Advertisements
Advertisements
Question
मित्रमैत्रिणींमध्ये चर्चा करून ‘जैव विविधतेची गरज’, या विषयावर आठ ते दहा ओळींचा निबंध लिहा.
Solution
जैव विविधतेची गरज
आपण सर्व पृथ्वीतलावर राहतो. मानवांप्रमाणेच इतरही सजीव, त्यांच्या विविध जाती-प्रजाती येथे राहतात. अशा सजीव-नीर्जीव, नैसर्गिक, मानवनिर्मित घटकांचे मिळून एक पर्यावरण तयार होते. या पर्यावरणातील प्रत्येक घटक विशेष असतो, मग तो वनस्पती असो, की प्राणी; बलाढ्य असो वा साधा जीवजंतू. प्रत्येकाचीच भूमिका येथे महत्त्वाची ठरते. 'जीवो जीवस्य जीवनम्' असे म्हणतात. निसर्गातील सर्वच घटक एकमेकांवर अवलंबून असतात. गवत खाणारे शाकाहारी प्राणी, त्यांच्यावर जगणारे मांसाहारी प्राणी, हे प्राणी मेल्यावर त्यांच्यावर जगणाऱ्या अळ्या, जीवजंतू हे सर्वच एका अन्नसाखळीचे घटक एकमेकांवर अवलंबून आहेत. त्यांच्यापैकी प्रत्येकाचे या सृष्टीत टिकून राहणे महत्त्वाचे आहे. त्यांच्यामुळेच आपले अस्तित्व ही टिकून आहे म्हणून निसर्गातील विविधता जपणे हे आपले कर्तव्य आहे.
आज हवा, पाणी, माती अशा अनेक प्रकारच्या नैसर्गिक व मानवनिर्मित प्रदूषणांमुळे निसर्गातील जैवविविधतेला हानी पोहोचत आहे. निसर्ग आपल्या 'गरजा' पूर्ण करू शकेल, पण हाव पूर्ण करू शकणार नाही, असे गांधीजी म्हणाले होते. आज मानवाच्या हव्यासापायी जैवविविधता मोठ्या प्रमाणावर नष्ट होत आहे. पूर्वी आपल्या सजीव सृष्टीत प्रचंड विविधता होती. अनेक दुर्मीळ प्रकारचे प्राणी, पक्षी, वनस्पती, त्यांचे प्रकार, उपप्रकार त्यात आढळत. मानवाच्या कृत्यांमुळे ह्या प्रजाती काळाच्या ओघात नष्ट झाल्या व होत आहेत. त्यामुळे, निसर्गाचा समतोल बिघडला आहे व दिवसेंदिवस नवनवीन पर्यावरणीय समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
असं म्हटलं जातं, की आपल्याला ही पृथ्वी आपल्या आधीच्या पिढ्यांकडून वारसाहक्काने मिळालेली नाही, तर आपण ही पृथ्वी आपल्या पुढच्या पिढ्यांकडून उधार घेतली आहे, म्हणून ही पृथ्वी आपल्यासाठी व भविष्यात येणाऱ्या पिढ्यांसाठी एक अनमोल खजिना म्हणून सांभाळणे ही आज काळाची गरज बनली आहे. पृथ्वीवर असणारी जैवविविधता आपणा सर्वांसाठी आवश्यक आहे, म्हणूनच ही समृद्धी जपण्याची जबाबदारी आपल्या सर्वांचीच आहे कारण निसर्ग आहे तरच आपण आहोत. निसर्गातील प्रत्येक लहानापासून मोठ्या घटकाचे स्थान हे तितकेच अमूल्य आहे. त्यामुळे, जैवविविधतेची गरज ओळखून पृथ्वीवरील संपूर्ण सजीवसृष्टी सुरक्षित राखण्यासाठी आपणास प्रयत्न करायला हवेत.
RELATED QUESTIONS
खालील उतारा वाचा व त्यास योग्य शीर्षक द्या.
