Advertisements
Advertisements
Question
'उपास' या पाठातील तुम्हांला सर्वांत आवडलेला विनोद कोणता? तो का आवडला ते स्पष्ट करा.
Solution
'उपास' हा संपूर्ण पाठ विनोदी आहे; परंतु त्यातील सुरुवातीचा आहारपरिवर्तनाचा प्रसंग मला फार आवडला. पंतांनी बिनसाखरेचा चहा सुरू केला. दिवाळी केवळ तिखटमिठावर उरकायची घरात ताकीदही दिली. असे पंतांना वाटणारे मोठे बदल त्यांनी आहारात केले. याशिवाय, पंतांनी भातही वर्ज्य करायचे ठरवले; पण त्यांच्यातील संयमाचा अभाव येथेही दिसून आला. अत्यंत साळसूदपणे पंतांनी त्याचे स्पष्टीकरण देत पहिला भात आणि ताकभात ठेवून मधला भात वर्ज्य केल्याचे अभिमानाने सांगितलेले दिसते. त्यांची ही शैली उत्तम विनोद निर्मिती साधताना दिसते.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
आकृती पूर्ण करा.
आकृती पूर्ण करा.
कारणे शोधा.
वजन कमी करण्यासाठी न बोलण्याचा उपाय पंतांना जमणार नव्हता, कारण ___
कारणे शोधा.
बाबा बर्वे पंतांच्या समाचाराला आले नाहीत, कारण ___
'उपास' या पाठाधारे खालील संकल्पनांचा अर्थ स्पष्ट करा.
भीष्म प्रतिज्ञा
'उपास' या पाठाधारे खालील संकल्पनांचा अर्थ स्पष्ट करा.
असामान्य मनोनिग्रह -
तुम्ही एखादा संकल्प केला आणि तो पूर्ण केला नाही तर कुटुंबातील व्यक्ती कोणत्या प्रतिक्रिया व्यक्त करतील, याची कल्पना करून लिहा.
दोरीवरच्या उड्या मारण्याच्या प्रसंगातील तुम्हांला समजलेला विनोद स्पष्ट करा.
पंतांच्या उपासाबाबत त्यांच्या पत्नीचा अवर्णनीय उत्साह तुमच्या शब्दांत वर्णन करा.
उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. गुण (०७)
१. आकलन कृती
१. खालील चौकटी पूर्ण करा. (०१)
१.लेखकाचे कुचकट स्वभावाचे शेजारी -______
२.लेखकाने वजनकाट्यात टाकलेले नाणे- ______
२. लेखकाचे वजन कमी करण्याचे दोन खात्रीशीर उपाय -
पंधरवडाभरात फक्त दोन वेळाच साखरभात झाला. एकदा सोकाजीने चोरून कोळंबीभात चारला व खालच्या मजल्यावरच्या भाऊजी पसरटवारांनी एकदा नागपुरी वडाभात पाठवला होता. एवढे अपवाद वगळल्यास भाताला स्पर्श नाही केला. त्यामुळे मुख्यत: चरबीयुक्त द्रव्ये शरीरात कमी गेली. माझा एकूण निश्चय पाहून चाळीतल्या मंडळीचा आदर दुणावल्याचे माझ्या सूक्ष्म नजरेतून सुटत नव्हते. जी मंडळी माझी, माझ्या डाएटची आणि उपासाची चेष्टा करत होती त्यांनीच “पंत, फरक दिसतो हं!” अशी कबुली द्यायला सुरुवात केली. जनोबा रेग्यांसारख्या अत्यंत कुजकट शेजाऱ्यालाही “पंत, भलतेच काय हो रोडावलेत.” असे मान्य करावे लागले. मंडळीच्या प्रशस्तीने मला भीती वाटत होती ती एकाच गोष्टीची म्हणजे मूठभर मांस वाढण्याची; पण असली तुरळक तारीफ ऐकून मी चळण्यासारखा नव्हतो. इतक्या असामान्य मनोनिग्रह आणि जिव्हानियंत्रणानंतर कमीत कमी वीस ते पंचवीस पाैंडांनी तरी माझे वजन घटले पाहिजे अशी माझी खात्री होती व त्या खात्रीने मी आमच्या ऑफिससमोरच्या वजनाच्या यंत्रावर पाय ठेवला आणि आणेली टाकून तिकीट काढले. महिन्यापूर्वी याच यंत्राने माझे वजन एकशे एक्याऐंशी पाैंड दाखवले होते. एक महिन्याचा उपास, निराहार, शास्त्रोक्त आहार, दोरीवरच्या उड्या इत्यादी उग्र साधना केल्यावर आज तिकिटावर वजन... मिनिटभर माझा विश्वासच बसेना. एकशे ब्याण्णव पाैंड आणि भविष्य होते: 'आप बहुत समझदार और गंभीर है!' हल्ली मी वजन आणि भविष्य या दोन्ही गोष्टींची चिंता करायचे सोडून दिले आहे आणि विशेषत: डाएटच्या आहारी तर या जन्मात जाणार नाही. छे, छे, वजनाचा मार्ग भलत्याच काट्यातून जातो. |
२. आकलन कृती
१. योग्य पर्याय निवडून गाळलेल्या जागा भरा. (०१)
अ) जवळजवळ ______ दिवस हा क्रम चालू होता. (पाचसहा, सातआठ, नऊदहा, दहाबारा)
आ) दुर्दौवाने रोज गाईचे ______ दूध मिळण्याची सोय नव्हती. (ताजे, सकस, गरम, धारोष्ण)
२. अनेक शब्दांसाठी एक शब्द लिहा. (०१)
१. साखर घालून केलेला भात ______
२. पंधरा दिवसांचा समूह______
३. स्वमत (०३)
लेखकाने आपले आहार व्रत कसे चालू ठेवले होते ते तुमच्या शब्दांत लिहा. (०३)