Advertisements
Advertisements
Question
तुमच्या शब्दात सोदाहरण स्पष्टीकरण द्या.
वनस्पतींमधील परिवहन कसे होते?
Answer in Brief
Solution
वनस्पतींमधील परिवहन मूलदाब आणि बाष्पोच्छवास या दोन प्रक्रियांमुळे होते, आणि त्याचप्रमाणे स्थानांतरण प्रक्रियेने अन्नाचे परिवहन रसवाहिन्यांमार्फत वनस्पतीच्या गरजेनुसार होत असते. वनस्पतींच्या संवहनी संस्थेतून जल आणि अन्न वाहण्याचे कार्य चालते, यासाठी जलवाहिन्या आणि रसवाहिन्या असतात.
- मूलदाब:
मुळांच्या पृष्ठभागावरील पेशी जमिनीतील पाणी आणि खनिजांच्या संपर्कात असतात आणि संहतीमध्ये असलेल्या फरकामुळे पाणी आणि खनिजे या पेशींमध्ये शिरतात. यामुळे पेशी ताठर होतात आणि त्यांच्या लगतच्या पेशींवर दाब निर्माण करतात, यालाच मूलदाब म्हणतात. या दाबामुळे पाणी आणि खनिजे मुळांच्या जलवाहिन्यापर्यंत पोहोचतात आणि संहतीतील हा फरक भरून काढण्यासाठी ते पुढे पुढे ढकलले जातात. या सततच्या हालचालीमुळे पाण्याचा एक स्तंभ तयार होतो जो सातत्याने पुढे ढकलला जातो. हा दाब झुडपे, लहान वनस्पती आणि लहान वृक्षांमध्ये पाणी वर चढवण्यासाठी पुरेसा असतो. - बाष्पोच्छ्वास:
वनस्पती पानांवरील पर्णरंध्राच्या मार्फत बाष्परुपाने पाणी बाहेर टाकतात. पर्णरंध्राभोवती दोन बाह्य आवरणयुक्त पेशी असतात त्यांना रक्षक पेशी म्हणतात. या पेशी पर्णरंध्राची उघडझाप करण्यावर नियंत्रण ठेवतात. या पर्णरंध्रातून बाष्पोत्सर्जन होते. या क्रियेला बाष्पोच्छ्वास असे म्हणतात. पानांमार्फत बाष्पीभवन क्रियेमुळे पाणी वातावरणात सोडले जाते. यामुळे पानाच्या अपित्वचेतील पाण्याचे प्रमाण कमी होते. हे पाण्याचे प्रमाण भरून काढण्यासाठी जलवाहिन्यांमार्फत पाणी पानांपर्यंत आणले जाते. बाष्पोच्छ्वासामुळे पाणी व खनिजे शोषून घेणे आणि ते सर्व भागांना पोहोचवणे यासाठी मदत होते. तर मूलदाबाचा परिणाम रात्रीच्या वेळी पाणी वर ढकलण्याचे महत्त्वाचे कार्य करतो.
shaalaa.com
वनस्पतींमधील परिवहन
Is there an error in this question or solution?