Advertisements
Advertisements
Question
खालील उतारा वाचा. त्या उताऱ्यात पूर्णविराम (.) स्वल्पविराम (,) प्रश्नचिन्ह (?) उद्गारचिन्ह (!) आणि एकेरी अवतरणचिन्ह (‘-’) घाला व उतारा पुन्हा लिहा.
एका छोट्याशा गावात एक सधन शेतकरी राहत होता शेतात काम करणाऱ्या दोन बैलजोड्या त्याच्याकडे होत्या तसेच दोन म्हशीही होत्या आणि एक चांगली धष्टपुष्ट आणि पुष्कळ दूध देणारी कपिला नावाची गायही होती त्यामुळे त्याच्या घरी भरपूर दूधदुभते असे ते दूध तो साऱ्या गावात विकत असे. एकदा अशीच सारी गुरे नीट बांधून तो शेतकरी घरात जाऊन झोपला पण सकाळी उठून पाहतो तो त्याची गाय तिथे नव्हती. अगदी कासावीस झाला तो पांढरा आणि तपकिरी रंग असलेली ती गाय त्याची खूप लाडकी होती. लाेक मुद्दाम गाईचे दूध तूप दही नेत असत आता लाेकांना काय सांगणार काय करावे शेवटी तो शेजारच्या गावी दुसरी गाय विकत आणण्यासाठी गेला बाजार गुरांनी भरून गेला होता निरनिराळ्या रंगांच्या धिप्पाड मध्यम आणि बऱ्यापैकी दूध देणाऱ्या अशा अनेक गाई त्याने पाहिल्या गाई बघत तो असाच पुढे जात असताना एका गाईजवळ येऊन तो थांबला अन काय आश्चर्य कपिलेने त्याच्याकडे पाहिले त्याचे ही डोळे चमकले अरे ही तर आपली गाय कपिला नक्कीच या माणसाने त्या दिवशी माझी गाय चोरून नेली असावी आपल्या गाईच्या पाठीवर त्याने प्रेमाने थाप मारली कपिलेने त्याला ओळखले तिने आनंदाने कान व शिंगे हालवली. |
Solution
एका छोट्याशा गावात एक सधन शेतकरी राहत होता. शेतात काम करणाऱ्या दोन बैलजोड्या त्याच्याकडे होत्या. तसेच, दोन म्हशीही होत्या आणि एक चांगली, धष्टपुष्ट आणि पुष्कळ दूध देणारी 'कपिला' नावाची गायही होती. त्यामुळे, त्याच्या घरी भरपूर दूधदुभते असे. ते दूध तो साऱ्या गावाला विकत असे.
एकदा अशीच सारी गुरे नीट बांधून तो शेतकरी घरात झोपला; पण सकाळी उठून पाहतो, तो त्याची गाय तिथे नव्हती! अगदी कासावीस झाला तो ! पांढरा आणि तपकिरी रंग असलेली ती गाय त्याची खूप लाडकी होती. लोक मुद्दाम गाईचे दूध, तूप, दही नेत असत. आता लोकांना काय सांगणार? काय करावे? शेवटी तो शेजारच्या गावी दुसरी गाय विकत आणण्यासाठी गेला. बाजार गुरांनी भरून गेला होता. निरनिराळ्या रंगांच्या, धिप्पाड, मध्यम आणि बऱ्यापैकी दूध देणाऱ्या अशा अनेक गाई त्याने पाहिल्या. गाई बघत तो असाच पुढे जात असताना एका गाईजवळ येऊन तो थांबला. अन् काय आश्चर्य! कपिलेने त्याच्याकडे पाहिले! त्याचेही डोळे चमकले. 'अरे, ही तर आपली गाय कपिला! नक्कीच या माणसाने त्या दिवशी माझी गाय चोरून नेली असावी.' आपल्या गाईच्या पाठीवर त्याने प्रेमाने थाप मारली. कपिलेने त्याला ओळखले, तिने आनंदाने कान व शिंगे हालवली.
RELATED QUESTIONS
घाटातून जाताना घ्यायची काळजी याविषयीचे सूचनाफलक तयार करा.
तुमच्या परिसरातील ज्या घरी पाळीव प्राणी आहेत अशा पाच घरांना भेटी द्या. त्या घरातील लोक पाळीव प्राण्यांची काळजी कशी घेतात याची खालील मुद्द्यांच्या आधारे माहिती मिळवा व वर्गात सांगा.
माहिती देण्यासाठी किंवा घेण्यासाठी अनेक साधने वापरली जातात. खाली माहिती देवाणघेवाण करण्याची/संवादाची काही साधने दिली आहेत. त्यांतील काही साधने एकतर्फी व दुतर्फी माहितीची/संवादाची देवाणघेवाण करतात. त्यांची माहिती मिळवा व दिलेल्या तक्त्यात वर्गीकरण करा.
फॅक्स, पत्र, इ-मेल, मोबाइल, आंतरजाल, रेडिओ, वर्तमानपत्र, मोबाइल संदेश, चर्चा, मुलाखत, जाहिरात, भाषण, संभाषण.
एकतर्फी माहितीची/संवादाची साधने | दुतर्फी माहितीची/संवादाची साधने |
‘पर्यावरण संरक्षण’ याविषयी पाठाच्या शेवटी माणसाने केलेली प्रतिज्ञा तुमच्या शब्दांत लिहा.
प्रतिज्ञा आम्ही आमचे वर्तन बदलू. __________________ __________________ __________________ |
‘पाणी हेच जीवन’ यांवर आधारित दहा ओळी लिहा.
तुम्ही एखादा उपक्रम केला असेल, तर त्याबाबतची माहिती मित्राला पत्राने कळवा.
मराठी भाषेत विनोदी लेखन करणाऱ्या लेखकांची व त्यांच्या साहित्याची शिक्षक, पालक यांच्या मदतीने यादी करा. विनोदी गोष्टी वाचा व वर्गात सांगा.
'शब्द' या विषयावर आधारित सुविचार मिळवा. त्यांचा संग्रह करा. त्याची सुंदर चिकटवही बनवा.
तुमची लाडकी ताई घरात नसली, तर तुम्हांला काय वाटते, ते थोडक्यात सांगा.
तुमचा आवडता मित्र/मैत्रीण यांमधील तुम्हांला कोणते गुण सर्वांत जास्त आवडतात?