Advertisements
Advertisements
Question
तुमचा आवडता मित्र/मैत्रीण यांमधील तुम्हांला कोणते गुण सर्वांत जास्त आवडतात?
Solution 1
संकेत हा माझा आवडता मित्र आहे. आम्ही दोघे अगदी पहिल्या इयत्तेपासून मित्र आहोत. संकेत नेहमी इतरांना मदत करतो. मग ती व्यक्ती त्याच्या ओळखीची असो वा नसो! ज्याला कोणाला मदतीची गरज असेल तेथे संकेत शक्य ती मदत करतोच व त्याचा मोठेपणाही मिरवत नाही. त्याचा स्पष्टवक्तेपणा, खरे बोलणेही मला आवडते. माझ्या चुका तो मला स्पष्टपणे सांगतो व त्या सुधारण्यात मदतही करतो. तसेच, तो अत्यंत मनमिळाऊ असल्याने त्याची इतरांशीही चटकन मैत्री होते. त्याचे हे गुण मला सर्वांत जास्त आवडतात.
Solution 2
साक्षी ही माझी आवडती मैत्रीण आहे. आम्ही दोघी अगदी पहिल्या इयत्तेपासून मैत्रिणी आहोत. साक्षी नेहमी इतरांना मदत करते. मग ती व्यक्ती तिच्या ओळखीची असो वा नसो! ज्याला कोणाला मदतीची गरज असेल तेथे साक्षी शक्य ती मदत करतेच व तिचा मोठेपणाही मिरवत नाही. तिचा स्पष्टवक्तेपणा, खरे बोलणेही मला आवडते. माझ्या चुका ती मला स्पष्टपणे सांगते व त्या सुधारण्यात मदतही करते. तसेच, ती अत्यंत मनमिळाऊ असल्याने तिची इतरांशीही चटकन मैत्री होते. तिचे हे गुण मला सर्वांत जास्त आवडतात.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
खालील बातमी वाचून त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा.
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, उत्रौली या शाळेत कला शिबिराचा समारोप संपन्न.
दिनांक: २० डिसेंबर लोकप्रतिभा चित्रकला शिबिराचा समारोप उत्रौली (ता. भोर) : उत्रौली येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत दहा दिवसांचे चित्रकला शिबिर नुकतेच संपन्न झाले. १९ डिसेंबर रोजी दुपारी ४.०० ते ६.०० या वेळात शिबिराचा समारोप समारंभ साजरा झाला. या शिबिराची सांगता प्रसिद्ध चित्रकार श्री. अविनाश शिवतरे यांच्या सप्रात्यक्षिक मनोगताने करण्यात आली. आपल्या जीवनातील कलेचे महत्त्व सांगताना प्रत्येकाने कोणती-ना-कोणती कला शिकणे आवश्यक आहे, हा विचार त्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केला. समारंभाचे अध्यक्षस्थान उच्च प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री. सदाशिव शिंदे यांनी भूषवले. कलाशिक्षिका श्रीमती सुनीता सोमण यांनी प्रमुख पाहुणे व उपस्थितांचे आभार मानले. या निमित्ताने सर्व पंचवीस शिबिरार्थींच्या चित्रांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. त्याला रसिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. |
(१) कोण ते लिहा.
(अ) समारंभाचे प्रमुख पाहुणे-
(आ) समारंभाचे अध्यक्ष-
(इ) चित्रकला प्रदर्शनास प्रतिसाद देणारे-
(२) उत्तर लिहा.
(अ) शिबिरार्थींची संख्या-
(आ) शिबिरार्थींनी शिबिरात शिकलेली कला-
(इ) शिबिराचे ठिकाण-
(ई) शिबिर सुरू झाले ती तारीख-
(३) वरील बातमीमध्ये ज्या ज्या गोष्टींविषयी माहिती दिलेली आहे ते घटक लिहा.
