English
Maharashtra State BoardSSC (English Medium) 8th Standard

खालील मुद्द्यांच्या आधारे ‘माझा आवडता खेळ’ या विषयावर आठ ते दहा ओळी निबंध लिहा. - Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

Question

खालील मुद्द्यांच्या आधारे ‘माझा आवडता खेळ’ या विषयावर आठ ते दहा ओळी निबंध लिहा.

Answer in Brief

Solution

माझा आवडता खेळ

खेळ म्हणजे माझा जीव की प्राण! अगदी गोट्या, कॅरमपासून क्रिकेटपर्यंत सर्व प्रकारचे खेळ खेळायला आणि विविध खेळांचे सामने दूरदर्शनवर पाहायला मला खूप आवडते; परंतु, माझा सर्वांत आवडता खेळ म्हणजे 'कबड्डी'. हा महाराष्ट्राच्या मातीतला खेळ आहे, त्यामुळे तो रांगडा खेळ आहे. 'हुतूतू' या नावानेही हा खेळ प्रसिद्ध आहे. हा मैदानी खेळ खेळण्यासाठी कोणत्याही साधनसामग्रीची गरज नसते. आहे त्या परिस्थितीत हा खेळ खेळता येतो म्हणूनच मला तो खूप आवडतो. प्रतिस्पर्ध्यांवर चढाई करणे, पेच वापरून आपले कौशल्य पणाला लावून आपल्या संघाला जिंकवून देणे यातील आनंद अवर्णनीय आहे.

कबड्डीचे मैदान दोन भागांत विभागलेले असते. त्याला कोर्ट म्हणतात. दोन्ही कोर्टच्या मध्यावर एक रेषा असते. या मध्यरेषेपासून सुमारे तीन मीटर अंतरावर दोन्ही कोर्टमध्ये एक टचलाइन असते. टचलाइनपासून एक मीटर अंतरावर दोन्ही कोर्टमध्ये बोनसलाइन असते. दोन संघात प्रत्येकी १२ खेळाडू असतात. सात खेळाडू मुख्य, तर चार राखीव खेळाडू असतात. मला सात मुख्य खेळाडूंपैकी एक म्हणून खेळायला फार आवडते. खेळाडू मैदानात उतरले, की नाणेफेक जिंकणारा संघ सर्वप्रथम आपला खेळाडू प्रतिस्पर्धी संघात पाठवतो. या खेळाडूने सतत 'कबड्डी कबड्डी' म्हणायचे असते. जर त्याने हे थांबवले, तर तो 'बाद' म्हणून घोषित होतो. प्रत्येक संघात पकडण्यात तरबेज असणारे आणि स्पर्श करून पळण्यात तरबेज असणारे खेळाडू असतात. ते आपापल्या युक्त्या, पेच-डावपेच वापरून खेळ खेळत राहतात.

हा खेळ साधारणत: २०-२० मिनिटांच्या दोन भागांत खेळला जातो; हा खेळ मुख्यत: मातीत खेळला जातो; परंतु सध्या इनडोअर स्टेडिअममध्ये मॅटवर हा खेळ खेळला जात आहे. दोन्हींकरता शारीरिक क्षमता महत्त्वाची आहे. श्वासाचे तंत्र, चढाईचे व पकडीचे कौशल्य, चपळाई, शारीरिक सक्षमता, ही या खेळासाठीची आवश्यक कौशल्ये आहेत. ही कौशल्ये वाढवण्यासाठी नियमित सराव करणे, प्रशिक्षण घेणे, व्यायाम करणे, संतुलित आहार घेणे, पुरेशी विश्रांती घेणे हे सर्व प्रयत्न मी करत आहे.

सध्याच्या प्रो-कबड्डी लीगमधील अनुपकुमार हे माझे या खेळातील प्रेरणास्थान आहेत. त्यांच्या खेळातून प्रेरणा घेऊन मीही व्यावसायिक कबड्डीपटू बनण्याचे स्वप्न पाहिले आहे. 'कबड्डी' हा खेळ आता केवळ भारतापुरताच मर्यादित राहिला नसून इतर देशांनीही तो स्वीकारला आहे. याचा मला अभिमान वाटतो. हा आपल्या मातीतला रांगडा खेळ मला फार आवडतो.

shaalaa.com
लेखन
  Is there an error in this question or solution?
Chapter 7: नातवंडांस पत्र - लिहिते होऊया [Page 23]

APPEARS IN

Balbharati Marathi - Sulabhbharati 8 Standard Maharashtra State Board
Chapter 7 नातवंडांस पत्र
लिहिते होऊया | Q १. | Page 23
Balbharati Integrated 8 Standard Part 2 [English Medium] Maharashtra State Board
Chapter 2.3 नातवंडांस पत्र
लिहिते होऊया | Q १. | Page 41

RELATED QUESTIONS

खालील बातमी वाचून त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा.

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, उत्रौली या शाळेत कला शिबिराचा समारोप संपन्न.

दिनांक: २० डिसेंबर

लोकप्रतिभा

चित्रकला शिबिराचा समारोप

उत्रौली (ता. भोर) : उत्रौली येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत दहा दिवसांचे चित्रकला शिबिर नुकतेच संपन्न झाले. १९ डिसेंबर रोजी दुपारी ४.०० ते ६.०० या वेळात शिबिराचा समारोप समारंभ साजरा झाला. या शिबिराची सांगता प्रसिद्ध चित्रकार श्री. अविनाश शिवतरे यांच्या सप्रात्यक्षिक मनोगताने करण्यात आली.

