यंत्रयुग आणि संगणकाच्या काळातही निसर्गप्रेमाचे महत्त्व अधोरेखित करणारी ही कविता मला अतिशय आवडली. कारण आधुनिक तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे पर्यावरणाचा वेगाने ऱ्हास होत आहे. आपण पर्यावरणाची हानी थांबवून त्याचे रक्षण केले पाहिजे. असे केल्यासच निसर्गाच्या विविध मनमोहक सौंदर्यात जगण्याचा खरा आनंद आपण अनुभवू शकतो.
Advertisements
Advertisements
Question
खालील कवितेसंबंधी दिलेल्या मुद्दांच्या आधारे कृती सोडवा:
मुद्दे | ‘रंग मजेचे रंग उदयाचे’ |
(i) प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री | |
(ii) प्रस्तुत कवितेचा विषय | |
(iii) प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश | |
(iv) प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण | |
(v) प्रस्तुत कवितेतील दिलेल्या शब्दांचा अर्थ लिहा. | (i) सृष्टी - |
(ii) पुष्टी - | |
(iii) वृष्टी - | |
(iv) तुष्टी - |
Complete the Table
Solution
मुद्दे | ‘रंग मजेचे रंग उदयाचे’ |
(i) प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री | अंजली कुलकर्णी |
(ii) प्रस्तुत कवितेचा विषय | 'रंग मजेचे रंग उद्याचे' या कवितेतून कवयित्रीने संगणक युगातहीनिसर्गाची दौलत जोपासायला हवी, हे सुंदर शब्दांत सांगितले आहे. |
(iii) प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश | 'रंग मजेचे रंग उद्याचे' या कवितेत कवयित्री अंजली कुलकर्णी यांनी यंत्रयुगातही पर्यावरण स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याचे महत्त्व सांगितले आहे, कारण त्यामुळे मानवी मनही समृद्ध होते. मानवाने निसर्गाच्या संरक्षणाची जबाबदारी घेतली पाहिजे. निसर्गाशी समरस होऊन जगण्यातच खरी आनंदाची अनुभूती मिळते, हा महत्त्वाचा संदेश ही कविता देते. |
(iv) प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण |
|
(v) प्रस्तुत कवितेतील दिलेल्या शब्दांचा अर्थ लिहा. | (i) सृष्टी - निसर्ग, जग |
(ii) पुष्टी - दुजोरा | |
(iii) वृष्टी - पाऊस | |
(iv) तुष्टी - तृप्ती |
shaalaa.com
Is there an error in this question or solution?