English
Maharashtra State BoardSSC (English Medium) 8th Standard

तुमच्या परिसरातील ज्या घरी पाळीव प्राणी आहेत अशा पाच घरांना भेटी द्या. त्या घरातील लोक पाळीव प्राण्यांची काळजी कशी घेतात याची खालील मुद्‌द्यांच्या आधारे माहिती मिळवा - Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

Question

तुमच्या परिसरातील ज्या घरी पाळीव प्राणी आहेत अशा पाच घरांना भेटी द्या. त्या घरातील लोक पाळीव प्राण्यांची काळजी कशी घेतात याची खालील मुद्‌द्यांच्या आधारे माहिती मिळवा व वर्गात सांगा.

Long Answer

Solution

माझा आवडता प्राणी

मला मनीमाऊ खूप आवडतात. मी सातवीत असताना "पिकू" आमच्या घरात एखाद्या पाहुण्यासमान आली. झालं असं, की बाहेर खूप पाऊस पडत होता आणि भर पावसात एक छोटंसं मांजराचं पिल्लू आमच्या दाराशेजारच्या अडचणीच्या जागेत कुडकुडत बसलं होतं. माझं सहज लक्ष गेलं आणि मी आई-बाबांच्या ही गोष्ट लक्षात आणून दिली. मग आम्ही त्याला घरात घेतलं. त्याची काळजी घेतली. त्या दोन दिवसांत मला त्याचा खूप लळा लागला होता, म्हणून मी आई-बाबांकडे हट्ट धरून त्याला कायम घरीच ठेवून घेतले. तेव्हापासून 'पिकू' ही आमच्यासाठी 'वाघाची मावशी' अशी न राहता घरातली हक्काची सदस्य बनली आहे.

तिचा पांढराशुभ्र रंग, मऊ-मऊ अंग, गुलाबीसर ओठ, मिचमिच्या मिशा, जरा खुट्ट झालं, की हलणारे इवले-इवले कान मला खूप आवडतात. ती कधीही घरातली दुधाची भांडी पाडत नाही. घरातल्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास देत नाही. तिला भूक लागली, की तिच्या बशीजवळ जाते, जर आमचं लक्ष नसेल, म्याँव म्याँव करत पायात येते. मग दुधाची व्यवस्था केल्यावर शांतपणे पुढचे व मागचे पाय दुमडून शेपटी मोकळी सोडून तळ्याकाठी पाणी प्यायला आलेल्या वाघाप्रमाणे जिभल्या चाटत ती दूध पिते. तिला दूध पिताना पाहणं म्हणजे आनंदाचा क्षण असतो. कागदावर चित्र काढावंसं वाटतं, छायाचित्रात तिला कैद करावंसं वाटतं.

सुरुवातीला कापसाची गादी अंथरलेली टोपली हेच तिचं घर होतं; पण नंतर आमचं अख्खं घर हेच तिचं हक्काचं घर झालं. आता दिवसभर एखाद्या घरातल्या व्यक्तीप्रमाणे ती बिनधास्त घरभर वावरते. रात्री माझ्या पलंगावर येऊन निजते. आपल्या घरात येणारे उंदीरमामा तिला घाबरूनच जीव मुठीत घेऊन पळतात. आमच्या व आजूबाजूंच्या घरातल्या उंदीरमामांचा फडशा पाडणे हे तिचं आवडतं काम!

ती आल्यापासून घरातलं वातावरण बदललं. तिच्या येण्याने घरात नव्या सदस्याचं आगमन झालं. घरात उत्साह आला, चैतन्य आलं. तिच्या छोट्या छोट्या कृतींनी तिने आमचं मन जिंकलं. ती सर्वांसोबत खेळते, मस्ती करते. खूप माया लावली आहे तिनं. तिचा प्रसन्न चेहरा पाहिला, की थकवा, कंटाळा, ताणतणाव दूर होऊन जातो. घरात कोणी आजारी पडलं, की ही पिकूताई त्याच्याशेजारी जाऊन बसेल, म्याँव म्याँव करून विचारपूस करेल, पंज्यानं थोपटत बसेल. अशी जीव लावणारी पिकू मला खूप आवडते.

ती स्वत: आजारी पडली, की आम्हांला कसंतरी वाटतं. तिचं कण्हणं, केविलवाणं म्याँव म्याँव ऐकलं, की रडायलाच येतं, म्हणून ती आजारी पडू नये यासाठी आम्ही वेळच्या वेळी तिचे लसीकरण करतो.

प्राणी हे प्रेमाचे, मायेचे भुकेले असतात. ते मुके असले तरी प्रेमाची भाषा त्यांना कळते. त्यांना आपलंसं केलं, की ते आपल्याला आपलंसं करतात. घराला 'घरपण' देतात, 'पिकू' यांमुळेच माझी अत्यंत लाडकी मनीमाऊ आहे.

shaalaa.com
लेखन
  Is there an error in this question or solution?
Chapter 10: आम्ही हवे आहोत का? - उपक्रम [Page 38]

APPEARS IN

Balbharati Marathi - Sulabhbharati 8 Standard Maharashtra State Board
Chapter 10 आम्ही हवे आहोत का?
उपक्रम | Q १. | Page 38
Balbharati Integrated 8 Standard Part 3 [English Medium] Maharashtra State Board
Chapter 2.3 आम्ही हवे आहोत का?
उपक्रम | Q १. | Page 33

RELATED QUESTIONS

रानमेवा कशाला म्हणतात? रानमेव्यात कोणती फळे येतात, याविषयी कुटुंबातील व्यक्तींशी चर्चा करा.


