SSC (English Medium)
SSC (Hindi Medium)
Academic Year: 2023-2024
Date & Time: 18th July 2024, 11:00 am
Duration: 3h
Advertisements
कृतिपत्रिकेसाठी सूचना:-
- सूचनेनुसार आकलन कृती व व्याकरण यांमधील आकृत्या काढाव्यात.
- आकृत्या पेननेच काढाव्यात.
- उपयोजित लेखनातील कृतीसाठी (सुचना, निवेदन) आकृतीची आवश्यकता नाही तसेच या कृती लिहून येऊ नयेत.
- विभाग 5 - उपयोजित लेखन प्र.5 (अ) (2) सारांशलेखन या घटकासाठी गद्य विभागातील प्र.1 (इ) अपठित उतारा वाचून त्या उताऱ्याचा सारांश लिहावयाचा आहे.
- स्वच्छता, नीटनेटकेपणा व लेखननियमांनुसार लेखन यांकडे जाणीवपूर्वक लक्ष दयावे.
उत्तार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा:
(1) आकृती पूर्ण करा: (2)
रघुभैयाने चिठ्ठी मोठ्याने वाचली. चिठ्ठीतला मजकूर ऐकून अब्दुल आणि शन्नू यांना खूपच आनंद झाला. तपोवनात होणाऱ्या संमेलनाच्या प्रसंगी अब्दुलचा खास सत्कार होणार होता आणि त्यासाठी पत्र पाठवून दाजीसाहेबांनी त्याला निमंत्रण दिले होते. दोन दिवसांनीच सत्कार समारंभ होता. कधीही लाभणार नाही असे सत्काराचे भाग्य त्याच्या वाट्याला आले होते. पत्र आल्यापासून तो त्याच आनंदात होता. पुन्हा पुन्हा तो स्वत:च स्वत:ला विचारत होता, सत्कार करण्याएवढे मी काय केले आहे तपोवनासाठी? अब्दुल तपोवनात आला तेव्हा कार्यक्रम सुरू झाला होता. स्टेजच्या समोर, बाजूला मांडलेल्या खुर्च्यांवर काही निमंत्रित पाहुणेमंडळी बसली होती. अब्दुलला त्यांच्याबरोबर बसायला संकोच वाटला. तो तसाच उभा राहिला. तेवढ्यात खुद्द दाजीसाहेबांनीच त्याला बोलावून जवळच्या खुर्चावर बसायला लावले. सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाला सुरुवात झालो. सुरुवातीचे अध्यक्षांचे स्वागत वगैरे औपचारिक झाल्यावर दाजीसाहेबांनी बोलायला सुरुवात केली. अब्दुल बघतच राहिला, चौऱ्याऐंशी वर्षांच्या वृद्धाचा ताठपणा, उंच सडसडीत देहयष्टी, तेज:पुंज चेहरा, गौरवर्ण, पांढरेस्वच्छ धोतर, त्यावर बंद गळ्याचा कोट आणि डोक्याला केशरी फेटा. या वयातही आवाजातला खणखणीतपणा आणि बोलण्यातली ऐट यामुळे अब्दुल भारावून बघत राहिला. |
(2) कोण ते लिहा: (2)
- मोठ्याने चिठ्ठी वाचणारा -
- अब्दुलला पत्र पाठवणारे -
(3) स्वमत: (3)
'अब्दुल संवेदनशील मनाचा होता', हे विधान पाठाच्या आधारे सोदाहरण पटवून दया.
