त होतो?

         फुलांमध्ये दोन प्रकाची रंगद्रव्ये असतात. हरितद्रव्ये, कॅरोटिन यांमुळे नारिंगी, पिवळा, हिरवा हे रंग फुलांच्या पाकळ्यांना मिळतात. लाल, गुलाबी, निळा वगैरे रंग फुलांमधील अँथोसायनीन या रंगद्रव्यामुळे मिळतील. हि रंगद्रवे पाण्यात विरघळू शकतात. ज्या वेळी फुलांना जीवनरसाचा पुरवठा होतो, त्या वेळी त्यात हि रंगद्रव्ये विरघळतात.

         कोणत्या फुलांत कोणती रंगद्रवे असतात, हे त्यांतील गुणसूत्रे ठरवतात आणि गुणसूत्रे आनुवंशिक असल्यामुळे त्या त्या फुलांचा रंग ठरावीकच असतो, तो बदलत नाही.


खालील सूचना वाचा. अशा आणखी सूचना तयार करा.

  • नदीच्या पाण्यात केरकचरा, निर्माल्य टाकू नये.
  • ओला कचरा, सुका कचरा ठेवा वेगवेगळा, तरच प्रदूषणाला बसेल आळा.

‘पर्यावरण संरक्षण’ याविषयी पाठाच्या शेवटी माणसाने केलेली प्रतिज्ञा तुमच्या शब्दांत लिहा.

प्रतिज्ञा

आम्ही आमचे वर्तन बदलू.

__________________

__________________

__________________


दवाखान्याच्या ठिकाणी लावलेल्या पाट्या वाचा. त्या पाट्यांमध्ये आपल्याला सूचना दिलेल्या असतात. या सूचनांव्यतिरिक्त आणखी काही सूचनांच्या पाट्या तुम्ही तयार करा.


‘पाणी हेच जीवन’ यांवर आधारित दहा ओळी लिहा.


तुमची लाडकी ताई घरात नसली, तर तुम्हांला काय वाटते, ते थोडक्यात सांगा.


‘माझा आवडता मित्र/मैत्रीण’ या विषयावर थोडक्यात माहिती लिहा.


खालील प्रसंगी तुम्ही काय कराल?

सहलीत तुमचा मित्र किल्ल्याच्या भिंतीवर नावे लिहीत आहे.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×