Advertisements
Advertisements
Question
वितरणाच्या नकाशांचे उपयोग व प्रकार स्पष्ट करा.
Answer in Brief
Solution
- वितरणाच्या नकाशांचे उपयोग: वितरणाच्या नकाशांद्वारे एखाद्या प्रदेशातील विशिष्ट घटकांच्या वितरणाचा आकृतिबंध स्पष्ट होतो.
- वितरणाच्या नकाशांचे प्रकार: वितरणाच्या नकाशांचे पुढील तीन प्रकार पडतात.
- टिंब पद्धत: सांख्यिकीय माहितीच्या आधारे टिंब पद्धतीचा नकाशा तयार केला जातो. टिंब पद्धतीचे नकाशे तयार करताना केवळ गणना करून मिळवलेल्या माहितीचा उपयोग केला जातो. एखाद्या प्रदेशामध्ये ज्या तऱ्हेने घटक वितरित झाला आहे तशाच तऱ्हेने नकाशात टिंबे देऊन वितरण दाखवले जाते. उदा., प्रदेशातील लोकसंख्या, पशुधन संख्या वितरण इत्यादी.
- क्षेत्रघनी पद्धत: या नकाशांमध्ये भौगोलिक घटकांची आकडेवारी वेगवेगळ्या छाया किंवा छटांनी दाखवली जाते. हे नकाशे काढताना घटकांच्या मापन, सर्वेक्षण इत्यादी प्रक्रियेतून उपलब्ध झालेल्या सांख्यिकीय माहितीचा उपयोग केला जातो. यामध्ये प्रदेशाच्या प्रत्येक उपविभागासाठी घटकांचे एकच मूल्य दिलेले असते. प्रदेशातील उपविभागांच्या घटकांतील कमीत कमी व जास्तीत जास्त मूल्ये विचारात घेतात.
- समघनी पद्धत: जेव्हा एखाद्या चलाचे वितरण सलग असते, तेव्हा ते दाखवण्यासाठी समघनी पद्धतीचा वापर केला जातो. उदा., उंची, तापमान, पर्जन्य इत्यादी. या नकाशांसाठी प्रदेशातील काही ठिकाणांची उंची, तापमान, पर्जन्यमान इत्यादींची अचूक सांख्यिकीय माहिती मिळवावी लागते. दोन जवळजवळ असणाऱ्या ठिकाणांच्या उंचीतील किंवा पर्जन्यमानातील फरक हा समान गतीने होतो, हे गृहीत धरलेले असते. येथे क्षेत्रातील उपविभागांचा विचार केला जात नाही.
shaalaa.com
वितरण नकाशे
Is there an error in this question or solution?