Chapter:
उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा:
पहाटेची, सकाळची वेळ अभ्यासाला योग्य असते, हा भडसावळे गुरुजींनी दिलेला सल्ला अगदी योग्य होता. सकाळच्या टवटवीत आणि प्रसन्न वातावरणात अभ्यास खूप छान होतो. शरीरही पुरेशा विश्रांतीमुळे ताजंतवानं बनलेलं असतं. प्रसन्न वातावरणामुळे मनही अभ्यासात चटकन लागू शकतं. हवेत सुखद गारवा असतो. दुरून एखादी भूपाळी किंवा रेडिओवरचं आवडतं भक्तिगीत ऐकू येत असतं. ते नसेल तर पक्ष्यांचं सुमधुर संगीत साथीला असतंच. अशा आल्हाददायक वातावरणात संस्कृतचा एखादा श्लोक चटकन पाठ होतो. एरवी न कळलेलं गणित चटकन कळतं. त्याची रीतही लक्षात राहते, हा निरंजनचा अनुभव. त्यामुळेच भडसावळे गुरुजींचा हा सल्ला त्याला मोलाचा वाटे. निरंजनची गुरुजींवर अपार श्रद्धा होती. तसं गुरुजींचंही निरंजनवर खूप प्रेम होतं. तो त्यांचा लाडका विद्यार्थी होता, कारण तो अतिशय प्रामाणिकपणे काम करायचा आणि अभ्यासही. या जगात त्याचं असं कुणी नव्हतंच. दूरदूरच्या नात्यातल्या एका मावशीच्या घरी चिपळूण शहरालगतच्या एका उपनगरात तो राहायचा. गावापासून दूर डोंगराच्या पायथ्याशी हे मावशीचं घर होतं. आईवडील लहानपणीच वारले. काही दिवस मामाने सांभाळ केला आणि मग कामासाठी म्हणून चिपळूणला आणलं. |
- चौकटी पूर्ण करा: (2)
- सकाळचे वातावरण - ______
- हवेतील गारवा - ______
- उत्तरे लिहा: (2)
- भडसावळे गुरुजींनी निरंजनला दिलेला सल्ला लिहा.
- भडसावळे गुरुजींचा निरंजन लाडका असण्याचे कारण लिहा.
- स्वमतः (3)
तुम्हांला निरंजनशी मैत्री करायला आवडण्याची वा न आवडण्याची कारणे स्पष्ट करा.
Chapter:
उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा:
(1) योग्य जोड्या लावा: (2)
'अ' गट | 'ब' गट | ||
(i) | सतत आरामाची अपेक्षा करणारा | (i) | आळशी व कामसू माणूस |
(ii) | 'आराम हराम है।' असे मानणारा | (ii) | आळशी माणूस |
(iii) | खरा काम करणारा माणूस |
आळशी माणूस हा सतत आरामाची अपेक्षा करत असतो तर खरा काम करणारा माणूस 'आराम हराम है।' असे मानतो. रात्रीची पाच-सहा तास झोप ही विश्रांतीसाठी पुरेशी असते. इतर वेळी त्याने सतत काम करावे. उगीचच बसून राहिल्याने अंगात आळस वाढतो. उलट प्रत्येकाने हे लक्षात ठेवले पाहिजे, की काळ हा सतत पुढे जात असतो. तो कोणासाठीही थांबत नाही. आपण तो आळसात घालवला तर आपण आपले काम वेळेत पूर्ण करू शकणार नाही. सतत तेच काम करत राहिले तर कंटाळा येतो, म्हणून तर सहा दिवस काम केल्यावर रविवारी सुट्टी येते. सुट्टीच्या दिवशीही आळसात पडून राहण्यापेक्षा माणसाने छंदात रमून जावे. |
(2) परिणाम लिहा: (2)
- उगीचच बसून राहणे -
- सतत तेच काम करत राहणे -
Chapter:
कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा:
(1) एका शब्दात उत्तर लिहा: (2)
- कवीचे सर्वस्व असलेली गोष्ट -
- कवीचा जवळचा मित्र -
दोन दिवस वाट पाहण्यात गेले; दोन दु:खात गेले. हिशोब करतो आहे किती राहिलेत डोईवर उन्हाळे शेकडो वेळा चंद्र आला; तारे फुलले, रात्र धुंद झाली; भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बरबाद झाली. हे हात माझे सर्वस्व; दारिद्रयाकडे गहाणच राहिले कधी माना उंचावलेले, कधी कलम झालेले पाहिले हरघडी अश्रू वाळविले नाहीत; पण असेही क्षण आले तेव्हा अश्रूच मित्र होऊन साहाय्यास धावून आले. दुनियेचा विचार हरघडी केला, अगा जगमय झालो. दुःख पेलावे कसे, पुन्हा जगावे कसे, याच शाळेत शिकलो झोतभट्टीत शेकावे पोलाद तसे आयुष्य छान शेकले दोन दिवस वाट पाहण्यात गेले; दोन दु:खात गेले. |
(2) कृती करा: (2)
- कवीचा प्रयत्नवाद आणि आशावाद दाखवणारी कवितेतील ओळ शोधून लिहा.
- 'रोजची भूक भागवण्यासाठी कराव्या लागणाऱ्या कष्टांमुळे आयुष्याचे दिवस वाया गेले', या आशयाची कवितेतील ओळ शोधून लिहा.
