Advertisements
Advertisements
Question
दोरीवरच्या उड्या मारण्याच्या प्रसंगातील तुम्हांला समजलेला विनोद स्पष्ट करा.
Solution
बटाट्याच्या चाळीत राहणाऱ्या पंतांच्या घराचा दिवाणखाना खूप लहान होता. वजन कमी करण्याकरता तेथे दोरी उड्या मारायलाही जागा नव्हती. तरीही आपले प्रचंड वाढलेले वजन कमी करण्यासाठी पंत तेथे दोरी उड्या मारण्याचा प्रयत्न करतात. त्यांनी मारलेली पहिली उडी ही शेवटची ठरते कारण त्या दोरीबरोबर एकदा ड्रेसिंग टेबलवरील सगळे साहित्य खाली येते, तर दुसऱ्या वेळी ती दोरी आचार्य बर्वे नावाच्या शेजाऱ्यांच्या गळ्यात पडते. ही दोरी त्यांच्या गळ्यात पडणे पंतांना फार महागात जाते कारण मौन या विषयावर पंतांना बर्व्यांचे तासभर प्रवचन ऐकावे लागते. खुसखुशीत विनोदांमुळे हा प्रसंग वाचताना खूप गंमत येते. मौनाचे महत्त्व सांगणारी व्यक्ती स्वत: मात्र अखंड बडबडत असलेली दिसते. शिवाय, मौन हा वजन कमी करण्याचा बर्व्यांनी सुचवलेला पर्यायही गमतीशीरच वाटतो.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
आकृती पूर्ण करा.
आकृती पूर्ण करा.
कारणे शोधा.
वजन कमी करण्यासाठी न बोलण्याचा उपाय पंतांना जमणार नव्हता, कारण ___
कारणे शोधा.
बाबा बर्वे पंतांच्या समाचाराला आले नाहीत, कारण ___
'उपास' या पाठाधारे खालील संकल्पनांचा अर्थ स्पष्ट करा.
भीष्म प्रतिज्ञा
'उपास' या पाठाधारे खालील संकल्पनांचा अर्थ स्पष्ट करा.
असामान्य मनोनिग्रह -
'उपास' या पाठातील तुम्हांला सर्वांत आवडलेला विनोद कोणता? तो का आवडला ते स्पष्ट करा.
उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. गुण (०७)
आकलन कृती
१.
i. आकृती पूर्ण करा. (०१)
लेखकाने उपोषण सुरू केल्यावर लोकांची ऐकू येणारी बोलणी- ______
ii. चौकट पूर्ण करा. (०१)
लेखकाची आस्था ज्या शब्दांबद्दल वाढू लागली ते शब्द- ______
माझ्या खाजगी उपोषणाची हकीकत चाळीत जाहीर झाली आणि येताजाता ही माझी 'नाही ती भानगड' आहे, उगीच 'हात दाखवून अवलक्षण ' आहे, 'पेललं नाही तेव्हा खाजगी झालं!' अशी वाक्ये माझ्या कानांवर येऊ लागली; पण मी कोणत्याही टीकेला भीक घालणार नव्हतो. 'एकशे एक्क्याऐंशी पाैंड.' रात्रंदिवस ते कार्ड माझ्या डोळयांपुढे नाचत होते. वजन कमी झाले पाहिजे, या विचाराने माझी झोप उडाली. झोप कमी झाली तर वजन उतरते या विचाराने मला त्याचेही काही वाटत नव्हते. मी पूर्वीसारखा गाढ झोपत नाही यावर धर्मपत्नीचा मात्र अजिबात विश्वास नव्हता. “घोरत तर असता रात्रभर!” अशासारखी दुरुत्तरे ती मला करत असे. “दोन महिन्यांत पन्नास पाैंड वजन कमी करून दाखवीन तर खरा!” अशी भीष्मप्रतिज्ञा करून मी आहारशास्त्रावरच्या पुस्तकात डोके घालू लागलो. प्रोटीनयुक्त पदार्थ, चरबीयुक्त द्रव्ये वगैरे शब्दांबद्दलची माझी आस्था वाढू लागली. साऱ्या ताटांतले पदार्थ मला न दिसता नुसत्या ‘कॅलरीज’ मला दिसू लागल्या आणि आनंदाची गोष्ट अशी, की वजन उतरवण्याच्या शास्त्रात पारंगत झालेले तज्ज्ञ मला रोज डझनवारीने भेटू लागले. इतकेच काय; परंतु ज्या आमच्या चाळीतल्या लोकांनी माझ्या उपासाची अवहेलना केली होती, त्यांनीच मला ‘डाएटचा’ सल्ला दिला. उदाहरणार्थ - सोकाजी त्रिलोकेकर. |
२. कोण ते लिहा. (०२)
१. लेखक पूर्वीसारखे गाढ झोपत नाही यावर विश्वास न ठेवणारी ______
२. लेखकाला डाएटचा सल्ला देणार ______
३. स्वमत कृती (०३)
तुम्ही केलेल्या एखाद्या भीष्मप्रतिज्ञेबद्दल माहिती लिहा.
उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. गुण (०७)
आकलन कृती
१. आकृतिबंध पूर्ण करा. (०२)
“तुला सांगतो मी पंत, 'डाएट' कर. बटाटा सोड. बटाट्याचं नाव काढू नकोस.” “हो! 'म्हणजे कुठं राहाता?' म्हणून विचारलं तर नुसतं 'चाळीत राहतो' म्हणा. 'बटाट्याची चाळ' म्हणू नका. वजन वाढेल! खी: खी: खी:!” जनोबा रेगे या इसमाला काय म्हणावे हे मला कळत नाही. नेहमी तिरके बोलायचे म्हणजे काय! पण सोकाजींनी त्याला परस्पर जामून टाकले. “ए इडिअट! सगळ्याच गोष्टींत जोक काय मारतोस नेहमी? मी सांगतो तुला पंत-तू बटाटा सोड.” मी काय काय सोडले असता माझे वजन घटेल याची यादी बटाट्यापासून सुरू झाली. “बटाट्याचं ठीक आहे; पण पंत, आधी भात सोडा.” एक सल्ला. “भातानं थोडंच लठ्ठ व्हायला होतं? आमच्या कोकणात सगळे भात खातात. कुठं आहेत लठ्ठ? तुम्ही डाळ सोडा.” काशीनाथ नाडकर्णी. “मुख्य म्हणजे साखर सोडा.” “मी सांगू का? मीठ सोडा.” “लोणी-तूप सोडा-एका आठवड्यात दहा पाैंड वजन घटलं नाही तर नाव बदलीन. आमच्या हेडक्लार्कच्या वाइफचं घटलं.” “तेल आणि तळलेले पदार्थ आधी सोडा.” बाबूकाका. “दिवसा झोपणं सोडा.” “खरं म्हणजे पत्ते खेळायचं सोडा. बसून बसून वजन वाढतं.” मी मात्र या सर्व जनांचे ऐकून मनाचे करायचे ठरवले होते. पहिला उपाय म्हणून मी 'आहारपरिवर्तन' सुरू केले. |
२. आकलन कृती
कोण ते लिहा. (०२)
अ) लेखकाला तेल व तळलेले पदार्थ सोडायला सांगणारे
आ) उताऱ्याच्या आधारे 'आहारपरिवर्तन' हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा.
३. स्वमत (०३)
'लेखकाने ऐकावे जनाचे करावे मनाचे असे ठरवले' लेखकाच्या या मताशी तुम्ही सहमत आहात का?
उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
१. का ते लिहा. (2)
- लेखकांना ताटातले पदार्थाच्या जागी नुसते ‘कॅलरीज’ दिसू लागल्या, कारण ______.
- “तू बटाटा सोड” अशा सल्ला सोकाजींनी लेखकांना दिला, कारण ______.
माझ्या खाजगी उपोषणाची हकीकत चाळीत जाहीर झाली आणि येताजाता ही माझी ‘नाही ती भानगड’ आहे, उगीच ‘हात दाखवून अवलक्षण’ आहे, ‘पेललं नाही तेव्हा खाजगी झालं!’ अशी वाक्ये माझ्या कानांवर येऊ लागली; पण मी कोणत्याही टीकेला भीक घालणार नव्हतो. ‘एकशे एक्क्याऐंशी पौंड.’ रात्रंदिवस ते कार्ड माझ्या डोळ्यांपुढे नाचत होते. वजन कमी झाले पाहिजे, या विचाराने माझी झोप उडाली. झोप कमी झाली तर वजन उतरते या विचाराने मला त्याचेही काही वाटत नव्हते. मी पूर्वीसारखा गाढ झोपत नाही यावर धर्मपत्नीचा मात्र अजिबात विश्वास नव्हता. ‘‘घोरत तर असता रात्रभर!’’ अशासारखी दुरुत्तरे ती मला करत असे. ‘‘दोन महिन्यात पन्नास पौंड वजन कमी करून दाखवीन तर खरा!’’ अशी भीष्मप्रतिज्ञा करून मी आहारशास्त्रावरच्या पुस्तकात डोके घालू लागलो. प्रोटीनयुक्त पदार्थ, चरबीयुक्त द्रव्ये वगैरे शब्दांबद्दलची माझी आस्था वाढू लागली. साऱ्या ताटांतले पदार्थ मला न दिसता नुसत्या ‘कॅलरीज’ मला दिसू लागल्या आणि आनंदाची गोष्ट अशी, की वजन उतरवण्याच्या शास्त्रात पारंगत झालेले तज्ज्ञ मला रोज डझनवारीने भेटू लागले. इतकेच काय; परंतु ज्या आमच्या चाळीतल्या लोकांनी माझ्या उपासाची अवहेलना केली होती, त्यांनीच मला ‘डाएटचा’ सल्ला दिला. उदाहरणार्थ- सोकाजी त्रिलोकेकर. ‘‘तुला सांगतो मी पंत, ‘डाएट’ कर. बटाटा सोड. बटाट्याचं नाव काढू नकोस.’’ ‘‘हो! ‘म्हणजे कुठं राहाता?’ म्हणून विचारलं तर नुसतं ‘चाळीत राहातो’ म्हणा. ‘बटाट्याची चाळ’ म्हणू नका. वजन वाढेल! खी: खी: खी:!’’ जनोबा रेगे या इसमाला काय म्हणावे हे मला कळत नाही. नेहमी तिरके बोलायचे म्हणजे काय! पण सोकाजींनी त्याला परस्पर जामून टाकले. ‘‘ए इडिअट! सगळ्याच गोष्टींत जोक काय मारतोस नेहमी? मी सांगतो तुला पंत- तू बटाटा सोड.’’ मी काय काय सोडले असता माझे वजन घटेल याची यादी बटाट्यापासून सुरू झाली. |
२. आकृती पूर्ण करा. (2)
३. स्वमत (3)
लेखकांना वजन कमी करण्याबाबत आलेले अनुभव कसे सांगितले ते सांग.