Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील उतारा वाचा. त्या उताऱ्यात पूर्णविराम (.) स्वल्पविराम (,) प्रश्नचिन्ह (?) उद्गारचिन्ह (!) आणि एकेरी अवतरणचिन्ह (‘-’) घाला व उतारा पुन्हा लिहा.
एका छोट्याशा गावात एक सधन शेतकरी राहत होता शेतात काम करणाऱ्या दोन बैलजोड्या त्याच्याकडे होत्या तसेच दोन म्हशीही होत्या आणि एक चांगली धष्टपुष्ट आणि पुष्कळ दूध देणारी कपिला नावाची गायही होती त्यामुळे त्याच्या घरी भरपूर दूधदुभते असे ते दूध तो साऱ्या गावात विकत असे. एकदा अशीच सारी गुरे नीट बांधून तो शेतकरी घरात जाऊन झोपला पण सकाळी उठून पाहतो तो त्याची गाय तिथे नव्हती. अगदी कासावीस झाला तो पांढरा आणि तपकिरी रंग असलेली ती गाय त्याची खूप लाडकी होती. लाेक मुद्दाम गाईचे दूध तूप दही नेत असत आता लाेकांना काय सांगणार काय करावे शेवटी तो शेजारच्या गावी दुसरी गाय विकत आणण्यासाठी गेला बाजार गुरांनी भरून गेला होता निरनिराळ्या रंगांच्या धिप्पाड मध्यम आणि बऱ्यापैकी दूध देणाऱ्या अशा अनेक गाई त्याने पाहिल्या गाई बघत तो असाच पुढे जात असताना एका गाईजवळ येऊन तो थांबला अन काय आश्चर्य कपिलेने त्याच्याकडे पाहिले त्याचे ही डोळे चमकले अरे ही तर आपली गाय कपिला नक्कीच या माणसाने त्या दिवशी माझी गाय चोरून नेली असावी आपल्या गाईच्या पाठीवर त्याने प्रेमाने थाप मारली कपिलेने त्याला ओळखले तिने आनंदाने कान व शिंगे हालवली. |
उत्तर
एका छोट्याशा गावात एक सधन शेतकरी राहत होता. शेतात काम करणाऱ्या दोन बैलजोड्या त्याच्याकडे होत्या. तसेच, दोन म्हशीही होत्या आणि एक चांगली, धष्टपुष्ट आणि पुष्कळ दूध देणारी 'कपिला' नावाची गायही होती. त्यामुळे, त्याच्या घरी भरपूर दूधदुभते असे. ते दूध तो साऱ्या गावाला विकत असे.
एकदा अशीच सारी गुरे नीट बांधून तो शेतकरी घरात झोपला; पण सकाळी उठून पाहतो, तो त्याची गाय तिथे नव्हती! अगदी कासावीस झाला तो ! पांढरा आणि तपकिरी रंग असलेली ती गाय त्याची खूप लाडकी होती. लोक मुद्दाम गाईचे दूध, तूप, दही नेत असत. आता लोकांना काय सांगणार? काय करावे? शेवटी तो शेजारच्या गावी दुसरी गाय विकत आणण्यासाठी गेला. बाजार गुरांनी भरून गेला होता. निरनिराळ्या रंगांच्या, धिप्पाड, मध्यम आणि बऱ्यापैकी दूध देणाऱ्या अशा अनेक गाई त्याने पाहिल्या. गाई बघत तो असाच पुढे जात असताना एका गाईजवळ येऊन तो थांबला. अन् काय आश्चर्य! कपिलेने त्याच्याकडे पाहिले! त्याचेही डोळे चमकले. 'अरे, ही तर आपली गाय कपिला! नक्कीच या माणसाने त्या दिवशी माझी गाय चोरून नेली असावी.' आपल्या गाईच्या पाठीवर त्याने प्रेमाने थाप मारली. कपिलेने त्याला ओळखले, तिने आनंदाने कान व शिंगे हालवली.
संबंधित प्रश्न
मित्रमैत्रिणींमध्ये चर्चा करून ‘जैव विविधतेची गरज’, या विषयावर आठ ते दहा ओळींचा निबंध लिहा.
तुमच्या परिसरातील एखाद्या अनुभवी शेतकऱ्याची तुम्हांला मुलाखत घ्यायची आहे. त्यासाठी प्रश्नावली तयार करा.
‘पर्यावरण संरक्षण’ याविषयी पाठाच्या शेवटी माणसाने केलेली प्रतिज्ञा तुमच्या शब्दांत लिहा.
प्रतिज्ञा आम्ही आमचे वर्तन बदलू. __________________ __________________ __________________ |
दवाखान्याच्या ठिकाणी लावलेल्या पाट्या वाचा. त्या पाट्यांमध्ये आपल्याला सूचना दिलेल्या असतात. या सूचनांव्यतिरिक्त आणखी काही सूचनांच्या पाट्या तुम्ही तयार करा.
‘पाणी हेच जीवन’ यांवर आधारित दहा ओळी लिहा.
शब्दांमुळे, भाषेमुळे दैनंदिन व्यवहारात कोणते फायदे होतात, या विषयावर मित्रांशी चर्चा करा.
खालील मुद्यांच्या आधारे अर्थपूर्ण परिच्छेद तयार करा व त्याला योग्य शीर्षक द्या.
सकाळची वेळ ...... बाबांबरोबर फिरायला ...... झाडांवर बसलेले पाखरांचे थवे ...... किलबिल ...... शुद्ध हवा ...... आल्हाददायक वातावरण ...... बाबांशी गप्पा मारत घराकडे परतणे ...... दिवसभर ताजेतवाने वाटणे.
सुट्टीच्या दिवशी मित्रांसोबत तुम्ही कोणकोणते खेळ खेळता?
खालील प्रसंगी तुम्ही काय कराल?
शाळेत पिण्याच्या पाण्याचा नळ कोणीतरी विनाकारण सुरू ठेवला.
खालील प्रसंगी तुम्ही काय कराल?
सहलीत तुमचा मित्र किल्ल्याच्या भिंतीवर नावे लिहीत आहे.