English

उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा: पहाटेची, सकाळची वेळ अभ्यासाला योग्य असते, हा भडसावळे गुरुजींनी दिलेला सल्ला अगदी योग्य होता. चौकटी पूर्ण करा: सकाळचे वातावरण - ______ - Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

Question

उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा:

पहाटेची, सकाळची वेळ अभ्यासाला योग्य असते, हा भडसावळे गुरुजींनी दिलेला सल्ला अगदी योग्य होता. सकाळच्या टवटवीत आणि प्रसन्न वातावरणात अभ्यास खूप छान होतो. शरीरही पुरेशा विश्रांतीमुळे ताजंतवानं बनलेलं असतं. प्रसन्न वातावरणामुळे मनही अभ्यासात चटकन लागू शकतं. हवेत सुखद गारवा असतो. दुरून एखादी भूपाळी किंवा रेडिओवरचं आवडतं भक्तिगीत ऐकू येत असतं. ते नसेल तर पक्ष्यांचं सुमधुर संगीत साथीला असतंच. अशा आल्हाददायक वातावरणात संस्कृतचा एखादा श्लोक चटकन पाठ होतो. एरवी न कळलेलं गणित चटकन कळतं. त्याची रीतही लक्षात राहते, हा निरंजनचा अनुभव. त्यामुळेच भडसावळे गुरुजींचा हा सल्ला त्याला मोलाचा वाटे.
निरंजनची गुरुजींवर अपार श्रद्‌धा होती. तसं गुरुजींचंही निरंजनवर खूप प्रेम होतं. तो त्यांचा लाडका विद्यार्थी होता, कारण तो अतिशय प्रामाणिकपणे काम करायचा आणि अभ्यासही. या जगात त्याचं असं कुणी नव्हतंच. दूरदूरच्या नात्यातल्या एका मावशीच्या घरी चिपळूण शहरालगतच्या एका उपनगरात तो राहायचा. गावापासून दूर डोंगराच्या पायथ्याशी हे मावशीचं घर होतं. आईवडील लहानपणीच वारले. काही दिवस मामाने सांभाळ केला आणि मग कामासाठी म्हणून चिपळूणला आणलं.
  1. चौकटी पूर्ण करा:      (2)
    1. सकाळचे वातावरण - ______
    2. हवेतील गारवा - ______
  2. उत्तरे लिहा:      (2)
    1. भडसावळे गुरुजींनी निरंजनला दिलेला सल्ला लिहा.
    2. भडसावळे गुरुजींचा निरंजन लाडका असण्याचे कारण लिहा.
  3. स्वमतः      (3)
    तुम्हांला निरंजनशी मैत्री करायला आवडण्याची वा न आवडण्याची कारणे स्पष्ट करा.
Comprehension

Solution

    1. सकाळचे वातावरण - टवटवीत आणि प्रसन्न
    2. हवेतील गारवा - सुखद
    1. पहाटेची, सकाळची वेळ अभ्यासाला योग्य असते. हा भडसावळे गुरुजींनी निरंजनला सल्ला दिला.
    2. कारण निरंजन अतिशय प्रामाणिकपणे काम करायचा आणि अभ्यासही.
  1. निरंजन हा एक सद्गुणी, हुशार आणि मेहनती मुलगा आहे. त्याला गुरुजनांबद्दल अपार श्रद्धा आहे. गरिबीमुळे तो वार लावून जेवतो, तरीही तो कधीही परिस्थितीला दोष देत नाही. त्याच्या तत्परतेमुळे आणि प्रसंगावधानामुळे एक गंभीर अपघात टळला. त्याने जबाबदारीने आपले कर्तव्य पार पाडले, त्यामुळे तो खऱ्या अर्थाने आदर्श नागरिक आहे. अशा गुणी आणि संवेदनशील निरंजनशी मैत्री करण्याची इच्छा कोणालाही होईल. तो दुसऱ्यांवर प्रेम करणारा, सामाजिक जबाबदारी स्वीकारणारा आणि नेहमी मदतीसाठी तत्पर राहणारा निःस्वार्थी स्वभावाचा आहे. मैत्री करण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व गुणांमुळे तो सर्वांचा लाडका होईल. तो माझा मित्र असल्याचा मला खूप अभिमान वाटतो.
shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
2023-2024 (July) Official
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×