Advertisements
Advertisements
Question
समघनी व क्षेत्रघनी पद्धतींतील फरक.
Distinguish Between
Solution
समघनी | क्षेत्रघनी | |
i | समघनी पद्धतीत, समान मूल्य असलेल्या रेषांचा उपयोग घटकांचे वितरण दाखवण्यासाठी केलेला असतो. | क्षेत्रघनी पद्धतीत, नकाशातील भौगोलिक घटकांची आकडेवारी वेगवेगळ्या रंगछटा किंवा कृष्णधवल आकृतिबंधाने दाखवलेली असते. |
ii | या नकाशांसाठी प्रदेशातील काही ठिकाणांची उंची, तापमान, पर्जन्यमान इत्यादींची अचूक सांख्यिकीय माहिती मिळवावी लागते. | हे नकाशे काढताना घटकांच्या मापन, सर्वेक्षण इत्यादी प्रक्रियेतून उपलब्ध झालेल्या सांख्यिकीय माहितीचा उपयोग केला जातो. |
iii | यामध्ये प्रदेशांच्या उपविभागांचा विचार केलेला नसतो. | यामध्ये प्रदेशाच्या प्रत्येक उपविभागासाठी घटकांचे एकच मूल्य दिलेले असते. |
iv | या पद्धतीत सममूल्य रेषा जवळजवळ असतील, तर घटकातील बदल तीव्र आणि एकमेकांपासून दूर असतील, तर बदल सौम्य असतो. | या पद्धतीत रंगछटा किंवा कृष्णधवल आकृतिबंध हे दिलेल्या घटकाच्या वाढत्या मूल्यानुसार गडद होत जातात. |
v | या नकाशामुळे घटकांच्या वितरणातील नैसर्गिक कल लक्षात येतो. | ते वापरताना वाढत्या मूल्यांप्रमाणे गडद होत जातात व ते मूल्यगटानुसार नकाशावर काढले जातात. |
shaalaa.com
वितरण नकाशे - क्षेत्रघनी पद्धत
Is there an error in this question or solution?
APPEARS IN
RELATED QUESTIONS
खालील विधान योग्य की अयोग्य ते सकारण लिहा.
क्षेत्रघनी पद्धतीच्या नकाशात उपविभागासाठी घटकांचे एकच मूल्य असते.
खालील विधान योग्य की अयोग्य ते सकारण लिहा.
क्षेत्रघनी पद्धतीतील नकाशात घटकांच्या मूल्याप्रमाणे छटा बदलत नाहीत.
खालील विधान योग्य की अयोग्य ते सकारण लिहा.
क्षेत्रघनी नकाशा उंची दाखवण्यासाठी वापरतात.
खालील माहितीसाठी कोणत्या नकाशा पद्धतीचा वापर कराल?
जिल्ह्यातील गव्हाचे तालुकानिहाय उत्पादन.