Advertisements
Advertisements
प्रश्न
तुम्ही एखादा उपक्रम केला असेल, तर त्याबाबतची माहिती मित्राला पत्राने कळवा.
उत्तर
साहिल बोरकर,
३०२, साई धाम,
दादर (प).
मुंबई- ४०० ०२५
दि. १० जून २०१८
प्रिय सुहास,
सप्रेम नमस्कार,
कसा आहेस तू? काका-काकू कसे आहेत? तू नाशिकला गेल्यापासून एकदाही आपण भेटलो नाही. आम्ही मित्रांनी मिळून गेल्या आठवड्यात आपल्या परिसरात 'स्वच्छता अभियान सप्ताह' साजरा केला. आठवडाभर आम्ही सर्वांनी फुटपाथवर उभे राहून रस्त्यावर कुठेही थुंकणाऱ्या, कचरा टाकणाऱ्या लोकांना चांगल्या शब्दांत समज दिली. त्यातील अनेक लोकांनी आम्हांला पुन्हा असे न करण्याचे वचनही दिले आहे. तसेच, आम्ही आपल्या परिसरात, सार्वजनिक ठिकाणी जमेल तशी साफसफाई केली. आपल्या राजूदादाने बसवलेल्या 'अस्वच्छता निर्मूलन' नावाच्या पथनाट्यातही आम्ही सहभागी झालो होतो. ते पथनाट्य लोकांना खूप आवडले. शिवाय, लोकांमध्ये चांगली समज निर्माण झाली, बदल घडून आला. या सर्व उपक्रमांसाठी आपले स्थानिक नगरसेवक राजन सोनावणे यांनी त्यांचे स्वयंसेवक देऊन साहाय्य केले.
तुला सांगतो, असेच उपक्रम जर प्रत्येक गल्ली, रस्ते, गाव, शहरात राबवले गेले, तर लवकरच आपल्या देशाचा चेहरामोहराच बदलून जाईल. पुढच्या महिन्यातही आम्ही मुले असाच उपक्रम पुन्हा करणार आहोत. आम्ही राबवलेला हा उपक्रम तुला कसा वाटला ते नक्की कळव. तुझ्या उत्तराची वाट पाहत आहे. काका-काकूंना माझा नमस्कार कळव.
तुझा मित्र,
साहिल
संबंधित प्रश्न
खालील बातमी वाचून त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा.
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, उत्रौली या शाळेत कला शिबिराचा समारोप संपन्न.
दिनांक: २० डिसेंबर लोकप्रतिभा चित्रकला शिबिराचा समारोप उत्रौली (ता. भोर) : उत्रौली येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत दहा दिवसांचे चित्रकला शिबिर नुकतेच संपन्न झाले. १९ डिसेंबर रोजी दुपारी ४.०० ते ६.०० या वेळात शिबिराचा समारोप समारंभ साजरा झाला. या शिबिराची सांगता प्रसिद्ध चित्रकार श्री. अविनाश शिवतरे यांच्या सप्रात्यक्षिक मनोगताने करण्यात आली. आपल्या जीवनातील कलेचे महत्त्व सांगताना प्रत्येकाने कोणती-ना-कोणती कला शिकणे आवश्यक आहे, हा विचार त्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केला. समारंभाचे अध्यक्षस्थान उच्च प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री. सदाशिव शिंदे यांनी भूषवले. कलाशिक्षिका श्रीमती सुनीता सोमण यांनी प्रमुख पाहुणे व उपस्थितांचे आभार मानले. या निमित्ताने सर्व पंचवीस शिबिरार्थींच्या चित्रांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. त्याला रसिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. |
(१) कोण ते लिहा.
(अ) समारंभाचे प्रमुख पाहुणे-
(आ) समारंभाचे अध्यक्ष-
(इ) चित्रकला प्रदर्शनास प्रतिसाद देणारे-
(२) उत्तर लिहा.
(अ) शिबिरार्थींची संख्या-
(आ) शिबिरार्थींनी शिबिरात शिकलेली कला-
(इ) शिबिराचे ठिकाण-
(ई) शिबिर सुरू झाले ती तारीख-
(३) वरील बातमीमध्ये ज्या ज्या गोष्टींविषयी माहिती दिलेली आहे ते घटक लिहा.
रानमेवा कशाला म्हणतात? रानमेव्यात कोणती फळे येतात, याविषयी कुटुंबातील व्यक्तींशी चर्चा करा.
तुमच्या शाळेमध्ये उन्हाळी सुट्टीत ‘हस्ताक्षर सुंदर करूया!’ हे १० दिवसांचे शिबिर आयोजित केले आहे. त्यात तुम्हांला सहभागी करून घेण्याची विनंती करणारे पत्र वर्ग शिक्षकांना लिहा.
नदी व झाड या दोघांमधील संवादाची कल्पना करून संवादलेखन करा.
मित्रमैत्रिणींमध्ये चर्चा करून ‘जैव विविधतेची गरज’, या विषयावर आठ ते दहा ओळींचा निबंध लिहा.
तुमच्या शाळेत सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम पाहण्यासाठी पालकांना आवाहन करणारा सूचनाफलक तयार करा.
माहिती देण्यासाठी किंवा घेण्यासाठी अनेक साधने वापरली जातात. खाली माहिती देवाणघेवाण करण्याची/संवादाची काही साधने दिली आहेत. त्यांतील काही साधने एकतर्फी व दुतर्फी माहितीची/संवादाची देवाणघेवाण करतात. त्यांची माहिती मिळवा व दिलेल्या तक्त्यात वर्गीकरण करा.
फॅक्स, पत्र, इ-मेल, मोबाइल, आंतरजाल, रेडिओ, वर्तमानपत्र, मोबाइल संदेश, चर्चा, मुलाखत, जाहिरात, भाषण, संभाषण.
एकतर्फी माहितीची/संवादाची साधने | दुतर्फी माहितीची/संवादाची साधने |
मराठी भाषेत विनोदी लेखन करणाऱ्या लेखकांची व त्यांच्या साहित्याची शिक्षक, पालक यांच्या मदतीने यादी करा. विनोदी गोष्टी वाचा व वर्गात सांगा.
महाराष्ट्रातील प्रेरणादायी कार्य करणाऱ्या महिलांविषयीची माहिती आंतरजालावरून मिळवा.
खालील मुद्यांच्या आधारे अर्थपूर्ण परिच्छेद तयार करा व त्याला योग्य शीर्षक द्या.
सकाळची वेळ ...... बाबांबरोबर फिरायला ...... झाडांवर बसलेले पाखरांचे थवे ...... किलबिल ...... शुद्ध हवा ...... आल्हाददायक वातावरण ...... बाबांशी गप्पा मारत घराकडे परतणे ...... दिवसभर ताजेतवाने वाटणे.