तुम्ही तुमच्या धाकट्या भावासाठी/बहिणीसाठी कोणकोणत्या भेटवस्तू घेता? कोणकोणत्या प्रसंगी घेता?
खालील मुद्द्यांच्या आधारे ‘माझा आवडता खेळ’ या विषयावर आठ ते दहा ओळी निबंध लिहा.
तुमच्या शाळेमध्ये उन्हाळी सुट्टीत ‘हस्ताक्षर सुंदर करूया!’ हे १० दिवसांचे शिबिर आयोजित केले आहे. त्यात तुम्हांला सहभागी करून घेण्याची विनंती करणारे पत्र वर्ग शिक्षकांना लिहा.
खालील जाहिरातीचे वाचन व निरीक्षण करून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा.
(अ) उत्तरे लिहा.
- जाहिरातीचा विषय -
- जाहिरात देणारे (जाहिरातदार) -
- वरील जाहिरातीत सर्वांत जास्त आकर्षित करून घेणारा घटक -
- जाहिरात कोणासाठी आहे?
(आ) वरील जाहिरात अधिक आकर्षक होण्यासाठी त्यात कोणकोणत्या घटकांचा समावेश असावा, असे तुम्हांला वाटते?
(इ) तुमच्या मते जाहिरातीमधील महत्त्वाची वैशिष्ट्ये.
‘तुम्ही पक्षी आहात’, अशी कल्पना करून तुम्हांला स्वच्छंदीपणे कोणकोणत्या गोष्टी करायला आवडतील, ते लिहा.
नदी व झाड या दोघांमधील संवादाची कल्पना करून संवादलेखन करा.
'स' चा शब्दपंखा पूर्ण करा.
१. वर्णमालेतील बत्तीसावे अक्षर.
२. जंगलातील एक भित्रा प्राणी.
३. नेहमी.
४. एक शीतपेय.
५. रस्ता.
६. उत्सव.
७. ढीग या शब्दासाठी कवितेत आलेला शब्द. रा...
तुमच्या परिसरातील ज्या घरी पाळीव प्राणी आहेत अशा पाच घरांना भेटी द्या. त्या घरातील लोक पाळीव प्राण्यांची काळजी कशी घेतात याची खालील मुद्द्यांच्या आधारे माहिती मिळवा व वर्गात सांगा.
तुम्ही भेट दिलेल्या एखाद्या पर्यटनस्थळाचे वर्णन करणारे पत्र मित्राला/मैत्रिणीला लिहा.
खालील सूचना वाचा. अशा आणखी सूचना तयार करा.
- नदीच्या पाण्यात केरकचरा, निर्माल्य टाकू नये.
- ओला कचरा, सुका कचरा ठेवा वेगवेगळा, तरच प्रदूषणाला बसेल आळा.
दवाखान्याच्या ठिकाणी लावलेल्या पाट्या वाचा. त्या पाट्यांमध्ये आपल्याला सूचना दिलेल्या असतात. या सूचनांव्यतिरिक्त आणखी काही सूचनांच्या पाट्या तुम्ही तयार करा.
शाळेच्या परिसरात स्वच्छताविषयक पाट्या लावायच्या आहेत, तर तुम्ही कोणत्या पाट्या तयार कराल?
तुम्ही एखादा उपक्रम केला असेल, तर त्याबाबतची माहिती मित्राला पत्राने कळवा.
अभ्यासाबरोबरच तुम्हांला इतर कोणत्या गाेष्टी करायला आवडतात? का ते लिहा.
तुमची लाडकी ताई घरात नसली, तर तुम्हांला काय वाटते, ते थोडक्यात सांगा.
सुट्टीच्या दिवशी मित्रांसोबत तुम्ही कोणकोणते खेळ खेळता?
खालील प्रसंगी तुम्ही काय कराल?
शाळेत पिण्याच्या पाण्याचा नळ कोणीतरी विनाकारण सुरू ठेवला.