English

खालील कवितेसंबंधी दिलेल्या मुद्दांच्या आधारे कृती सोडवा: मुद्दे औक्षण (1) प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री (2) प्रस्तुत कवितेचा विषय (3) प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश - Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

Question

खालील कवितेसंबंधी दिलेल्या मुद्दांच्या आधारे कृती सोडवा:

मुद्दे औक्षण
(1) प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री  
(2) प्रस्तुत कवितेचा विषय  
(3) प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश  
(4) प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याच कारण  
(5) प्रस्तुत कवितेतील दिलेल्या शब्दांचा अर्थ लिहा. (i) औक्षण -
(ii) द्रव्य -
(iii) सामर्थ्य - 
(iv) शौर्य -
Complete the Table

Solution

मुद्दे औक्षण
(1) प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री इंदिरा संत
(2) प्रस्तुत कवितेचा विषय देशाचे प्राणपणाने रक्षण करणाऱ्या सीमेवरील जवानाविषयी कृतज्ञता व्यक्‍त करणारी ही कविता आहे.
(3) प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश जीवनात यश मिळवण्यासाठी कठोर परिश्रम, जिद्द आणि संघर्ष आवश्यक आहे. संपत्ती किंवा शारीरिक सामर्थ्य नसले तरी मनगटातील ताकद आणि दृढ निश्चय यामुळे यश मिळवता येते.
(4) प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण

ही कविता देशाच्या सीमेवर जागरूकपणे पहारा देणाऱ्या आणि आवश्यकतेस जीवाची आहुती देणाऱ्या सैनिकांविषयी कृतज्ञता व्यक्त करणारी आहे. सैनिक आपल्या देशाच्या संरक्षणासाठी अहोरात्र तत्पर असतो. अशा वीर सैनिकांचा सन्मान जनता कशा प्रकारे करू शकते? ती त्यांच्या भल्यासाठी सदैव प्रार्थना करू शकते, त्यांचे औक्षण करून त्यांना शुभेच्छा देऊ शकते आणि त्यांना अमरत्वाचा आशीर्वाद देऊ शकते. हा विचार माझ्या मनाला भावला, आणि त्यामुळेच ही कविता मला विशेष प्रिय वाटली.

(5) प्रस्तुत कवितेतील दिलेल्या शब्दांचा अर्थ लिहा. (i) औक्षण - ओवाळणे
(ii) द्रव्य - पैसे, संपत्ती 
(iii) सामर्थ्य - शक्ती, क्षमता
(iv) शौर्य - पराक्रम
shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
2023-2024 (July) Official
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×