Advertisements
Advertisements
प्रश्न
स्वमत.
'दुसऱ्यासाठी घाव सोसणे' या ओळीतील तुम्हांला कळलेला अर्थ.
उत्तर
'झाड' या निसर्गातील एका महत्त्वाच्या घटकाकडून परोपकारी वृत्ती, स्थितप्रज्ञता या गुणांसोबतच 'दुसऱ्यासाठी घाव सोसण्याची सहनशील वृत्ती' हा गुणही शिकण्यासारखा आहे. झाड सदैव इतरांच्या उपयोगी पडते. ते त्याची जोपासना करणाऱ्याला आणि त्याच्यावर कुऱ्हाड चालवणाऱ्याला दोघांनाही समान वागवते, दोघांनाही मदत करते. झाड स्वत:वर कुऱ्हाड चालवणाऱ्या व्यक्तीचा राग तर करत नाहीच उलट स्वत:चे लाकूड इतरांच्या उपयोगी पडावे याकरता ते स्वत: कुऱ्हाडीचे घावही सहन करते. झाडाचा हा दुसऱ्यासाठी झिजण्याचा, कष्ट सोसण्याचा, स्वत: जखमी होऊन, त्रास सहन करूनही दुसऱ्याला मदतरूप ठरण्याचा गुण वरील ओळींतून स्पष्ट होतो.
संबंधित प्रश्न
खालील प्रश्नाचे एका वाक्यात उत्तर लिहा.
प्रगतीची नवपरिभाषा कोणती?
चौकटीतील शब्दाचा आधार घेऊन उत्तर लिहा.
पसरणारा सुवास → | कशाचा | ______ |
कवितेच्या आधारे योग्य पर्याय निवडा.
कवीच्या मते ‘मानवतेचे युग’ म्हणजे -
योग्य जोड्या जुळवा.
‘अ’ गट | ‘ब’ गट |
(१) नव्या युगाच्या नभात | (अ) व्यक्तित्वाची जडणघडण |
(२) प्रतिभेची प्रभात | (आ) स्वत:चे अस्तित्व मजबूत करणे. |
(३) पायाभरणी अस्तित्वाची | (इ) नवनिर्मितीची पहाट |
(४) व्यक्तित्वाची प्रयोगशाळा | (ई) नव्या विचारांच्या क्षेत्रात |
तुमच्या शब्दांत उत्तरे लिहा.
तुम्हांला कळलेली कवीची प्रगतीची नवपरिभाषा स्पष्ट करा.
खालील अर्थाचे कवितेतील शब्द शोधा.
इच्छा -
परिणाम लिहा.
झुळकेने कलिकेला स्पर्श केला -
परिणाम लिहा.
बकुळीच्या फुलांना स्पर्श केला-
खालील शब्दसमूहाचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.
पाचूचे मखमली शेत -
आकृती पूर्ण करा.