(3) खालील शब्दांचा अर्थ लिहा: (2)
- दारिद्रय =
- हरघडी =
- दुनिया =
- अश्रू =
(4) काव्यसौंदर्य: (2)
कवितेत व्यक्त झालेल्या कष्टकऱ्यांच्या जीवनांविषयी तुमच्या भावना लिहा.
Chapter:
खालील कवितेसंबंधी दिलेल्या मुद्दांच्या आधारे कृती सोडवा:
मुद्दे | औक्षण |
(1) प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री | |
(2) प्रस्तुत कवितेचा विषय | |
(3) प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश | |
(4) प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याच कारण | |
(5) प्रस्तुत कवितेतील दिलेल्या शब्दांचा अर्थ लिहा. | (i) औक्षण - |
(ii) द्रव्य - | |
(iii) सामर्थ्य - | |
(iv) शौर्य - |
Chapter:
खालील कवितेसंबंधी दिलेल्या मुद्दांच्या आधारे कृती सोडवा:
मुद्दे | ‘रंग मजेचे रंग उदयाचे’ |
(i) प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री | |
(ii) प्रस्तुत कवितेचा विषय | |
(iii) प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश | |
(iv) प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण | |
(v) प्रस्तुत कवितेतील दिलेल्या शब्दांचा अर्थ लिहा. | (i) सृष्टी - |
(ii) पुष्टी - | |
(iii) वृष्टी - | |
(iv) तुष्टी - |
Chapter:
‘आधी केले मग सांगितले’, या उक्तीची यथार्थता स्पष्ट करा.
Chapter: [0.042] मोठे होत असलेल्या मुलांनो... (स्थूलवाचन)
पणतीच्या उदाहरणातून 'जाता अस्ताला' कवितेत व्यक्त झालेला विचार स्पष्ट करा.
Chapter: [0.08199999999999999] जाता अस्ताला (स्थूलवाचन)
खालील वाक्याचा प्रकार ओळखा:
शाल व शालीनता यांचा संबंध काय?
Chapter: [0.18] व्याकरण विभाग
Advertisements
खालील वाक्याचा प्रकार ओळखा:
अगं, इनाम म्हणजे बक्षीस!
Chapter:
कंसातील सूचनेनुसार वाक्य रूपांतर करा:
केवढी उंच ही इमारत! (विधानार्थी करा.)
Chapter: [0.18] व्याकरण विभाग
कंसातील सूचनेनुसार वाक्य रूपांतर करा:
ते काम मोठे आहे. (नकारार्थी करा.)
Chapter:
खालील वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
झोकून देणे
Chapter: [0.18] व्याकरण विभाग
खालील वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा:
सुरुंग लावणे.
Chapter:
खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
उत्साहाला उधाण येणे.
Chapter: [0.18] व्याकरण विभाग
खालील शब्दाचे लिंग बदला.
लेखक -
Chapter: [0.18] व्याकरण विभाग
अचूक शब्द ओळखा.
गारहाणी
गाऱ्हाणि
गाऱ्हाणी
ग्राहाणी
Chapter: [0.18] व्याकरण विभाग
Advertisements
खालील वाक्यात योग्य विरामचिन्हांचा उपयोग करा.
दोन पिल्लं तिच्या मागोमाग निघाली होती पण दोघांना अद्याप भान नव्हतं
Chapter:
खलील वाक्यात योग्य विरामचिन्हांचा उपयोग करा:
रेखामावशी फिरायच्या पायीच कधीतरी सायकलनं
Chapter:
खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा.
'संस्कृतीसंवर्धन' संस्था आयोजित रांगोळी प्रशिक्षण वर्ग रविवार दि. 13 ऑक्टोबर : वेळ स. 10 ते 5 स्थळ: कलाघर, विवेकानंद मार्ग, पुणे. संपर्क: sanpune08@gmail. com आयोजक |
माधव/माधवी देसाई, नंदादीप विद्यालय, पुणे. विदयार्थी प्रतिनिधी या नात्याने रांगोळी प्रशिक्षण वर्गात सहभागी करून घेण्याची विनंती करणारे पत्र आयोजकांना लिहा.
Chapter:
खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा.
'संस्कृतीसंवर्धन' संस्था आयोजित रांगोळी प्रशिक्षण वर्ग रविवार दि. 13 ऑक्टोबर वेळ स. 10 ते 5 स्थळ: कलाघर, विवेकानंद मार्ग, पुणे. संपर्क: [email protected] आयोजक |
माधव/माधवी देसाई, नंदादीप विद्यालय, पुणे. विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने रांगोळी प्रशिक्षण वर्गाच्या उत्तम आयोजनाबद्दल आयोजकांचे अभिनंदन करणारे पत्र लिहा.