आपल्या जीवनातील कलेचे महत्त्व सांगताना प्रत्येकाने कोणती-ना-कोणती कला शिकणे आवश्यक आहे, हा विचार त्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केला. समारंभाचे अध्यक्षस्थान उच्च प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री. सदाशिव शिंदे यांनी भूषवले. कलाशिक्षिका श्रीमती सुनीता सोमण यांनी प्रमुख पाहुणे व उपस्थितांचे आभार मानले.

या निमित्ताने सर्व पंचवीस शिबिरार्थींच्या चित्रांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. त्याला रसिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला.

(१) कोण ते लिहा.

(अ) समारंभाचे प्रमुख पाहुणे-

(आ) समारंभाचे अध्यक्ष-

(इ) चित्रकला प्रदर्शनास प्रतिसाद देणारे-

(२) उत्तर लिहा.

(अ) शिबिरार्थींची संख्या-

(आ) शिबिरार्थींनी शिबिरात शिकलेली कला-

(इ) शिबिराचे ठिकाण-

(ई) शिबिर सुरू झाले ती तारीख-

(३) वरील बातमीमध्ये ज्या ज्या गोष्टींविषयी माहिती दिलेली आहे ते घटक लिहा.


'स' चा शब्दपंखा पूर्ण करा.

१. वर्णमालेतील बत्तीसावे अक्षर.
२. जंगलातील एक भित्रा प्राणी.
३. नेहमी.
४. एक शीतपेय.
५. रस्ता.
६. उत्सव.
७. ढीग या शब्दासाठी कवितेत आलेला शब्द. रा...


तुमच्या परिसरातील ज्या घरी पाळीव प्राणी आहेत अशा पाच घरांना भेटी द्या. त्या घरातील लोक पाळीव प्राण्यांची काळजी कशी घेतात याची खालील मुद्‌द्यांच्या आधारे माहिती मिळवा व वर्गात सांगा.


माहिती देण्यासाठी किंवा घेण्यासाठी अनेक साधने वापरली जातात. खाली माहिती देवाणघेवाण करण्याची/संवादाची काही साधने दिली आहेत. त्यांतील काही साधने एकतर्फी व दुतर्फी माहितीची/संवादाची देवाणघेवाण करतात. त्यांची माहिती मिळवा व दिलेल्या तक्त्यात वर्गीकरण करा.

फॅक्स, पत्र, इ-मेल, मोबाइल, आंतरजाल, रेडिओ, वर्तमानपत्र, मोबाइल संदेश, चर्चा, मुलाखत, जाहिरात, भाषण, संभाषण.

एकतर्फी माहितीची/संवादाची साधने दुतर्फी माहितीची/संवादाची साधने
   

‘पाणी हेच जीवन’ यांवर आधारित दहा ओळी लिहा.


तुम्ही एखादा उपक्रम केला असेल, तर त्याबाबतची माहिती मित्राला पत्राने कळवा.


खालील चौकटीत दिलेली अपूर्ण गोष्ट पूर्ण करा.

एकदा काय झालं, आपल्या शरीराचे दोन हात, उजवा आणि डावा एक दिवस चक्क भांडायला लागले. उजवा हात म्हणाला, ‘‘आजपासून मी आराम करणार!’’ मग डावा म्हणाला, ‘‘का, काय झालं? तू का आराम करणार?’’ ‘‘मी मोठा आहे, तुझ्यापेक्षा माझा मान जास्त आहे.’’ उजवा हसून म्हणाला, ‘‘वा!वा! म्हणे मी मोठा आहे. अरे, जा मी तुला मोठा मानतच नाही. अरे माझ्याशिवाय पान हालत नाही माहीत आहे का तुला?’’ उजवा हात म्हणाला. दोन्ही हातांचे बराचवेळ भांडण चालले होते. इतकावेळ शांत बसलेले डोके मग रागाने म्हणाले, ‘‘अरे थांबा हे काय चाललंय? तुमच्या दोघांत चांगले काम कोण करतो हेच मी पाहणार आहे.’’ ‘‘हो! हो! पाहाच!’’ उजवा हात म्हणाला. ‘‘ मी पण तयार आहे.’’ डावा म्हणाला. दोन्ही हात तयार झाले. ‘‘चला तर मग, तो पाहा त्या तिथे एक दगड चिखलात रुतून बसलाय. बघू त्याला कोण बाहेर काढतंय.’’ डोक्याने असे म्हणताच उजवा म्हणाला, ‘‘मी काढणार! माझा पहिला नंबर.’’ तेव्हा डावा म्हणाला, ‘‘जा जा! तुझी किती ताकद आहे.’’ डावा असे म्हणताच मोठ्या ऐटीत उजवा निघाला ____________________________________

_________________________________________________________

_________________________________________________________

_________________________________________________________

_________________________________________________________

_________________________________________________________

_________________________________________________________


'शब्द' या विषयावर आधारित सुविचार मिळवा. त्यांचा संग्रह करा. त्याची सुंदर चिकटवही बनवा.


खालील प्रसंगी तुम्ही काय कराल?

तुमच्या मित्राने/मैत्रिणीने आज डबा आणला नाही.


खालील प्रसंगी तुम्ही काय कराल?

वर्गातील एका विद्यार्थ्याने वर्गात कचरा केला आहे व ते तुम्ही पाहिले.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×