प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात सुखदु:खाचे क्षण नेहमीच येत असतात. दु:खाच्या व अडचणीच्या प्रसंगांना जे खिलाडू वृत्तीने सामोरे जातात, जे जिंकण्याच्या उर्मीने हाती घेतलेले काम पूर्ण करण्यासाठी स्वयंप्रेरणेने काम करतात, तेच आयुष्यात यश मिळवतात. कोणतीही वाईट परिस्थिती तुम्हांला अडवू किंवा हरवू शकत नाही. वेळप्रसंगी तुम्हांला दोन पावले मागेही टाकावी लागतात; परंतु जर आपण मनानेच हरलो, तर पुढील कार्य पूर्ण करण्यासाठी आपण तयार होऊ शकत नाही. अशा परिस्थितीत कायम आपले आपल्या मनावर नियंत्रण असणे आवश्यक असते. नकारात्मक विचार करण्यापासून आपण स्वत:ला थांबवणे आवश्यक आहे. त्याचबरोबर आपल्या मनाला चांगल्या सवयी लावणेही आवश्यक आहे. आपल्या मनाला चांगली सवय लावणे हे कठीण असले, तरी अशक्य मात्र नक्कीच नाही! आपल्या अंगी असणाऱ्या चांगल्या सवयी, वाईट सवयींना जवळ येऊ देत नाहीत. मनाला चांगल्या विचारांची सवय लावली, तर ती सवय वाईट विचारांपासून तुम्हांला नक्कीच दूर ठेवील. यासाठी तुम्हांला काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. उदा., चांगले वाचन, चांगल्या मित्रमैत्रिणींची संगत, घरातील ज्येष्ठ व्यक्तींशी असणारे जिव्हाळ्याचे व आपुलकीचे संबंध इत्यादी. जो दुसऱ्याच्यादु:खात नेहमी सहभागी होतो त्यालाच जीवनाचा खरा अर्थ कळतो. मानसिक आधार देऊन, विचारांच्या देवाणघेवाणीतून आपण एकमेकांचे दु:ख सहज हलके करू शकतो. असे सुखदु:खाचे प्रसंग प्रत्येकाच्या आयुष्यात सतत येत असतात मात्र या प्रसंगांना जो धीराने सामोरा जातो, तोच जीवनात यशस्वी होतो. |
तुमच्या शाळेमध्ये उन्हाळी सुट्टीत ‘हस्ताक्षर सुंदर करूया!’ हे १० दिवसांचे शिबिर आयोजित केले आहे. त्यात तुम्हांला सहभागी करून घेण्याची विनंती करणारे पत्र वर्ग शिक्षकांना लिहा.
‘तुम्ही पक्षी आहात’, अशी कल्पना करून तुम्हांला स्वच्छंदीपणे कोणकोणत्या गोष्टी करायला आवडतील, ते लिहा.
माहिती देण्यासाठी किंवा घेण्यासाठी अनेक साधने वापरली जातात. खाली माहिती देवाणघेवाण करण्याची/संवादाची काही साधने दिली आहेत. त्यांतील काही साधने एकतर्फी व दुतर्फी माहितीची/संवादाची देवाणघेवाण करतात. त्यांची माहिती मिळवा व दिलेल्या तक्त्यात वर्गीकरण करा.
फॅक्स, पत्र, इ-मेल, मोबाइल, आंतरजाल, रेडिओ, वर्तमानपत्र, मोबाइल संदेश, चर्चा, मुलाखत, जाहिरात, भाषण, संभाषण.
एकतर्फी माहितीची/संवादाची साधने | दुतर्फी माहितीची/संवादाची साधने |
तुम्ही भेट दिलेल्या एखाद्या पर्यटनस्थळाचे वर्णन करणारे पत्र मित्राला/मैत्रिणीला लिहा.
फुलांना रंग कशामुळे प्राप्त होतो? फुलांमध्ये दोन प्रकाची रंगद्रव्ये असतात. हरितद्रव्ये, कॅरोटिन यांमुळे नारिंगी, पिवळा, हिरवा हे रंग फुलांच्या पाकळ्यांना मिळतात. लाल, गुलाबी, निळा वगैरे रंग फुलांमधील अँथोसायनीन या रंगद्रव्यामुळे मिळतील. हि रंगद्रवे पाण्यात विरघळू शकतात. ज्या वेळी फुलांना जीवनरसाचा पुरवठा होतो, त्या वेळी त्यात हि रंगद्रव्ये विरघळतात. कोणत्या फुलांत कोणती रंगद्रवे असतात, हे त्यांतील गुणसूत्रे ठरवतात आणि गुणसूत्रे आनुवंशिक असल्यामुळे त्या त्या फुलांचा रंग ठरावीकच असतो, तो बदलत नाही. |
शाळेच्या परिसरात स्वच्छताविषयक पाट्या लावायच्या आहेत, तर तुम्ही कोणत्या पाट्या तयार कराल?
'शब्द' या विषयावर आधारित सुविचार मिळवा. त्यांचा संग्रह करा. त्याची सुंदर चिकटवही बनवा.
तुमचा आवडता मित्र/मैत्रीण यांमधील तुम्हांला कोणते गुण सर्वांत जास्त आवडतात?
खालील प्रसंगी तुम्ही काय कराल?
तुमच्या मित्राने/मैत्रिणीने आज डबा आणला नाही.