खालील उतारा वाचा. त्याचा तुम्हांला समजलेला अर्थ सारांश रूपाने पुन्हा लिहा.

आपल्यासारख्या सामान्यांना शब्दावाचूनचे संवाद भावणारही नाहीत, की परवडणारही नाहीत. आपल्याला कठीण, साधे, सरळ, वक्र कसे का होईना; पण बोलणे आणि ठणठणीत बोलणेच हवे असते आणि या बोलण्याचे किती अनंत प्रकार असतात. ‘व्यक्ती तितक्या प्रकृती’ अशी म्हण आहे. त्या चालीवर ‘माणसे तितकी बोलणी’ अशी म्हण बनवायला हरकत नाही. ‘मोकळा संवाद’ असे आपण म्हणतो; पण समाजात वावरताना या तथाकथित मोकळ्या संवादावर कशी आणि किती बंधने पडत असतात ते पाहिले म्हणजे गंमत वाटते. मित्रमंडळींशी गप्पा मारताना आपण खूप मुक्त, मोकळे असतो अशी आपली समजूत असते; पण ती खरी असते का? आपणाला एकमेकांचे अनेक गुणदोष, एकमेकांच्या जीवनातले बरेवाईट तपशील ठाऊक असतात; त्यामुळे तिथे कधी मोकळ्या गप्पा होत असल्या, तरी अनेकदा नात्यातल्या जवळिकीमुळेच कधी कधी एक चमत्कारिक अवघडलेपणही अनुभवाला येते. एकमेकांची मते, आग्रह, दुराग्रह ठाऊक असल्यामुळे मतभेदाचे अवघड विषय बहुधा आपण शिताफीने टाळतो. वृत्तीतल्या हळव्या जागा, स्वाभिमानाची ठिकाणे माहीत असल्यामुळे बोलताना त्यांना कुठे धक्का लागणार नाही, समोरच्या व्यक्तीचे मन दुखावले जाणार नाही, याची सतत काळजी घ्यावी लागते.

मित्रमैत्रिणींमध्ये चर्चा करून ‘जैव विविधतेची गरज’, या विषयावर आठ ते दहा ओळींचा निबंध लिहा.


तुमच्या शाळेत सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम पाहण्यासाठी पालकांना आवाहन करणारा सूचनाफलक तयार करा.


‘पर्यावरण संरक्षण’ याविषयी पाठाच्या शेवटी माणसाने केलेली प्रतिज्ञा तुमच्या शब्दांत लिहा.

प्रतिज्ञा

आम्ही आमचे वर्तन बदलू.

__________________

__________________

__________________


खालील उतारा वाचा. त्या उताऱ्यात पूर्णविराम (.) स्वल्पविराम (,) प्रश्नचिन्ह (?) उद्गारचिन्ह (!) आणि एकेरी अवतरणचिन्ह (‘-’) घाला व उतारा पुन्हा लिहा.

एका छोट्याशा गावात एक सधन शेतकरी राहत होता शेतात काम करणाऱ्या दोन बैलजोड्या त्याच्याकडे होत्या तसेच दोन म्हशीही होत्या आणि एक चांगली धष्टपुष्ट आणि पुष्कळ दूध देणारी कपिला नावाची गायही होती त्यामुळे त्याच्या घरी भरपूर दूधदुभते असे ते दूध तो साऱ्या गावात विकत असे.

एकदा अशीच सारी गुरे नीट बांधून तो शेतकरी घरात जाऊन झोपला पण सकाळी उठून पाहतो तो त्याची गाय तिथे नव्हती. अगदी कासावीस झाला तो पांढरा आणि तपकिरी रंग असलेली ती गाय त्याची खूप लाडकी होती. लाेक मुद्दाम गाईचे दूध तूप दही नेत असत आता लाेकांना काय सांगणार काय करावे शेवटी तो शेजारच्या गावी दुसरी गाय विकत आणण्यासाठी गेला बाजार गुरांनी भरून गेला होता निरनिराळ्या रंगांच्या धिप्पाड मध्यम आणि बऱ्यापैकी दूध देणाऱ्या अशा अनेक गाई त्याने पाहिल्या गाई बघत तो असाच पुढे जात असताना एका गाईजवळ येऊन तो थांबला अन काय आश्चर्य कपिलेने त्याच्याकडे पाहिले त्याचे ही डोळे चमकले अरे ही तर आपली गाय कपिला नक्कीच या माणसाने त्या दिवशी माझी गाय चोरून नेली असावी आपल्या गाईच्या पाठीवर त्याने प्रेमाने थाप मारली कपिलेने त्याला ओळखले तिने आनंदाने कान व शिंगे हालवली.


अभ्यासाबरोबरच तुम्हांला इतर कोणत्या गाेष्टी करायला आवडतात? का ते लिहा.


‘माझा आवडता मित्र/मैत्रीण’ या विषयावर थोडक्यात माहिती लिहा.


सुट्टीच्या दिवशी मित्रांसोबत तुम्ही कोणकोणते खेळ खेळता?


तुमचा आवडता मित्र/मैत्रीण यांमधील तुम्हांला कोणते गुण सर्वांत जास्त आवडतात?


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×