Chapter:
खालील अपठित उताऱ्याचा 1/3 एवढा सारांश तुमच्या शब्दांत लिहा.
आळशी माणूस हा सतत आरामाची अपेक्षा करत असतो तर खरा काम करणारा माणूस 'आराम हराम है।' असे मानतो. रात्रीची पाच-सहा तास झोप ही विश्रांतीसाठी पुरेशी असते. इतर वेळी त्याने सतत काम करावे. उगीचच बसून राहिल्याने अंगात आळस वाढतो. उलट प्रत्येकाने हे लक्षात ठेवले पाहिजे, की काळ हा सतत पुढे जात असतो. तो कोणासाठीही थांबत नाही. आपण तो आळसात घालवला तर आपण आपले काम वेळेत पूर्ण करू शकणार नाही. सतत तेच काम करत राहिले तर कंटाळा येतो, म्हणून तर सहा दिवस काम केल्यावर रविवारी सुट्टी येते. सुट्टीच्या दिवशीही आळसात पडून राहण्यापेक्षा माणसाने छंदात रमून जावे. |
Chapter:
खालील मुद्द्यांच्या आधारे आइस्क्रीमच्या दुकानाची आकर्षक जाहिरात तयार करा.
आइस्क्रीम - विविध चवींमध्ये उपलब्ध - खास सवलत - वैशिष्ट्ये - दरपत्रक (किंमत)
Chapter:
खालील शीर्षकावरून बातमी तयार करा:
आदर्श विद्यालय, धुळे येथे वसुंधरा दिनानिमित्त 'वृक्षारोपण' कार्यक्रम संपन्न.
Chapter:
खालील अपूर्ण कथा पूर्ण करा:
(दिलेली अपूर्ण कथा लिहून घेण्याची आवश्यकता नाही.)
राजू आठवडी बाजारात बांगड्या विकण्याचा व्यवसाय करत असे. आजही तो दर बुधवारप्रमाणे बांगड्या घेऊन बाजारात आला. बाजारात खूप गर्दी होती पण का कुणास ठाऊक आज राजूकडे एकही गिऱ्हाईक आलं नाही. 'धंदा चांगला झाला नाही तर लहान बहिणीचा नवीन फ्रॉकचा हट्ट कसा पुरवता येईल?' याची राजूला चिंता होती. तिला हवा असलेला सुंदर लाल फ्रॉक थोडा महागच होता; पण उद्या तिच्या वाढदिवसाला तो फ्रॉक तिला घेऊन देण्याचे राजूने कबूल केले होते. संध्याकाळपर्यंत एकही गिऱ्हाईक न आल्याने राजू हिरमुसला होता. इतक्यात शेजारच्या गावातील श्रीमंत व्यापाऱ्याच्या घरी लग्न असल्याची बातमी त्याला समजली आणि ..........
Chapter:
प्रेरणा विद्यालय, राहुरी |
वरील सहलीला तुम्ही गेला होतात अशी कल्पना करून जंगलसफारीत घेतलेल्या अनुभवाचे लेखन करा.
Chapter:
दिलेल्या मूद्द्यांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा.
Chapter:
'प्रदूषण: एक सामाजिक समस्या'
मुद्दे: प्रदूषणाचे प्रकार - कारणे - परिणाम - उपाय.
वरील मुद्द्यांच्या आधारे दिलेल्या विषयावर लेखन करा.
Chapter:
Other Solutions
Submit Question Paper
Help us maintain new question papers on Shaalaa.com, so we can continue to help studentsonly jpg, png and pdf files
Maharashtra State Board previous year question papers 10th Standard Board Exam Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)] with solutions 2023 - 2024
Previous year Question paper for Maharashtra State Board 10th Standard Board Exam -2024 is solved by experts. Solved question papers gives you the chance to check yourself after your mock test.
By referring the question paper Solutions for Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)], you can scale your preparation level and work on your weak areas. It will also help the candidates in developing the time-management skills. Practice makes perfect, and there is no better way to practice than to attempt previous year question paper solutions of Maharashtra State Board 10th Standard Board Exam.
How Maharashtra State Board 10th Standard Board Exam Question Paper solutions Help Students ?
• Question paper solutions for Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)] will helps students to prepare for exam.
• Question paper with answer will boost students confidence in exam time and also give you an idea About the important questions and topics to be prepared for the board exam.
• For finding solution of question papers no need to refer so multiple sources like textbook or guides.