Advertisements
Advertisements
Question
उपयोजित इतिहासाचा वर्तमानकाळाशी कसा सहसंबंध असतो?
Solution
इतिहास द्वारे भूतकाळातील घटनांसंबंधीचे ज्ञान प्राप्त होते. या ज्ञानाचा उपयोग वर्तमान आणि भविष्यकाळात सर्व लोकांना कसा होईल, याचा विचार उपयोजित इतिहासात केला जातो. उपयोजित इतिहासाचा वर्तमानकाळाशी पुढीलप्रमाणे सहसंबंध असतो.
- भूतकाळातील घटनांच्या आधारावरच मानव वर्तमानकालीन वाटचाल निश्चित करतो.
- आपल्या पूर्वजांचे कर्तृत्व, त्यांचा वारसा यांबद्दल त्याच्या मनात कुतूहल आणि आत्मीयता असते. या वारसाचा इतिहास पूर्वजांनी निर्मिलेल्या कलाकृती, परंपरा यांचे ज्ञान उपयोजित इतिहासाच्या अभ्यासाने वर्तमानातील मानवाला मिळते. उपयोजित इतिहासाच्या आधारे या मूर्त आणि अमूर्त वारसाचे जतन करता येते.
- उपयोजित इतिहासाद्वारे वर्तमानातील सामाजिक आव्हानांवर उपाययोजना करणे शक्य होते. वर्तमानातील समस्यांची सोडवणूक करता येते. सामाजिक उपयुक्ततेचे निर्णय घेणे शक्य होते.
- उपयोजित इतिहासाच्या अभ्यासाच्या आधारे वर्तमानकाळाचे यथायोग्य आकलन आणि भविष्यकाळासाठी दिशादर्शन होते.
- इतिहासाचे ज्ञान आपल्याला सर्व गोष्टींच्या उगमाचा मागोवा घेण्यास मदत करत असल्याने, पुढील पिढ्यांसाठी सांस्कृतिक वारसा जतन आणि संवर्धन करणे अत्यावश्यक ठरते.
- यासाठी उपयोजित इतिहासाचा अभ्यास आणि त्याचा योग्य उपयोग करावा लागतो.
- या प्रक्रियेमुळे अनेक व्यावसायिक संधीही निर्माण होतात, जसे की इतिहासकार, पुरातत्त्वज्ञ, संग्रहपाल, स्थापत्य-विशारद, अभियंता, समाजशास्त्रज्ञ, कायदेतज्ज्ञ, छायाचित्रण तज्ज्ञ इत्यादी.
RELATED QUESTIONS
इतिहासाच्या साधनांचे जतन व्हावे यासाठी किमान १० उपाय सुचवा.
दिलेल्या उताऱ्याचे वाचन करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
जनांसाठी इतिहास इतिहासाविषयी लोकांच्या मनात अनेक गैरसमज असतात. उदा. इतिहास हा विषय फक्त इतिहासकारांसाठी आणि इतिहास विषयाचा अभ्यास करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी असतो, दैनंदिन जीवनात इतिहासासारख्या विषयांचा काही उपयोग नसतो, इतिहासासारखा विषय आर्थिकदृष्ट्या उत्पादक क्षेत्राशी जोडला जाऊ शकत नाही, इत्यादी. अशा गैरसमजांवर मात करत इतिहासाची नाळ लोकांच्या वर्तमानातील जीवनसरणीशी जोडणारे क्षेत्र म्हणजे 'जनांसाठी इतिहास'. परदेशातील अनेक विद्यापिठांमध्ये जनांसाठी इतिहास या विषयातील अभ्यासक्रम शिकवले जातात. भारतात बंगळुरू येथे 'सृष्टी इन्स्टिट्यूट ऑफ आर्ट डिझाईन अँड टेक्नॉलॉजी' या संस्थेत 'सेंटर फॉर पब्लिक हिस्टरी' हा स्वतंत्र विभाग आहे. तिथे या विषयातील प्रकल्प आणि संशोधनाचे काम चालते. |
१. 'जनांसाठी इतिहास' म्हणजे काय?
२. भारतातील कोणत्या संस्थेत 'सेंटर फॉर पब्लिक हिस्टरी' हा स्वतंत्र विभाग आहे?
३. इतिहासाविषयी लोकांच्या मनात कोणते गैरसमज असतात?
उपयोजित इतिहासाचा वर्तमानकाळाशी कसा संबंध असतो?