Advertisements
Advertisements
Question
विपणन मिश्रणाचे ७ पी (7Ps) स्पष्ट करा.
Explain
Solution
- वस्तू: उत्पादनामध्ये वस्तू आणि सेवांचा समावेश होतो, की ज्या ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी दिल्या जातात. उत्पादन हे वस्तू किंवा सेवेच्या स्वरूपात असून दृश्य किंवा अदृश्य स्वरूपात असते. बाजाराचे सखोल संशोधन करून व्यवसायाला उत्पादनाचा योग्य प्रकार ठरविण्याची गरज असते. व्यवसायाचे यश हे, वस्तूचा ग्राहकांच्या मनावर जो प्रभाव पडतो, त्यावर अवलंबून असते.
- किंमत: वस्तूची किंमत म्हणजे मूलतः अशी रक्कम की जी ग्राहक वस्तूंची खरेदी करताना देतो. वस्तूला मागणी निर्माण होण्यासाठी किंमत हा घटक अत्यंत महत्त्वाचा असतो. वस्तूंची किंमत निश्चित करताना व्यवसायाने कमालीची काळजी घेतली पाहिजे. वस्तूंचा उत्पादन खर्च व वस्तूंसाठी पैसे खर्च करण्याची ग्राहकाची इच्छा या गोष्टी वस्तूंची किंमत निश्चित करताना महत्त्वाची भूमिका पार पाडतात. किंमत जास्त असेल तर, त्याचा परिणाम ग्राहकांच्या मागणीवर होतो आणि किंमत फारच कमी असेल तर व्यवसायाच्या नफ्यावर त्याचा परिणाम होतो. म्हणून किंमत निश्चित करताना ग्राहकांनी वस्तूची असणारी उपयुक्तता व मूल्य यांचा विचार करावा.
- स्थान: स्थान किंवा ठिकाणाला वितरण व्यवस्था असेही म्हणतात. स्थान, निश्चिती किंवा वितरण व्यवस्था या गोष्टी विपणनात फार महत्त्वाच्या असतात. योग्य उत्पादन योग्य किमतीला बनविणे एवढेच पुरेसे नसून व्यावसायिकांना ते उत्पादन संभाव्य ग्राहकांना योग्य ठिकाणी उपलब्ध करून देणेसुद्धा फार महत्त्वाचे असते. यामध्ये, ग्राहकांना वस्तू उपलब्ध करून देण्याच्या ठिकाणचा, वितरणाचा आणि वितरणाच्या मार्गांचा समावेश होतो. वस्तू वितरणाची साखळी जेवढी चांगली तेवढे बाजारपेठ व्यापणे सोपे जाते.
- संवर्धन किंवा विक्रयवृद्धी: विक्रयवृद्धी हा विपणनाचा एक अत्यंत महत्त्वाचा घटक असून विक्रीमध्ये स्वत:ची ओळख निर्माण करतो. विक्रयवृद्धी हे विपणन संदेशवहनाचे असे साधन आहे की, जे ग्राहकांपर्यंत आपल्या वस्तूला प्रसिद्धी मिळवून देते. संभाव्य ग्राहकांना वस्तूंच्या वैशिष्ट्याविषयी माहिती देण्यास मदत करते व खरेदी करण्यास प्रवृत्त करते. विक्रयवृद्धी मिश्रणामध्ये जाहिरात, प्रत्यक्ष विपणन, विक्रयवृद्धी, व्यक्तिगत विक्री इ. साधनांचा समावेश होतो.
- व्यक्ती: व्यवसायातील किंवा व्यवसायाबाहेरील लोक/व्यक्ती या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या व्यवसायावर प्रभाव टाकतात. ग्राहकांना वस्तू किंवा सेवा बहाल करताना सर्व व्यक्ती क्रियाशील भूमिका पार पाडतात. व्यक्तीमध्ये कामगारांचा समावेश होतो की जे ग्राहकांना सेवा देण्यास मदत करतात. योग्य व्यक्ती योग्य स्थानी असल्यास व्यवसायाच्या नावलौकिकात भर पडते. व्यवसाय यशस्वी होण्यासाठी, योग्य व्यक्तीची निवड करणे, त्यांना प्रशिक्षित करणे, त्यांच्यातील कौशल्य विकसित करणे व त्यांची जोपासना करणे आवश्यक असते.
- प्रक्रिया: ग्राहकांना वस्तू आणि सेवांचे वितरण करण्याच्या कृतीशी संबंधित गोष्ट म्हणजेच प्रक्रिया होय. उत्कृष्ट प्रकारची सेवा देण्याबाबतचा महत्त्वाचा घटक म्हणजे प्रक्रिया होय. ग्राहकाला प्रमाणित सेवा देण्याबरोबरच त्याच्या वेळेची व पैशाची बचत करून त्याची कार्यक्षमता वाढविण्यासाठी चांगल्या प्रक्रियेची मदत होते. व्यवसायातील प्रक्रियेचे परिणामकारक निरीक्षण करण्यासाठी आणि गरजेनुसार परिणामकारक सुधारणा घडवून आणण्यासाठी प्रगत तंत्रज्ञानाची मदत होते.
- भौतिक पर्यावरण: भौतिक पर्यावरणाचा संदर्भ विपणन पर्यावरणातील ग्राहक आणि व्यवसाय संस्था यांच्यात होणाऱ्या देवाण-घेवाणीशी असतो. सेवांचे स्वरूप अदृश्य असल्याने, सेवा देणारे, ग्राहकांचा अनुभव वाढविण्यासाठी दृश्य स्वरूपाचे घटक देण्याचा प्रयत्न करतात. सेवाच्या बाजारपेठेत, सेवा यशस्वीरित्या पुरविल्याची खात्री देण्यासाठी भौतिक पुरावा महत्त्वाचा असतो. प्रत्यक्ष पुराव्यामुळे ग्राहकांना बाजारातील अग्रेसर उत्पादने समजतात. प्रत्यक्ष पुरावा ग्राहकांच्या समाधानावर परिणाम करतो. त्यामध्ये ठिकाण, आराखडा, अंतर्गत सजावट, बांधणी, मुद्रीकरण, कर्मचाऱ्यांची वेशभूषा आणि त्यांची वागण्याची पद्धत, प्रतीक्षालय इत्यादी बाबींचा समावेश होतो.
shaalaa.com
विपणन मिश्र (Marketing Mix)
Is there an error in this question or solution?