Advertisements
Advertisements
Question
विपणनाचे ग्राहकांप्रति महत्त्व स्पष्ट करा.
Explain
Solution
- वस्तूविषयी जागृती वाढविणे: विपणनाच्या विविध कार्याद्वारे कंपनी आपल्या वस्तू व सेवांच्या विक्रीत वाढ करते. यामुळे, ग्राहकांना बाजारपेठेतील विविध वस्तू व सेवांची माहिती मिळण्यास मदत होते. ग्राहकांना याचा उपयोग खरेदीबाबतचा निर्णय घेण्यास होतो. बाजारपेठेत उपलब्ध असणारी विविध उत्पादने त्यांच्यातील वैशिष्ट्याबाबत ग्राहकांत जागृती निर्माण होते.
- दर्जेदार वस्तूंचा पुरवठा: बाजारपेठेत स्पर्धा वाढत आहे. ग्राहकांना वस्तू व सेवांविषयी सहजपणे माहिती उपलब्ध होते. त्यामुळे ग्राहकांना दर्जेदार वस्तूंचा पुरवठा करण्याबाबत व्यावसायिकांच्यावर नैतिक दबाव वाढतो. सदोष वस्तूंचा पुरवठा केल्यास व्यवसायाच्या प्रतिमेविषयी नकारात्मक भावना निर्माण होऊन, ग्राहकांच्या एकनिष्ठतेवर परिणाम होतो.
- विविध वस्तूंचा पुरवठा: विपणनामुळे ग्राहकांच्या मनात उत्पादनाविषयी जागृकता निर्माण होते. त्यावेळी ग्राहकांनी वस्तुंची खरेदी करावी म्हणून त्यांना आकर्षित केले जाते. ग्राहकांच्या संख्येत व आवडी-निवडीमध्ये मोठ्या प्रमाणावर बदल झाल्याने स्पर्धात्मक पर्याय अधिक उपलब्ध झाले आहेत. परिणामी, बाजारपेठेचे विभाग करणे हे व्यवसायांना किंवा विपणन नियोजकांना कठीण झाले आहे.
- निवड प्रक्रियेस मदत: वेगवेगळ्या उत्पादकांच्या विविध प्रकारच्या वस्तू स्पर्धात्मक बाजारपेठेमध्ये उपलब्ध असतात. उपलब्ध असणाऱ्या विविध पर्यायांमधून सर्वोत्कृष्ट वस्तू आणि सेवांची निवड करण्यास विपणन मदत करते.
- ग्राहकांचे समाधान: सक्षम विपणन धोरणाचे पहिले आणि सर्वात कठीण उद्दिष्ट म्हणजे ग्राहकांना वस्तूच्या दर्जाविषयी खात्री देणे व जाहिरातीद्वारे त्यांचे समाधान करणे होय. जेव्हा देऊ केलेल्या सवलतीमुळे ग्राहकांच्या अपेक्षांची पूर्तता होते, तेव्हाच ग्राहकांचे समाधान होते. प्रामाणिकपणे केलेली जाहिरात, दर्जेदार उत्पादनाची खात्री आणि नावीन्यपूर्ण उत्पादनाची उपलब्धता इ. द्वारे ग्राहकांचे समाधान करण्यासाठी विपणन पुढाकार घेते.
- नियमित वस्तूंचा पुरवठा: विपणनाच्या परिणामकारक वितरण प्रणालीद्वारे नियमितपणे वस्तूंचा पुरवठा करणे शक्य होते. त्यामुळे, मागणी आणि पुरवठ्यामध्ये समतोल राखण्यास मदत होते. परिणामी, किमतीमध्ये स्थैर्य राखता येते.
shaalaa.com
Is there an error in this question or solution?