Advertisements
Advertisements
Question
व्यवस्थापनाच्या तत्त्वांचे स्वरूप स्पष्ट करा
Explain
Solution
- सार्वत्रिक उपयोग: व्यवस्थापनाची तत्त्वे सार्वत्रिक आहेत म्हणजेच ही तत्त्वे कोणत्याही आकाराच्या व स्वरूपाच्या व्यावसायिक संघटनांना लागू पडतात. तसेच त्यांच्या परिणामात बदल होऊ शकतो. तसेच त्यांच्या उपयोजनातही बदल करणे शक्य असते. तरीही ती सर्व प्रकारच्या संस्थांसाठी सोयीस्कर असतात. तसेच ही तत्त्वे व्यवस्थापनाच्या सर्व स्तरांवर लागू पडतात.
- सर्वसाधारण मार्गदर्शक तत्त्वे: संघटनेतील समस्या सोडविण्यासाठी तसेच एखादी संघटनात्मक परिस्थिती काळजीपूर्वक हाताळण्यासाठी व्यवस्थापनाची तत्त्वे मार्गदर्शक ठरतात. ही तत्त्वे लवचीक असतात. कोणत्या तत्त्वांचा उपयोग करायचा हे संघटनेच्या परिस्थिती, आकार व स्वरूपावर अवलंबून असते. उदा. - जेव्हा आपण योग्य मोबदला असे म्हणतो तेव्हा योग्य हा शब्द संघटनेच्या स्वरूप, आकार आणि आर्थिक स्थितीनुसार बदलू शकतो.
- सराव आणि प्रयोगाद्वारे तत्त्वे तयार केली जातात: संशोधनातून हळूहळू व्यवस्थापन तत्त्वे विकसित केली जातात. ती विकसित करण्यापूर्वी पद्धतशीर निरीक्षणे आणि प्रयोग केले जातात. या प्रयोगांचे निष्कर्ष संघटनामध्ये वापरून पाहिल्यानंतरच त्यांचे तत्त्वांमध्ये रूपांतर केले जाते.
- लवचीकता: व्यवस्थापनाची तत्त्वे लवचिक असतात. म्हणजेच ही तत्त्वे परिस्थितीनुसार बदलता किंवा सुधारता येतात. ही तत्त्वे अवलंबताना व्यवस्थापक त्यात गरजेनुसार बदल करू शकतो. व्यवसायाची परिस्थिती सतत बदलत असते. आपल्या गरजेप्रमाणे संघटना ही तत्त्वे सुधारून अथवा त्यात बदल करून वापरू शकते.
- वर्तणुकीशी संबंधित: व्यवस्थापन ही सामूहिक कृती आहे. व्यक्तीच्या सामूहिक प्रयत्नातून विशिष्ट उद्दिष्ट साध्य करणे हे व्यवस्थापनाचे ध्येय असते. मानवी वर्तणुकीवर प्रभाव टाकण्यासाठी ही तत्त्वे तयार केलेली असतात. ही तत्त्वे कर्मचाऱ्यांच्या समूहांवर नियंत्रण ठेवून त्यांना ध्येयप्राप्तीसाठी दिशा दाखवतात.
- कार्यकारण संबंध: व्यवस्थापनाची तत्त्वे निर्णय घेण्यासाठीचा आधार आहेत. ती एखाद्या परिणामामागचे कारण निश्चित करतात. उदा.- चांगला पगार दिल्याने कामगारांची कार्यक्षमता वाढण्यास मदत होते किंवा प्रभावी जाहिरातीने वस्तूंची विक्री वाढते.
- सर्व तत्त्वांना एकसारखे महत्त्व आहे: व्यवस्थापनाच्या सर्व तत्त्वांना सारखे महत्त्व आहे. पूर्वनियोजित उदिद्ष्टे साध्य करण्यासाठी ही सर्व तत्त्वे एकाच वेळी वापरणे आवश्यक आहे. एखादे तत्त्व विशेष लक्ष देऊन वापरले आणि इतर तत्त्वांकडे दुर्लक्ष झाले तर त्याचा परिणाम संघटनेच्या कामकाजावर होतो.
व्यवस्थापनाची तत्त्वे ही सामाजिक शास्त्राची तत्त्वे आहेत. व्यवस्थापनाच्या तत्त्वांचे स्वरूप रसायनशास्त्र, गणित यांसारख्या विज्ञानासारखे परिपूर्ण नसते. संघटनेच्या गरजेनुसार ही तत्त्वे बदलून अथवा सुधारून वापरता येतात.
shaalaa.com
Is there an error in this question or solution?