Advertisements
Advertisements
Question
‘पाणी हेच जीवन’ यांवर आधारित दहा ओळी लिहा.
Solution
पाणी हेच जीवन
'पृथ्वीवरती तीनच रत्ने-जल, अन्न व सुभाषितं' असे म्हटले जाते. पृथ्वीवर जीवसृष्टी तयार झाली ती पाण्यामुळेच. पाणी नसते तर माणूस, पशू, पक्षी, प्राणी, वनस्पती, सूक्ष्मजीव यांपैकी कोणीच जगले नसते. पृथ्वीचा ७१% भाग पाण्याने व्यापलेला असला तरी त्यांपैकी पाण्याचा बराचसा भाग समुद्र व महासागरात सामावलेला आहे. उरलेल्या २.५% पाण्यापैकी फक्त १% पाणीच पिण्यासाठी उपलब्ध आहे. हे पाणी म्हणजे आपल्यासाठी जीवनच आहे. ते जपून वापरावे लागेल. जोवर पाणी आहे, तोवरच पृथ्वीवरील सर्व जीव जिवंत राहतील.
आपल्या शरीरातही 60% ते 70% पाणी आहे. आवश्यक तेवढे पाणी पिण्यामुळेच आपण निरोगी राहू शकतो. तसेच पाणी नसेल, तर झाडे जगणार नाहीत. झाडे नसतील, तर आपल्याला अन्न-पाणी कोठून मिळणार? अन्नपाण्यावाचून माणसं, पशू, पक्षी सर्वच उपासमारीने नष्ट होतील. त्यामुळे, पाण्याचा जपून वापर करायला हवा, कारण पाणी आहे तर जीवसृष्टी आहे, पृथ्वीवर 'जीवन' आहे.
RELATED QUESTIONS
खालील मुद्द्यांच्या आधारे ‘माझा आवडता खेळ’ या विषयावर आठ ते दहा ओळी निबंध लिहा.
खालील उतारा वाचा व त्यास योग्य शीर्षक द्या.
प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात सुखदु:खाचे क्षण नेहमीच येत असतात. दु:खाच्या व अडचणीच्या प्रसंगांना जे खिलाडू वृत्तीने सामोरे जातात, जे जिंकण्याच्या उर्मीने हाती घेतलेले काम पूर्ण करण्यासाठी स्वयंप्रेरणेने काम करतात, तेच आयुष्यात यश मिळवतात. कोणतीही वाईट परिस्थिती तुम्हांला अडवू किंवा हरवू शकत नाही. वेळप्रसंगी तुम्हांला दोन पावले मागेही टाकावी लागतात; परंतु जर आपण मनानेच हरलो, तर पुढील कार्य पूर्ण करण्यासाठी आपण तयार होऊ शकत नाही. अशा परिस्थितीत कायम आपले आपल्या मनावर नियंत्रण असणे आवश्यक असते. नकारात्मक विचार करण्यापासून आपण स्वत:ला थांबवणे आवश्यक आहे. त्याचबरोबर आपल्या मनाला चांगल्या सवयी लावणेही आवश्यक आहे. आपल्या मनाला चांगली सवय लावणे हे कठीण असले, तरी अशक्य मात्र नक्कीच नाही! आपल्या अंगी असणाऱ्या चांगल्या सवयी, वाईट सवयींना जवळ येऊ देत नाहीत. मनाला चांगल्या विचारांची सवय लावली, तर ती सवय वाईट विचारांपासून तुम्हांला नक्कीच दूर ठेवील. यासाठी तुम्हांला काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. उदा., चांगले वाचन, चांगल्या मित्रमैत्रिणींची संगत, घरातील ज्येष्ठ व्यक्तींशी असणारे जिव्हाळ्याचे व आपुलकीचे संबंध इत्यादी. जो दुसऱ्याच्यादु:खात नेहमी सहभागी होतो त्यालाच जीवनाचा खरा अर्थ कळतो. मानसिक आधार देऊन, विचारांच्या देवाणघेवाणीतून आपण एकमेकांचे दु:ख सहज हलके करू शकतो. असे सुखदु:खाचे प्रसंग प्रत्येकाच्या आयुष्यात सतत येत असतात मात्र या प्रसंगांना जो धीराने सामोरा जातो, तोच जीवनात यशस्वी होतो. |
तुमच्या शाळेमध्ये उन्हाळी सुट्टीत ‘हस्ताक्षर सुंदर करूया!’ हे १० दिवसांचे शिबिर आयोजित केले आहे. त्यात तुम्हांला सहभागी करून घेण्याची विनंती करणारे पत्र वर्ग शिक्षकांना लिहा.
नदी व झाड या दोघांमधील संवादाची कल्पना करून संवादलेखन करा.
मित्रमैत्रिणींमध्ये चर्चा करून ‘जैव विविधतेची गरज’, या विषयावर आठ ते दहा ओळींचा निबंध लिहा.
तुमच्या परिसरातील ज्या घरी पाळीव प्राणी आहेत अशा पाच घरांना भेटी द्या. त्या घरातील लोक पाळीव प्राण्यांची काळजी कशी घेतात याची खालील मुद्द्यांच्या आधारे माहिती मिळवा व वर्गात सांगा.
तुमच्या परिसरातील एखाद्या अनुभवी शेतकऱ्याची तुम्हांला मुलाखत घ्यायची आहे. त्यासाठी प्रश्नावली तयार करा.
‘माझा आवडता मित्र/मैत्रीण’ या विषयावर थोडक्यात माहिती लिहा.
तुमचा आवडता मित्र/मैत्रीण यांमधील तुम्हांला कोणते गुण सर्वांत जास्त आवडतात?
खालील प्रसंगी तुम्ही काय कराल?
वर्गातील एका विद्यार्थ्याने वर्गात कचरा केला आहे व ते तुम्ही पाहिले.